Current Affairs (चालू घडामोडी) of 7 December 2014 For MPSC Exams

 

अ.क्र
ठळक घडामोडी
1. नव्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर
2. रेल्वे क्षेत्रात 20% परकीय गुंतवणुकीला मान्यता
3. बाबासाहेबांच्या स्मारकाचे भूमिपूजन 14 एप्रिलला
4. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’
5. मंगळाच्या दिशेने मानवाचे पाऊल
6. चीन उभारणार ‘मेट्रो नेटवर्क’ 
7. आशा भट्टने जिंकला “मिस सुप्रा नॅशनल” पुरस्कार

 

 

नव्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर :
  • भाजपचे कॅबिनेट मंत्री :
  • गिरीश बापट – विधिमंडळ कामकाज आणि अन्न व नागरी पुरवठा
  • गिरीश महाजन – जलसिंचन
  • बबनराव लोणीकर – पाणीपुरवठा व स्वच्छता
  • राजकुमार बडोळे – सामाजिक न्याय
  • चंद्रशेखर बावनकुळे – ऊर्जा
  • राज्यमंत्री:
  • राम शिंदे – गृह, पणन, सार्वजिक आरोग्य, पर्यटन
  • महाराज अमरीश अत्राम – आदिवासी विकास
  • प्रविण पोटे – उद्योग व खनिकर्म, पर्यावरण, सार्वजनिक बांधकाम
  • विजय देशमुख – सार्वजनिक बांधकाम, परिवहन, कामगार, वास्रोद्योग
  • शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री :
  • सुभाष देसाई – उद्योग
  • दिवाकर रावते – वाहतूक
  • एकनाथ शिंदे सार्वजनिक बांधकाम
  • रामदास कदम – पर्यावरण
  • डॉ. दीपक सावंत – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
  • राज्यमंत्री :
  • दीपक केसरकर – वित्त, ग्रामविकास
  • रविंद्र वायकर – गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण
  • विजय शिवतारे – जलसंपदा, जलसंधारण
  • संजय राठोड – महसूल

 

रेल्वे क्षेत्रात 20% परकीय गुंतवणुकीला मान्यता : 
  • सीएसटी पनवेल या जलदगती रेल्वेमार्गासाठी सरकारने परकीय गुंतवणुकीचा पर्याय अजमवण्याचे ठरविले आहे.
  • सुरवातीला 20% परकीय गुंतवणुकीला मान्यता देण्याचा विचार.
  • 14,000 कोटी खर्च अपेक्षित आहे.
  • हा 49 किलोमीटर जलदगती रेल्वेमार्ग आहे.
  • सव्वा तासाचे अंतर केवळ 27 मिनिटात कापता येईल.
बाबासाहेबांच्या स्मारकाचे भूमिपूजन 14 एप्रिलला :
  • भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील इंदु मिल येथे उभारण्यात येणार्‍या स्मारकाचे भूमिपूजन त्यांच्या जयंतीदिनी म्हणजे 14 एप्रिल रोजी होणार.

 

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’: 
  • सुप्रसिद्ध, ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना दुबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात देण्यात येणार ‘जीवन गौरव पुरस्कार‘ जाहीर झाला आहे.
  • हा चित्रपट महोत्सव 10 ते 17 डिसेंबर या कालावधीत होणार आहे.
  • आशा भोसले यांनी 12 हजारांहुन अधिक गाणी गात विश्वविक्रम केला आहे.

 

मंगळाच्या दिशेने मानवाचे पाऊल :
  • अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्थेने (नासा) आज “ओरायण” हे अवकाश यान आकाशात सोडत नवा अध्याय रचला आहे.
  • या यानाच्या सहयाने मानवाला मंगळावर पाठविण्याची तयारी “नासा”ने पूर्ण केली.
  • या यानाचा प्रवास फक्त चारच तासाचा होता.
  • वैशिष्टे
  • अवकाशयानावर 1200 सेन्सर्स.
  • 11 फुट उंच आणि 16.5 फुट पाया
  • रॉकेटसाह ऊंची : 242 फुट
  • वजन : 1.6 दशलक्ष टन

 

चीन उभारणार ‘मेट्रो नेटवर्क’ :
  • देशाच्या विविध भागांमध्ये 2020 पर्यंत सुमारे साडेआठ हजार किमी लांबीची मेट्रो रेल्वे जाळे उभे करण्यात येणार असल्याचे येथील चीन सरकारने आज जाहीर केले.

 

आशा भट्टने जिंकला “मिस सुप्रा नॅशनल” पुरस्कार :
  • हा पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला.
  • पोलंड येथील वारसा या शहरात काल रात्री झालेल्या स्पर्धेत 70 देशांच्या सुंदर्‍यांना आशाने मागे सारत मिस सुप्रा नॅशनल पुरस्कार जिंकला.
  • तिला 25 हजार अमेरिकन डॉलरने सन्मानीत करण्यात आले.

दिनविशेष :

  • 1625 : बाष्पशक्तिवर चालणारे ‘एंटरप्राईज‘ हे भारतात आलेले पहिले जहाज.
  • 1856 : पहिला उच्चवर्णीय विधवा विवाह कोलकात्यात पार पडला.
  • 1941 : पर्ल हर्बरवर 360 जपानी विमानांनी हल्ला चढविला. यात 2,729 अमेरिकी सैनिक मारले गेले. या घटनेने अमेरिकेने दुसर्‍या महायुद्धात प्रवेश केला.
  • 1994 : यू.आर.आनंतमूर्ती यांना ज्ञानपीठ परितोषिक जाहीर.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.