Current Affairs of 6 June 2015 For MPSC Exams

Current Affairs

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दोन दिवसांच्या दौऱ्यावर रवाना :

 • बांगलादेशाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी रवाना झाले.

  Narendr Modi

 • उभय देशांतील संबंध व सहकार्य अधिक प्रगाढ करणे, त्याची व्याप्ती आणखी विस्तृत करणे यावर भर दिला जाणार आहे.
 • तसेच ऊर्जा, विद्युत आणि संपर्क व जोडणी हे मुद्दे या दौऱ्याचे मुख्य उद्दिष्ट असणार आहे.
 • बांगलादेश, भूतान, नेपाळ व भारत यांच्यात मोटार वाहनविषयक उपविभागीय करार होणे अपेक्षित आहे आणि लवकरच त्यावर स्वाक्षऱ्या होतील आणि त्याबाबत बांगला देशाच्या नेतृत्वाबरोबर चर्चा होईल, असे जयशंकर यांनी सांगितले.
 • तसेच तीस्ता नदी पाणीवाटपाचा विषय या दौऱ्यात उपस्थित केला जाणार नसला तरी इतर नद्यांच्या पाणी वाटपाप्रमाणेच दोन्ही देशांदरम्यान नद्यांतून जलवाहतूक करण्याबाबतही चर्चा होणे अपेक्षित आहे.
Must Read (नक्की वाचा):

Current Affairs of 5 June 2015

महाराष्ट्र आणि नेदरलॅंडस्‌ यांच्यात आज द्विपक्षीय करार होणार :

 • महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर करणे, काढणीपश्‍चात तंत्रज्ञान उपलब्ध करणे, नैसर्गिक आपत्तीशी मुकाबला करणे, हरितगृहे याबाबत सहकार्य करणारा द्विपक्षीय करार महाराष्ट्र आणि नेदरलॅंडस्‌ यांच्यात आज होणार आहे.
 • माहिती कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी आज येथे दिली.
 • विकसित तंत्रज्ञान उपलब्ध व्हावे, यादृष्टीने करार केला जाणार आहे.Ekanath Khadase
 • या बैठकीत राज्याचे कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय विभाग व नेदरलॅंड देशाचे कृषी व व्यापार विभाग यांच्यात हा परस्पर सामंजस्य करार होणार आहे.

फेसबुकची मेसेंजरद्वारे स्थान नकाशाच्या माध्यमातून पाठविण्याची नवी सुविधा सादर :

 • फेसबुकने आपल्या मेसेंजरद्वारे आपण जेथे आहोत ते स्थान नकाशाच्या माध्यमातून मित्राला पाठविण्याची नवी सुविधा सादर केली आहे.
 • फेसबुकने आपल्या मेसेंजरद्वारे आपले सध्याचे स्थान चित्रमय स्वरुपात नकाशाद्वारे दर्शविण्याची सुविधा सादर केली आहे.

  Facebook.com

 • फेसबुकच्या मेसेंजरमध्ये ही सेवा वापरण्याची सोय करण्यात आली आहे.
 • आपल्या स्थानाबाबतची गोपनीयता ठेवण्याचे अधिकार युजर्सना देण्यात आले आहेत.
 • आजपासून निवडक देशातील युजर्सना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.
 • मात्र जगातील सर्व युजर्सना ही सेवा केव्हापासून उपलब्ध होईल, तसेच सध्या कोणकोणत्या देशात ही सेवा सुरू करण्यात आली आहे याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.