Current Affairs (चालू घडामोडी) of 8 December 2014 For MPSC Exams
अ.क्र |
ठळक घडामोडी |
1. | ‘जीसॅट-16’ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण |
2. | राज्यात साक्षरतेचे प्रमाण 83% वर |
3. | राज्यभरात आता एकच ‘हेल्पलाईन’! |
4. | ‘वर्ल्ड कप फोटो कॉन्टेस्ट ‘मध्ये बैजू पाटील यांना ब्रांझ |
5. | नॅनो वायरमुळे पेशींना मिळणार संरक्षणकवच |
6. | विक्रमी तिरंगा! |
‘जीसॅट-16’ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण :
- दळणवळणासाठी उपयोगी असणार्या भारताच्या ‘जीसॅट-16‘ या उपग्रहाची रविवार पहाटे फ्रेंच गयानातील कोउरूयेथून अंतराळात यशस्वी प्रेक्षेपण करण्यात आले.
- ‘जीसॅट-16’ वर दळनवळनासाठी 48 ट्रान्सपॉडर्सं बसविण्यात आले आहेत.
- रेडियो, टीव्ही आणि इंटरनेट व टेलिफोनसेवेसाठी हा उपग्रह उपयुक्त ठरणार आहे.
- ‘जीसॅट-16’चे वजन 3 हजार 181.1 किलोग्राम एवडे असून, या उपग्रहावर 48 संवाद ट्रान्सपॉडर्सं बसविण्यात आले आहे.
- राज्यात साक्षरतेचे प्रमाण 2001 ते 2011 या कलावधीत 77% होते व आता ते 83% वर आहे.
- ‘युनिसेफ‘च्या अहवालात ही माहिती देण्यात आली.
- सर्व हेल्पलाईन नंबर लवकरच गोठवून एकच लक्षात राहील, असा कॉमन हेल्पलाईन नंबर लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
- राज्यातील कुठल्याही भागातून दूरध्वनी व मोबाईल फोनेद्वारे या या हेल्पलाईनवर संपर्क साधता येणार आहे.
- या क्रमांकावर नैसर्गिक आपत्ती तसेच इतर कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत मदत मागता येणार आहे.
- वन्यजीव छायाचित्रणामध्ये नावाजलेल्या तसेच फेडरेशन इंटरनॅशनल डेल आर्ट फोटोग्राफीच्या(एफआयएपी) वर्ल्ड कप फोटो कॉन्टेस्टमध्ये प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार बैजू पाटील यांना ब्रान्स पदक मिळाले.
- या स्पर्धेत 24 देशाच्या 15 छायाचित्रकारांनी भाग घेतला होता.
- यांनी जायकवाडी धरणात काढलेल्या छोट्या शराटी या पक्ष्याच्या फोटोची निवड करण्यात आली.
- दर पाच वर्षानी ही स्पर्धा घेण्यात येते.
- दक्षिण आफ्रिका सर्वप्रथम क्रमांक.
- इटली– सुवर्ण पदक
- फ्रान्सला – रोप्य पदक
- मानवी शरीरातील पेशींसाठी धोकादायक ठरणार्या ऑक्साइडमुळे कृत्रिम पद्धतीने नियंत्रण मिळविता येणे शक्य असल्याचे बंगळूरच्या विज्ञान शाखेने सिद्ध केले आहे.
- त्यामुळे आता नॅनो वायरमुळे पेशींना संरक्षणकवच मिळणार आहे.
- नॅनो वायर ही सर्वात सूक्ष्म नॅनो संरचना म्हणून ओळखली जाते.
- त्याचा व्यास दहाचा उणे नववा घात एवडा सूक्ष्म असतो.
विक्रमी तिरंगा! :
- चेन्नईत रविवारी मानवी तिरंगी झेंडा तयार करण्याचा जगातील विक्रम प्रस्थापित करण्यात आला.
- 50 हजार युवकांनी एकत्र येऊन माय फ्लँग माय इंडिया या मोहिमेंतर्गत हा झेंडा साकारला.
- यावेळी सुमारे दीड लाख प्रेक्षक उपस्थित होते.
- यापूर्वी पाकिस्तानात 28,957 लोकांनी अशा प्रकारचा झेंडा साकारला होता.
- हा विश्वविक्रम भारताने मोडला आहे.
दिनविशेष :
- आज जागतिक मतिमंद पुनर्वसन दिन.
- 1937 : भारतीय पहिली दुमजली बस मुंबईत धावू लागली.
- 1985 : सार्क परिषद स्थापन.
- 2004 : रविंद्रनाथ टागोरांच्या चोरीस गेलेल्या नोबेल पदकाची प्रतिकृती स्वीडन सरकारने भेट म्हणून दिली.
- 2004 : ख्रिश्चन ज्युनिअर या फूटबॉलपटूच्या मृत्यूस कारण ठरल्याबद्दल मोहन बागानचा गोली सुब्रतो पॉलवर बंदी.