हिवताप व त्याची लक्षणे

हिवताप व त्याची लक्षणे

हिवताप :

हिवताप हा जगातील एक सर्वात जुना रोग आहे.

हिवताप हा ‘प्लाझमोडिअम’ नामक ‘परजीवी जंतू’ मुळे होतो.

हिवताप हा ‘अॅनॉफिलीस’ प्रकारच्या डासामार्फत (मादी) पसरतो.

डासांमधील नर डास चावत नाही. अंडी घालण्यासाठी मदांना रक्ताची गरज असल्याने फक्त मदांचा दंश करून रक्त शोषून घेतात. तर नर डास हा पानांच्या रसावर (तृणरस) जगतो.

हिवताप रुग्णास अॅनाफिलीस जातीची मादी चावल्यास व दुसर्‍या निरोगी माणसास चावल्यास प्रसार होतो.

‘हिवताप जंतूचा शोध’ 1880 मध्ये सर डॉ. अल्फ्रेंड लॅव्हेरॉन यांनी लावला.

सन 1897 मध्ये सर रोनॉल्ड रॉस यांनी हा रोग अॅनाफिलीस जातीची मादी डासांमुळे मानवामध्ये पसरत जातो हे सिद्ध केले व हिवताप जंतूच्या जीवनचक्राचा शोध लावला.

हिवतापाची लक्षणे :

थंडी वाजून ताप येणे आणि घाम आल्यावर ताप ओसरतो.

प्लीहेची वाढ होते.

रक्तक्षय होतो.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.