Current Affairs of 9 August 2017 For MPSC Exams
चालू घडामोडी (9 ऑगस्ट 2017)
सरकारकडून परदेशस्थ भारतीयांसाठी विविध योजना :
- भारताला ‘पॉवर हाउस’ बनविण्यासाठी अनिवासी भारतीयांची मदत घेण्याचे प्रयत्न सरकारने सुरू केले आहेत.
- ‘मेक इन इंडिया’द्वारे परदेशस्थ भारतीयांनी देशात गुंतवणूक करावी, यासाठी त्यांना विविध सवलती दिल्या जात आहेत.
- अनिवासी भारतीय हे देशाचे मोठे भांडवल असून, त्याचा योग्य उपयोग करण्यासाठी विशेष योजना तयार केल्या जात आहेत.
- परदेशात मोठा व्यवसाय उभा करणाऱ्या अनिवासी भारतीयांना (एनआरआय) देशात गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देण्याकरता केंद्र सरकारने अनिवासी भारतीय आणि परदेशस्थ भारतीयांसाठी थेट परकी गुंतवणुकीचे (एफडीआय) नियम शिथिल केले आहेत.
- देशातील परकी गुंतवणुकीचा ओघ वाढण्यासाठी अनिवासी भारतीय (एनआरआय), परदेशस्थ भारतीय (ओआयसी) भारतीय वंशाचे परदेशी नागरिक (पीआयओ) यांच्यासाठी परकी गुंतवणुकीच्या (एफडीआय) नियमांत दुरुस्ती केली आहे.
- केंद्र सरकारच्या या बदलांमुळे ‘मेक इन इंडिया’ आणि ‘मेक इन महाराष्ट्र’द्वारे संरक्षण, रेल्वे, विमा, वैद्यकीय उपकरणे, मसाले या क्षेत्रात गुंतवणुकीस परदेशस्थ भारतीय उत्सुक आहेत.
Must Read (नक्की वाचा):
ऐतिहासिक आंदोलनासाठी मराठा समाज सज्ज :
- मराठा क्रांती मूक मोर्चाच्या (9 ऑगस्ट) पूर्वसंध्येलाच पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भातून हजारो नागरिक नवी मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. शाळा, महाविद्यालयांसह एपीएमसीमध्ये आंदोलकांच्या निवासाची सोय करण्यात आली आहे.
- राज्याच्या कानाकोपर्यातून येणार्या मराठा बांधवांच्या पाहुणचारासाठी शहरातील शेकडो स्वयंसेवकांनी स्वत:ला झोकून दिले असून नाष्टा, जेवणासह सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
- मोर्चासाठी रूग्णवाहिका, डॉक्टरांसह वाहन दुरूस्ती पथकही तयार केले आहे. समाजबांधवांनी लाखोंच्या संख्येने सहभागी व्हा, असे आवाहन केले आहे.
- ‘एक मराठा लाख मराठा’च्या घोषणा देत राज्याच्या विविध जिल्ह्यातून आंदोलक मुंबई, नवी मुंबईमध्ये येण्यास सुरवात झाली आहे.
विश्व बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडू टॉप टेनमध्ये :
- ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी.व्ही. सिंधू आणि जगात आठव्या क्रमांकाचा खेळाडू किदाम्बी श्रीकांत यांना 21 ऑगस्टपासून ग्लास्गो येथे होणार्या बीडब्ल्यूएफ विश्व बॅडमिंटन स्पर्धेसाठी अनुक्रमे चौथे आणि आठवे मानांकन प्राप्त झाले आहे.
- विश्व चॅम्पियनशिप स्पर्धेची 2013 आणि 2014 ची कांस्यपदक विजेती सिंधू हिला ऑलिम्पिक चॅम्पियन कॅरोलिन मारिन हिच्यानंतर ठेवण्यात आले आहे.
- 2015 मध्ये विश्व चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक मिळवणार्या आणि जगातील 16व्या क्रमांकाच्या भारताच्या सायना नेहवाल हिला 12 वे मानांकन प्राप्त झाले आहे.
- चीन तायपेची जगातील नंबर वन खेळाडू ताइ जू यिंग ही स्पर्धेतून बाहेर पडल्यामुळे जपानच्या अकाने यामागुची आणि कोरियाची सुंग जी ह्युन यांना अनुक्रमे पहिले आणि दुसरे मानांकन प्राप्त झाले आहे.
- इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये सलग विजेतेपद पटकाविणार्या आठव्या मानांकित श्रीकांतचा मानांकनात दोन वेळा ऑलिम्पिक विजेत्या चीनच्या लिन डेननंतर क्रमांक लागतो.
- तसेच इतर भारतीयांमध्ये अजय जयराम आणि बी.साई प्रणीत यांना अनुक्रमे 13 व 15 वे मानांकन प्राप्त झाले आहे.
अभियांत्रिकीसाठी राज्यात सीईटी आवश्यक :
- राज्यातील प्रथम वर्ष अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमामध्ये प्रवेशासाठी राज्यस्तरावरील सामाईक प्रवेश परीक्षाच (एमएचटी-सीईटी) राहणार असल्याचे तंत्रशिक्षण संचालनालयाकडून (डीटीई) स्पष्ट करण्यात आले आहे.
- राज्य शासनाने पुढील शैक्षणिक वर्षासाठी ‘सीईटी’ची तयारी करण्याबाबत ‘डीटीई’ला पत्राद्वारे कळविले आहे. त्यामुळे सध्या तरी संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई) की सीईटी हा विद्यार्थ्यांमध्ये असलेला संभ्रम दूर होणार आहे.
- चालू शैक्षणिक वर्षापासून देशपातळीवरील वैद्यकीय शिक्षण संस्थांमधील प्रवेशासाठी नॅशनल इलिजिबिलिटी एन्ट्रन्स टेस्ट (नीट) घेण्यास सुरुवात झाली आहे.
- राज्यातील अभियांत्रिकी प्रवेश यंदा सीईटीमार्फत करण्यात आले. देशपातळीवर संस्थांमधील प्रवेशासाठी जेईई बंधनकारक होती.
- ‘नीट’च्या पार्श्वभूमीवर पुढील वर्षीपासून अभियांत्रिकी प्रवेशासाठी ‘जेईई’ ही एकच परीक्षा असणार की नाही, याबाबत विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.
- तसेच ‘डीटीई’च्या अधिकार्यांनाही याबाबत ठामपणे काहीही सांगता येत नव्हते. त्यामुळे राज्य शासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. याबाबत शासनाने ‘डीटीई’ला 24 जुलै रोजी पत्राद्वारे कळविले आहे. त्यामध्ये शैक्षणिक वर्ष 2018-19 मध्ये राज्यात ‘सीईटी’ घेण्याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा