Current Affairs of 8 February 2018 For MPSC Exams

चालू घडामोडी (8 फेब्रुवारी 2018)

चालू घडामोडी (8 फेब्रुवारी 2018)

ट्रॅपिस्ट 1 ताऱ्याभोवती पृथ्वीसारखे सात ग्रह :

 • पृथ्वीपासून 40 प्रकाशवर्षे अंतरावर असलेल्या ट्रॅपिस्ट 1 या लाल ताऱ्याभोवती एकूण सात पृथ्वीसदृश ग्रह सापडले असून तेथे जीवसृष्टीस आवश्यक असलेला पाणी हा घटक असण्याची शक्यता आहे.
 • ट्रॅपिस्ट 1 ग्रहमाला गेल्या वर्षी 2016 मध्ये सापडली असून त्याचे आणखी संशोधन करण्यात आले असता तेथे पृथ्वीसारखे सात ग्रह सापडले आहेत. तसेच ते पृथ्वीइतक्या आकाराचे असून त्यांची नावे ट्रॅपिस्ट 1 बी, सी,डी इ, एफ व एच अशी आहेत.
 • युरोपियन सदर्न ऑब्झव्‍‌र्हेटरीत स्वित्र्झलडच्या बर्न विद्यापीठाचे सिमॉन ग्रीम यांनी संगणकीय प्रारूपांच्या मदतीने हे संशोधन केले असून त्यात ग्रहांच्या घनताही ठरवल्या आहेत.
 • तर ट्रॅपीस्ट 1 बी व सी यांचा गाभा खडकाळ असून त्यांचे वातावरण पृथ्वीपेक्षा दाट आहे. ट्रॅपिस्ट 1 डी हा हलका असून त्याचे वस्तुमान पृथ्वीच्या तीस टक्के आहे. ट्रॅपिस्ट 1 इ हा पृथ्वीपेक्षा जास्त घनता असलेला ग्रह असून त्याचा गाभा लोहाचा असावा. ट्रॅपिस्ट 1 इ हा इतर ग्रहांपेक्षा जास्त खडकाळ आहे. ट्रॅपिस्ट 1 एफ, जी, एच हे ताऱ्यापासून दूर असल्याने तेथे बर्फ असू शकतो. जास्त घनता असलेले पण ताऱ्याच्या जवळ नसलेले ग्रह यात आहेत, असे झुरिच विद्यापीठाच्या कॅरोलिन डॉर्न यांनी सांगितले आहे.

देशाच्या इतिहासात प्रथमच अवकाशस्थानकात बॅडमिंटनचा सामना खेळला गेला :

 • अवकाशवीरांनी देशाच्या इतिहासात प्रथमच अवकाशस्थानकात बॅडमिंटनचा सामना खेळला तर रशियाच्या रॉसकॉसमॉस या अवकाश संशोधन संस्थेने त्याचा व्हिडिओ जारी केला असून त्यात रशिया, अमेरिका, जपानचे अवकाशवीर सहभागी होते. तसेच अवकाशात बॅडमिंटनचा सामना खेळण्याची ही पहिलीच वेळ होती.
 • रशियाचे अवकाशवीर अलेक्झांडर मिसुरकिन व अँटन शाकापलेरोव विरुद्ध अमेरिकेचा मार्क व्हँड हेइ व जपानचा नोरिशिंगे कनाई यांच्यात हा सामना झाल्याचे रॉसकॉसमॉसने म्हटले आहे.
 • तर या क्रीडा सामन्यांमुळे मानसिक विश्रांती मिळते, त्यामुळे इतर यानांमध्ये अशा प्रकारचा स्वतंत्र कक्ष असणे आवश्यक आहे.

RBI  च्या रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये कोणतेही बदल नाहीत :

 • रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपले तिमाही पतधोरण जाहीर केले असून त्यामध्ये रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत तर रेपो रेट 6 टक्के तर रिव्हर्स रेपो रेट 5.75 टक्के असाच कायम ठेवण्यात आला आहे.
 • सलग तिसऱ्यांदा आरबीआयने रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तसेच व्याजदरांमध्येही कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
 • देशभरातील बँका जेव्हा रिझर्व्ह बँकेकडून अल्पमुदतीचं कर्ज घेतं त्यावेळी जो दर रिझर्व्ह बँक आकारते त्याला रेपो रेट म्हणतात. तर ज्यावेळी बँका आपल्याकडचा अधिक असलेला निधी रिझर्व्ह बँकेकडे अल्पमुदतीसाठी जमा करते, त्यावेळी जो व्याजदर आरबीआय देते त्याला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात.

‘स्पेस एक्स फाल्कन हेवी’  रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण :

 • अमेरिकेच्या स्पेसएक्स SpaceX कंपनीने जगातील सर्वाधिक ताकदीच्या ‘स्पेस एक्स फाल्कन हेवी’ या रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे.
 • फ्लोरिडातील केनेडी स्पेस सेंटर येथील नासाच्या ऐतिहासिक प्रक्षेपण केंद्रातून ‘फाल्कन’ अवकाशात पाठवले गेले आहे. तसेच या रॉकेटसोबत एलन मस्कची स्पोर्ट्स कारही अवकाशात पाठवण्यात आली आहे.
 • ‘फाल्कन’ 63.8 टन वजनांचे रॉकेट असून, हे वजन जवळपास दोन अंतराळ यानांच्या बरोबरीचे आहे. तसेच सेच 130 फूट लांबीच्या या रॉकेटमध्ये 27 मर्लिन इंजिन लावण्यात आले आहेत.
 • तर हे जगातील सर्वाधिक ताकदीचे हे रॉकेट टेस्लातील अब्जाधीश एलन मस्क यांच्या ‘स्पेसएक्स’ कंपनीने तयार केले आहे.

 

दिनविशेष :

 • 1714 : छत्रपती शाहू महाराज आणि सरखेल कान्होजी आंग्रे यांच्यात वळवंड येथे तह झाला.
 • 1849 : रोमन प्रजासत्ताकची रचना करण्यात आली.
 • 2000 : छत्रपती शिवाजी महाराज जयंती 19 फेब्रुवारीस करण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.