Current Affairs of 7 July 2015 For MPSC Exams

Current Affairs of 7 July 2015

इस्रो करणार “वजनदार” व्यावसायिक उड्डाण

  • 1440 किलोच्या पीएसएलव्ही उपग्रहाचे तिसावे उड्डाण 10 जुलैला श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून होणार आहे.
  • या वेळी भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) ब्रिटनचे सुद्धा पाच उपग्रह मंगळाच्या कक्षेत पोचविणार आहे. हे इस्रोचे इतक्‍या प्रचंड क्षमतेचे पहिलेच व्यावसायिक उड्डाण असणार आहे हे विशेष.
  • पीएसएलव्ही-सी 28 हा उपग्रह, ब्रिटनमधील सरे सॅटेलाइट टेक्‍नॉलॉजी (एसएसटीएल) या संस्थेत बनविलेले तीन ऑप्टिकल अर्थ सॅटेलाईट्‌सचे (डीएमसी 3) इस्रो प्रक्षेपण करणार आहे.
  • या प्रत्येक उपग्रहाचे वजन 447 किलोग्रॅम असणार आहे.

जगातील सर्वांत वयोवृद्ध व्यक्तीचे निधन

  • जगातील सर्वांत वयोवृद्ध व्यक्ती असलेले जपानमधील साकारी मोमोई (वय 112) यांचे निधन झाले आहे.
  • उत्तर टोकियोमधील सईतामा शहरात साकारी मोमोई राहत होते. त्यांचा राईट बंधुंनी विमानाचा शोध लावण्यापूर्वी जन्म झाला होता.
  • साकारी यांना गेल्या वर्षी जगातील सर्वांत वृद्ध व्यक्ती म्हणून घोषित करण्यात आले होते.

भारत आणि बांगलादेशचे नागरिकत्व निवड सर्वेक्षण

  • भारत आणि बांगलादेश यांनी ऐतिहासिक भूसीमा करारांतर्गत एकमेकांच्या सीमाक्षेत्रातील 162 वस्त्यांमध्ये राहणाऱ्या 51 हजार 584 लोकांच्या राष्ट्रीयत्वाची निवड नोंदविण्यासाठी एक संयुक्त सर्वेक्षण सुरू केले आहे.
  • 50 पथकांनी बांगलादेशमधील 111 भारतीय वस्त्यांची आणि 25 पथकांनी भारतात 51 अशाच वस्त्यांच्या सर्वेक्षणास सुरवात केली आहे. हे सर्वेक्षण 31 जुलै पर्यन्त पूर्ण करायचे आहे.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.