दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना (Deendayal Upadhyaya Gram Jyoti Yojana)

दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना (Deendayal Upadhyaya Gram Jyoti Yojana)

*दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 25 जुलै 2015 रोजी पटणा (बिहार) येथून सुरू करण्यात आली.

*दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना केंद्रीय ऊर्जा मंत्रालायमार्फत सुरू करण्यात आली असून ग्रामीण भागामध्ये 24 तास वीज पुरवठा करणे हे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

*या योजनेअंतर्गत होणारा एकूण खर्च 760 हजार कोटी रु. असून भारत सरकारमार्फत 630 हजार कोटी रु. निधी देण्यात येईल.

*ही योजना पूर्वीच्या राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजनेचे आधुनिक रूप म्हणूनही ओळखली जाते.

उद्देश –

1. सर्व गावांमध्ये विजपुरवठा उपलब्ध करणे

2. घरगुती वापरासाठी व कृषी क्षेत्रासाठी वेगवेगळे फिडर निर्माण करणे ज्यामधून घरांना नियमित व शेतकर्‍यांना पुरेसा वीजपुरवठा उपलब्ध होईल.

3. मोटरीच्या वापराने विजेचे होणारे नुकसान कमी होईल.

4. विजेच्या प्रसारण व वितरण/पुरवठा जाळ्यात वीजपुरवठ्याची गुणवत्ता व आश्वासनपूर्तता वाढवण्यासाठी सुधरणा करणे.

फायदे –

1. सर्व गावे आणि घरे विद्युतीकृत करण्यात येतील.

2. कृषी उत्पादनात वाढ होईल.

3. आरोग्य, शिक्षण, बँकिंग सेवांमध्ये सुधारणा होईल.

4. विजेच्या उपलब्धतेतून सामाजिक संरक्षणात सुधारणा होतील.

5. लघु-कुटीर उद्योगाच्या व्यापारात सुधारणा होऊन रोजगार निर्माण होतील.

6. रेडिओ, टेलिफोन, टेलिव्हिजन, इंटरनेट आणि मोबाईल इ. दळणवळणाच्या सुविधांमध्ये सुधारणा होतील.

*या योजनेअंतर्गत सरकारमार्फत 1000 दिवसांमध्ये म्हणजे 1 मे 2018 पर्यंत 18,452 वीज नसणार्‍या गावांमध्ये वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

*DDUGJY या योजनेत नोडल कंपनीची भूमिका विद्युत मंत्रालयाच्या एकत्रित मार्गदर्शनामध्ये ग्रामीण विद्युतीकरण निगम लि. (RECLtd.) योजनेच्या कार्यवाही आणि व्यवस्थापनासाठी नोडल कंपनी महत्वपूर्ण भूमिका पार पडेल. नोडल कंपनीस त्यांच्या फीच्या स्वरुपात पाहणी समितीमार्फत निश्चित योजना खर्चाच्या 0.5% पेमेंट देण्यात येईल.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.