Current Affairs (चालू घडामोडी) of 6 March 2015 For MPSC Exams

 

अ.क्र
ठळक घडामोडी
1. पुन्हा येणार एक रुपयाची नोट
2. दानवेंचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा
3. इस्त्रोच्या दिशादर्शक उपग्रहाचे उड्डाण लांबणीवर
4. मुस्लिम आरक्षण आखेर रद्द

 

 

 

 

पुन्हा येणार एक रुपयाची नोट :

  • तब्बल 20 वर्षाच्या कालावधीनंतर सरकारने पुन्हा एक रुपयाची नोट चलनात आणण्याचा निर्णय घेतला आहे.
  • भारतीय रिझर्व्ह बँकेने यासंदर्भात परिपत्रक जारी केले असून, त्यामध्ये लवकरच एक रुपये मूल्याच्या नोटांची छपाई करणार असल्याचे म्हटले आहे.
  • नोटवर अशोक स्तंभाचे चिन्ह असेल. मात्र, या अशोक स्तंभावर ‘सत्यमेव जयते’ या अक्षरांची छपाई करणार नसल्याचे रिझर्व्ह बँकेच्या पत्रकात म्हटले आहे.
  • 9.7 बाय 6.6 सेंटीमीटर आकारात या नोटांची छपाई करण्यात येणार आहे.

दानवेंचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा :

  • भाजपाचे अध्यक्ष खासदार रावसाहेब दानवेंनी केंद्रीय राज्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत.
  • दानवेंच्या जागी रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांचे नाव सुचवण्यात येत आहे.

इस्त्रोच्या दिशादर्शक उपग्रहाचे उड्डाण लांबणीवर :

  • आयआयएनएसएस 1 डी या भारताच्या चौथ्या दिशादर्शक उपग्रहाचे उड्डाण 9 मार्चला होणार होणार होते, परंतु ते तांत्रिक कारणास्तव लांबणीवर टाकण्यात आले आहे.

मुस्लिम आरक्षण आखेर रद्द :

  • मुस्लिमांना मिळालेले 5% आरक्षण आखेर रद्द करण्यात आले आहे.
  • राज्य सरकारने याबाबद आदेश काढून मुस्लिम आरक्षण रद्द झाल्याचे शिक्कामोर्तब केले.
You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.