Current Affairs of 9 June 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (9 जून 2017)

चालू घडामोडी (9 जून 2017)

अतिरिक्त महापालिका आयुक्तपदी आबासाहेब जऱ्हाड :

 • शासनाच्या पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास विभागाचे सचिव आबासाहेब जऱ्हाड यांची मुंबई पालिकेच्या अतिरिक्त महापालिका आयुक्तपदी (शहर) शासनाने नियुक्ती केली असून, उद्योग विभागाचे विकास आयुक्त विजय सिंघल यांची अतिरिक्त पालिका आयुक्तपदी (पूर्व उपनगरे) नियुक्ती केली आहे.
 • आबासाहेब जऱ्हाड हे 1997 च्या भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी आहेत. तर सिंघल हे 1997 च्या भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी आहेत.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (8 जून 2017)

राज्यातील 476 महाविद्यालये कॅशलेस :

 • विमुद्रीकरणानंतर अर्थव्यवस्था कॅशलेसकडे वळत असताना राज्यातही डिजिधन जनजागृती कार्यक्रम धडाक्‍यात राबविला जातोय.
 • तसेच या उपक्रमाचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री कार्यालयतंत्रशिक्षण संचालनालयातर्फे महाविद्यालये कॅशलेसवर भर दिला जात असून, राज्यातील 476 महाविद्यालयांनी नोंदणी केली.
 • मुख्यमंत्री कार्यालय व तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे एप्रिलअखेरीस व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांतील प्राचार्यांना पत्र पाठवून कॅशलेस व्यवहार करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे सुचविले होते. शुल्क आकारण्याची पद्धती; तसेच उपाहारगृहे व अन्य बाबींसाठी कॅशलेस व्यवहार व्हावेत, असे या पत्रात नमूद केले होते.
 • चांगली कामगिरी करणाऱ्या महाविद्यालयांचा सत्कार करणार असल्याचेही जाहीर केले होते. प्राचार्य व उपक्रम संयोजनाची जबाबदारी असलेल्या समन्वयकांच्या जबाबदारीचीही माहिती नमूद केली होती.
 • या योजनेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या महाविद्यालयांना संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन केले होते. त्यास प्रतिसाद देत गेल्या महिनाभरात 476 महाविद्यालयांनी नोंदणी केली.

सर्वोत्तम विद्यापीठांत दिल्ली विद्यापीठचा प्रथम दहांत समावेश :

 • देशातील पहिल्या दहा सर्वोत्तम विद्यापीठांमध्ये दिल्ली विद्यापीठाचा समावेश झाला आहे.
 • ‘क्‍यूएस’ या जागतिक स्तरावरील संस्थेने त्यांच्या वार्षिक अहवालात 2018 साठीची सर्वोत्तम दहा विद्यापीठांची यादी जाहीर केली आहे.
 • विद्यापीठांच्या क्रमवारीत दिल्ली विद्यापीठाला देशात आठवे, तर जागतिक क्रमवारीत 481-491 स्थान मिळाले आहे; तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला जागतिक क्रमवारीत 801 ते 1000 असे स्थान दिले आहे. यासाठी विद्यापीठाचा केवळ ‘पुणे विद्यापीठ’ असा उल्लेख केलेला आहे.
 • ‘ब्रिक्‍स’ देशांतील विद्यापीठांच्या क्रमवारीत विद्यापीठाला 131 ते 140 आणि आशियाई विद्यापीठांच्या यादीत हे विद्यापीठ 176 व्या स्थानावर दाखविले आहे.
 • कर्नाटकच्या मनिपाल विद्यापीठाने खासगी विद्यापीठाच्या क्रमवारीत प्रथमच देशात अव्वल स्थान पटकावले आहे.

रोहण बोपन्नाचे पहिले ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद :

 • रोहण बोपन्नाने कॅनडाची त्याची सहकारी ग्रॅब्रियला डाब्रोवस्कीच्या साथीने फ्रेंच ओपन मिश्र दुहेरीत अजिंक्यपद पटकावताना कारकीर्दीत प्रथमच ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद पटकावले. ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद पटकावणारा तो चौथा भारतीय खेळाडू ठरला.
 • बोपन्ना व डाब्रोवस्की या सातव्या मानांकित जोडीने अंतिम फेरीत शानदार पुनरागमन केले. त्यांनी दोन मॅच पॉर्इंटचा बचाव करताना जर्मनीच्या अन्ना लेना गोरेनफिल्ड व कोलंबियाच्या रॉबर्ट फराह या जोडीची झुंज 2-6, 6-2, 12-10 ने मोडून काढली.
 • भारत व कॅनडा यांची जोडी एकवेळ दोन गुणांनी पिछाडीवर होती, पण गोरेनफिल्ड व फराह यांनी संधी गमावली. बोपन्ना व डाब्रोवस्की यांनी पूर्ण लाभ घेतला आणि दोन मॅच पॉर्इंट मिळवले. जर्मनीच्या खेळाडूने दुहेरी चूक करताच बोपन्ना-डाब्रोवस्की जोडीचे जेतेपद निश्चित झाले.

दिनविशेष :

 • भारतातील सर्वप्रथम स्त्री आय.पी.एस. अधिकारी किरण बेदी यांचा जन्म 9 जून 1947 मध्ये झाला.
 • 9 जून 1964 मध्ये लालबहादूर शास्त्री पंतप्रधान म्हणून शपथविधी झाली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (10 जून 2017)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.