Current Affairs of 8 June 2015 For MPSC Exams
आज दहावीचा ऑनलाइन निकाल
- राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतलेल्या दहावी परीक्षेचा ऑनलाइन निकाल आज दुपारी एक वाजता संकेस्थळांवर (ऑनलाइन) जाहीर होईल.
- विद्यार्थ्यांना 15 जून रोजी दुपारी तीन वाजता शाळांतून गुणपत्रके मिळतील.
- हा निकाल एसएमएसच्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांना मिळेल.
- बीएसएनल मोबाईलधारकांना 57766 या क्रमांकावर MHSSC< (स्पेस) परीक्षा क्रमांक > याप्रमाणे एसएमएस पाठवून निकाल समजेल.
- आयडिया, व्होडाफोन, एअरसेल, रिलायन्स, युनिनॉर कंपन्यांच्या मोबाईलवरुनही MH 10 (स्पेस) परीक्षा क्रमांक असा एसएमएस 58888111 यावर पाठविल्यानंतर निकाल समजेल.
- एअरटेल मोबाईलवरून निकाल पाहण्यासाठी MH 10 (स्पेस) परीक्षा क्रमांक याप्रमाणे एसएमएस 527011 या क्रमांकावर पाठवावा.
निकालासाठी खालील संकेतस्थळे पाहा-
www.mahresult.nic.in
www.knowyourresult.com/MAHSSC
अटलबिहारी वाजपेयी यांना “युद्धमुक्ती सन्मान’ पुरस्कार
- बांगलादेश सरकारकडून देण्यात येणारा अत्यंत प्रतिष्ठेचा “युद्धमुक्ती सन्मान‘ पुरस्कार माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना आज प्रदान करण्यात आला.
- बांगलादेशच्या मुक्ती संग्रामात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल आणि दोन देशांमधील मैत्रीचे संबंध दृढ करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
भारताकडून बांगलादेशात दोन विशेष आर्थिक क्षेत्र
- भारताने द्विपक्षीय व्यापार वाढविण्याचा हेतूने बांगलादेशने दोन विशेष आर्थिक क्षेत्र (सेज) स्थापन करण्याची घोषणा केली आहे.
- त्याअंतर्गत भारतीय आयुर्विमा महामंडळाला (एलआयसी) बांगलादेशात विमा व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
दिनविशेष:
- 1936 – इंडियन स्टेट बॉडकास्टिंग सर्व्हिसचे नामांतरण होऊन ऑल इंडिया रेडीओ असे झाले.