Current Affairs (चालू घडामोडी) of 9 January 2015 For MPSC Exams

 

अ.क्र
ठळक घडामोडी
1. मुंबई मेट्रोच्या दरवाढीला हायकोर्टाची मजुरी
2. विद्यापीठ परीक्षा मंडळ निर्मिती योजना
3. ‘आयआयएम’ला केंद्राचे ‘गो अहेड’
4. विराट कोहलीचा नवीन विक्रम
5. गांधीजी आगमनाला शंभर वर्ष पूर्ण
6. दिनविशेष

 

 

 

 

मुंबई मेट्रोच्या दरवाढीला हायकोर्टाची मजुरी :

 • मुंबई मेट्रोच्या तिकीट दरवाढीविरोधात राज्य सरकारने दाखल केलेली याचिका फेटाळत मुंबई हायकोर्टाने मेट्रोच्या दरवाढीच्या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे.
 • मुंबई मेट्रोचे सध्याचे दर 10,15 आणि 20 रुपये असे आहे.
 • तर मेट्रोचे प्रास्ताविक दर 10,20,30 आणि 40 रुपये इतके आहेत.

विद्यापीठ परीक्षा मंडळ निर्मिती योजना :

 • दहावी-बारावी प्रमाणे महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठांच्या परीक्षा एकत्रित घेण्याचे ‘विद्यापीठ परीक्षा मंडळ ‘ निर्मितीची योजना’ तयार केली जाणार आहे.
 • या परीक्षा मंडळाचा कारभार आयएएस अधिकार्‍यांच्या देखरेखीखाली चालेल.
 • याबबाद फेब्रुवारीमध्ये राजधानीत होणार्‍या शिक्षणमंत्र्यांच्या बैठकीत अंतिम रूप येईल.
 • ‘आयआयएम’ला केंद्राचे ‘गो अहेड’ :
 • देशातील सर्वोच्च पातळीवरील व्यवस्थापन संस्था ‘आयआयएम’(इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट) नागपुरात स्थापन करण्यासाठी केंद्र शासनाने परवानगी दिली आहे.
 • ‘आयआयएम अहमदाबाद‘कडे ‘आयआयएम-नागपुरचे पालकत्व देण्यात येणार आहे.
 • 2015-16 या सत्रापासून येथे अभ्यासक्रम सुरू करण्याचे प्रयत्न राहणार आहेत.
 • ‘आयआयएम’ साठी मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर यांचा विचार करण्यात आला होता.
 • ‘आयआयएम’ साठी 200 एकर जागेचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

विराट कोहलीचा नवीन विक्रम :

 • ऑस्ट्रेलियावरील कर्णधार विराट कोहलीने नवा विक्रम प्रस्तापित केला आहे.
 • ऑस्ट्रेलियात एकाच कसोटी मालिकेत सर्वाधिक धावसंख्या करण्याच्या विक्रमाची नोंद राहुल द्रविडच्या नावावर होती.
 • हा विक्रम मोडत कर्णधार कोहलीने चार कसोटी सामन्याच्या मालिकेत सर्वाधिक म्हणजे 639 धावा काढल्या आहेत.
 • ही कसोटी सिडनी येथे खेळली जात आहे.

गांधींच्या आगमनाला शंभर वर्ष पूर्ण :

 • महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून मायदेशी परतले, त्याला आज शंभर वर्ष पूर्ण होत आहेत.
 • ते आपल्या पत्नी कस्तुरबा गांधी यांच्यासोबत मुंबई बंदरावर उतरले.
 • इंग्लंड त्यांनी बॅरिस्टर झालेले व आफ्रिकेत आफ्रिकेत वकिलीत लोकिक मिळविलेले पारंपरिक काठेवाडी पोषाखात भारतात परतले.
 • भारतीयांना अपमान व अन्याय यापासून सुटकारा देण्यासाठी ते भारतात परतले.

 

दिनविशेष :

 • 9 जानेवारीराष्ट्रीय पर्यटन दिन
 • 1880 – आदय क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना राजद्रोहाच्या आरोपावरून जन्म ठेपेची शिक्षा. त्यांना ‘तेहरान‘ या जहाजावरून एडनला पाठविण्यात आले.
 • 1940 – जर्मन विमानांनी उत्तर सागरात तीन व्यापक जहाजे बुडवली.
 • 2002 – भारतीय महिलांनी इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय क्रिकेट मालिका जिंकली.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.