Current Affairs of 9 June 2015 For MPSC Exams
![Current Affairs of 9 June 2015 Current Affairs of 9 June 2015](https://www.mpscworld.com/wordpress/wp-content/uploads/2015/06/9-june.png)
दहावीचा राज्याचा यंदाचा निकाल 91.46
- दहावीच्या निकालाच्या टक्केवारीने या वर्षीदेखील नवीन उच्चांक गाठला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी 3.14 टक्क्यांनी वाढ झाली आणि राज्याचा एकत्रित निकाल 91.46 टक्के लागला आहे.
- सर्वाधिक निकाल कोकणचा (96.54 टक्के), त्यापाठोपाठ कोल्हापूर (95.12 टक्के) आणि पुणे (95.10 टक्के) आहे.
- राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाले असतील तर त्यांना उत्तीर्ण होण्यासाठी 25 गुणांपर्यंत विशेष सवलत देण्यात आली आहे.
- दहावीच्या परीक्षेत दोन विषयांत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना 2015-16 या शैक्षणिक वर्षासाठी एटीकेटी सुविधा मिळेल आणि या विद्यार्थ्यांना अकरावीला प्रवेश घेता येईल; परंतु तो तात्पुरता असेल.
“आयफा’ पुरस्कारांत “क्वीन’ आणि “हैदर’ चित्रपटांची बाजी
- विकास बहल दिग्दर्शित “क्वीन” आणि विशाल भारद्वाज यांच्या “हैदर” या चित्रपटांनी 16व्या आयफा चित्रपट पुरस्कार सोहळ्यात बाजी मारली असून या पुरस्कार सोहळ्यात “क्वीन‘ आणि “हैदर‘ या चित्रपटांना प्रत्येकी तीन पुरस्कार मिळाले.
महत्वाचे काही पुरस्कार पुढीलप्रमाणे-
– “क्वीन” सर्वोकृष्ट चित्रपट
– शाहिद कपूरला “हैदर” मधील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार
– कंगना राणावतला “क्वीन” मधील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार
– तब्बूला “हैदर” मधील शाहिदच्या आईच्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार
– रितेश देशमुखला “एक व्हिलन” मधील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा पुरस्कार
– दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांना “पीके” चित्रपटासाठी सर्वोकृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार
– दीपिका पदूकोण हिला “वुमन ऑफ द ईयर” पुरस्कार मिळाला.
“एसीबी’च्या प्रमुखपदी एम. के. मीना यांची नियुक्ती
- दिल्ली पोलिस प्रशासनावर आपला अधिकार स्पष्ट करत नायब राज्यपाल नजीब जंग यांनी पोलिस सहआयुक्त एम. के. मीना यांची भ्रष्टाचार विरोधी विभागाच्या (एसीबी) प्रमुखपदी नियुक्ती केली आहे.
- तसेच, पोलिस दलातील सात अधिकाऱ्यांचीही “एसीबी” मध्ये बदली केली आहे.
“सीव्हीसी’ (केंद्रीय दक्षता आयोग) प्रमुखपदी के. व्ही. चौधरी यांची नियुक्ती
- केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे (सीबीडीटी) माजी प्रमुख के. व्ही. चौधरी यांची आज केंद्रीय दक्षता आयोगाचे (सीव्हीसी) अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- तसेच माजी माहिती आयुक्त विजय शर्मा यांची मुख्य माहिती आयुक्त (सीआयसी) म्हणून नियुक्ती झाली आहे.
- याप्रमाणेच इंडियन बॅंकेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक टी. एम. भसीन यांची दक्षता आयुक्त म्हणून नियुक्ती झाली; तर सामाजिक न्याय विभागाचे माजी सचिव सुधीर भार्गव यांची माहिती आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
दिनविशेष:
- 1931 – ओरिसाच्या पहिल्या व एकमेव महिला मुख्यमंत्री नंदिनी सथ्पथी यांचा जन्म
- 1934 – वॉल्ट डिस्ने यांनी साकारलेला डोनाल्ड डक चा जन्म
- 1949 – मॅगसेसे पुरस्कार जिंकणारी महिला पोलिस अधिकारी किरण बेदी यांचा जन्म