Current Affairs of 8 July 2018 For MPSC Exams
चालू घडामोडी (8 जुलै 2018)
नीट, जेईई आता वर्षांतून दोनदा :
- संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई), राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट) आता वर्षांतून दोन वेळा देता येणार आहेत.
- यासह सर्व राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा नव्याने स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय परीक्षा संस्थेद्वारे (एनटीए) घेण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली आहे.
- तसेच राष्ट्रीय पात्रता परीक्षा (एनईटी) ही या स्वतंत्र संस्थेमार्फत घेतली जाणारी पहिली परीक्षा असेल. ही परीक्षा डिसेंबरमध्ये होईल.
- याआधी ही परीक्षा विद्यापीठ ‘जेईई’ (मुख्य) ही परीक्षा जानेवारी आणि एप्रिल, तर ‘नीट’ फेब्रुवारी आणि मे अशी वर्षांतून दोन वेळा घेण्यात येणार आहे.
- त्याशिवाय व्यवस्थापन अभ्यासक्रमांसाठीची सीमॅट, औषधनिर्माण पदवी कलचाचणी (जीपॅट) या परीक्षाही याच संस्थेमार्फत घेतल्या जाणार आहेत.
- मात्र, जेईई अॅडव्हान्सची प्रक्रिया आयआयटीकडेच ठेवण्यात आली आहे.
राणी रामपालकडे महिला हॉकी संघाचं नेतृत्व :
- आशियाई खेळांसाठी निवडण्यात आलेला भारताचा महिला हॉकी संघ आगामी आशियाई खेळांसाठी हॉकी इंडियाने महिला संघाची घोषणा केलेली आहे.
- तर 18 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान जकार्ता येथे आशियाई खेळांचं आयोजन करण्यात आलेलं आहे.
- तसेच राणी रामपालकडे महिला हॉकी संघाचं नेतृत्व असणार आहे.तर सविता हि उपकर्णधार असणार आहे.
Must Read (नक्की वाचा):
रिलायन्सच्या अध्यक्षपदी पुन्हा मुकेश अंबानी :
- रिलायन्स इंडस्ट्रीजच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी शेअरधारकांनी मुकेश अंबानी यांना पाच वर्षांसाठी मुदतवाढ दिली आहे.
- तर अंबानी हे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मंडळावर 1977 पासून आहेत.
- त्यांना धीरूभाई अंबानी यांच्या निधनानंतर जुलै 2002 मध्ये कंपनीचे अध्यक्ष करण्यात आले होते.
- मुंबई येथे 5 जुलैला झालेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
- तसेच ठरावानुसार मुकेश अंबानी यांना वार्षिक 4.17 कोटी वेतन व 59 लाख रुपयांचे इतर भत्ते देण्यात येतील.
- तर यात निवृत्तीच्या लाभांचा समावेश नाही. निव्वळ नफ्याच्या आधारे मुकेश हे बोनसला पात्र असतील.
गाडी चालवताना मोबाईलवर बोलणाऱ्या चालकांचे मोबाईल जप्त करा:
- उत्तराखंडमध्ये गाडी चालवताना मोबाईलवर बोलणाऱ्या वाहनचालकांचे मोबाईल किमान एक दिवसासाठी तरी जप्त करा, असे निर्देश उत्तराखंड हायकोर्टाने दिले आहेत.
- तसेच राज्यातील सर्व रस्त्यांचे रोड सेफ्टी ऑडीटही करावे, असे आदेश हायकोर्टाने सरकारला दिले आहेत.
- उत्तराखंड हायकोर्टाचे न्या. राजीव शर्मा यांनी रस्ते सुरक्षासंदर्भात राज्य सरकारला निर्देश दिले आहेत.
- वाहन चालवताना मोबाईलवर बोलणारे वाहनचालक हे दुसऱ्यांचा जीव धोक्यात हायकोर्टाने गेल्या महिन्यातही गाडी चालवताना मोबाईलवर बोलणाऱ्या वाहनचालकांकडून 5 हजार रुपये दंड आकारण्याचे निर्देश दिले होते.
गणेशोत्सव मंडळांना मिळणार ‘ऑनलाइन’ परवानगी :
- मुंबईत या वर्षीपासून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ऑनलाइन पद्धतीने मंडपाची परवानगी मिळणार आहे.
- मंडपाचा आकार, रस्ते आदींबाबत उच्च न्यायालयाने निश्चित केलेल्या निकषानुसार या परवानगी देण्यात येणार आहेत.
- मात्र, ही परवानगी गणेशोत्सवाच्या किमान एक महिना आधी मिळावी, अशी मागणी मंडळांनी लावून धरली आहे.
- मंडप उभारण्याच्या परवानगीसाठी 15 जुलैपासून सार्वजनिक गणोशोत्सव मंडळांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
- त्यानंतर, वाहतूक व स्थानिक पोलिसांची ना हरकत मिळताच मंडळांना ही परवानगी देण्यात येणार आहे.
साहित्याचे पर्यायी नोबेल :
- नोबेल पुरस्कार देणाऱ्या ‘रॉयल स्वीडिश अॅकॅडमी’ने यंदाच्या नोबेल साहित्य पुरस्काराची घोषणा बेमुदत पुढे ढकलल्यानंतर स्वीडनमधील 100 हून अधिक प्रमुख बुद्धिवंतांनी एकत्र येऊन पर्यायी नोबेल पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे.
- रॉयल स्वीडिश अकादमीच्या ’पक्षपात, उद्दामपणा व लैंगिक व्यभिचारा’चा निषेध करत 107 मान्यवर लेखक, प्रकाशक, कलावंत व पत्रकारांनी एकत्र येऊन यासाठी ‘ न्यू अॅकॉडमी’ची स्थापना केल्याचे एका संयुक्त निवेदनाव्दारे जाहीर केले आहे.
- साहित्यासाठीचा पर्यायी नोबेल पुरस्कार 10 लाख क्रोनर (सुमारे 1,30 लाख डॉलर) असेल. यासाठी लोकवर्गणी व देणग्यांमधून निधी उभा केला जाईल.
- एरवी नोबेल साहित्य पुरस्काराची घोषणा होते तेव्हाच म्हणजे 14 ऑक्टोबर रोजी या पर्यायी पुरस्काराचा विजेता जाहीर केला जाईल व ज्या दिवशी सर्व नोबेल पुरस्कारांचे स्वीडनच्या राजांच्या हस्ते वितरण होते दिवशी (10 डिसेंबर) हा पुरस्कारही वेगवेगळ्या कार्यक्रमात प्रदान केला जाईल.
दिनविशेष :
- 8 जुलै 1497 ला वास्को द गामा भारताच्या पहिल्या सफरीवर निघाले.
- 8 जुलै 1889 मध्ये द वॉल स्ट्रीट जर्नलचा पहिला अंक प्रकाशित झाला.
- स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 8 जुलै 1910 ला मोरिया या जहाजातुन फ्रान्समधील मार्सेल्सच्या समुद्रात उडी घेतली.
- रुपयाचे नवीन चिन्ह असलेली नाणी 8 जुलै 2006 मध्ये चलनात आली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा