Current Affairs of 5 March 2018 For MPSC Exams

चालू घडामोडी (5 मार्च 2018)

चालू घडामोडी (5 मार्च 2018)

पाकिस्तानमध्ये पहिल्यांदाच हिंदू महिला सिनेटर :

 • मुस्लीम बहुल पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील थार येथे राहणाऱ्या कृष्णाकुमारी कोहली सिनेटर होणाऱ्या पहिला हिंदू-दलित महिला ठरल्या आहेत.
 • 39 वर्षीय कोहली बिलावल भुट्टो झरदारी यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान पीपल्स पार्टीकडून (पीपीपी) निवडून आल्या आहेत. पाकिस्तानच्या एका दिलेल्या वृत्तानुसार, कृष्णा यांनी तालिबानशी निगडीत एका मौलानाचा पराभव केला आहे.
 • सिनेटवर कृष्णा यांचा विजय हा पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकांसाठींचा अधिकार आणि महिलांसाठी मैलाचा दगड ठरणार असल्याचे मानले जात आहे.
 • कोहली या सिंध प्रांतातील थारमधील नगरपारकर जिल्ह्यात राहणाऱ्या आहेत. एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या कृष्णा यांचे वडील शेतकरी होते. 1979 मध्ये कृष्णा यांचा जन्म झाला.
 • कृष्णा या आपल्या भावाबरोबर कार्यकर्ता म्हणून पीपीपीमध्ये सहभागी झाल्या होत्या. थारमधील लोकांसाठी त्यांनी कार्य केले आहे. 2005 पासून त्यांनी समाजिक कार्यकर्त्या म्हणून काम करण्यास सुरुवात केली.
 • तसेच 2007 मध्ये इस्लामाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘मेहेरगढ ह्युमन राइट्स युथ लिडरशिप ट्रेनिंग कॅम्प’साठी त्यांची निवड झाली होती.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (4 मार्च 2018)

व्हॉट्सअ‍ॅप संदेश आता काही वेळानंतरही काढता येणार :

 • व्हॉट्सअ‍ॅप संदेश सेवेत एकदा पाठवलेला संदेश पुन्हा रद्द करता येत नव्हता. नंतर अलीकडे तो काढून टाकता येऊ लागला होता, पण तो सात मिनिटांच्या आतच काढून टाकणे शक्य होते. यापुढे डिलिट फॉर एव्हरीवन या वैशिष्टय़ाच्या मदतीने 68 मिनिटे म्हणजे 4096 सेकंदात तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवरचा संदेश काढून टाकू शकता.
 • व्हॉट्सअ‍ॅपच्या बिटा आवृत्ती वापरणाऱ्यांना ही सोय उपलब्ध आहे. बिटा 2.18.69 ही ती आवृत्ती आहे. याशिवाय आता स्टिकर्स पाठवता येणार आहे.
 • आयओएसवर डिलिट फॉर एव्हरीवन सेवा दिली जाणार आहे, जी अँड्राइड बिटा आवृत्तीत आहे. डिलिट फॉर एव्हरीवन ही सोय फार महत्त्वाची होती. त्यामुळे चुकीने पाठवलेले संदेश रद्द करता येतात.
 • तसेच स्नॅपचॅट व फेसबुक मेसेंजरवर ही सोय आधीच होती. आतापर्यंत डिलिट फॉर एव्हरीवन वैशिष्टय़ात तुम्ही संदेश डिलिट करण्यापूर्वी जर तो दुसरा कुणी उद्धृत केला तर तो पुन्हा जात नसे. डिलिट केलेला संदेश पुन्हा मिळवण्यासाठी तुम्ही सात मिनिटांनंतर परत मिळू शकत होता.

सर्वांत युवा अर्थमंत्री कोनराड संगमा :

 • कोनराड संगमा मेघालयचे नवे मुख्यमंत्री होतील. त्यांनी मागील दहा वर्षांपासून मुख्यमंत्री असलेल्या काँग्रेसच्या मुकूल संगमा सरकारला सत्तेपासून दूर ठेवले आहे.
 • भाजपाने मित्रपक्षांची जमवाजमव करत काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवले आहे. 40 वर्षीय कोनराड संगमा यांची कौटुंबिक पार्श्वभूमी राजकीय आहे. कोनराड यांचे वडील दिवंगत पीए संगमा हे लोकसभेचे माजी अध्यक्ष होते.
 • कोनराड सध्या मेघालयमधील तुरा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. यापूर्वी या मतदारसंघाचे नेतृत्व अगाथा करत असत. कोनराड संगमा मेघालचे मुख्यमंत्री झाले तर घटनेप्रमाणे त्यांना सहा महिन्याच्या आत विधानसभेवर निवडून यावे लागेल. त्यांना पुन्हा एकदा निवडणूक लढवावी लागेल.
 • नॅशनल पीपल्स पार्टीच्या (एनपीपी) नेतृत्वाखाली मेघालयमध्ये पुढील सरकार स्थापन होईल. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोनराड हे 6 मार्च रोजी शपथ घेतील. विद्यमान सरकारचा कार्यकाळ 7 मार्च रोजी संपणार आहे.
 • कोनराडा संगमा हे मेघालयचे बारावे मुख्यमंत्री होतील. यापूर्वी आठव्या विधानसभेत ते विरोधी पक्षनेते होते. सन 2008 मध्ये मेघालयचे सर्वांत युवा अर्थमंत्री म्हणून कोनराड यांची ओळख आहे.

भारतीय खेळाडू शहझार रिझवीचे विश्वविक्रम नोंदवला :

 • भारताच्या शहझार रिझवीने 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात विश्वविक्रमासह विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सोनेरी कामगिरी केली. मेक्सिकोत सुरू असलेल्या या स्पर्धेत जितू राय व मेहुली घोष या भारतीय खेळाडूंनी कांस्यपदकाची कमाई केली.
 • रिझवीने ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता ख्रिस्तियन रिट्झवर मात करताना 242.3 गुणांचा विश्वविक्रम नोंदवला. जर्मनीच्या रिट्झने 239.7 गुणांसह रौप्यपदक मिळवले, तर जितूने 219 गुणांसह तिसरे स्थान मिळवले. भारताच्या ओमप्रकाशने चौथा क्रमांक मिळवताना 198.4 गुणांची नोंद केली.
 • महिलांच्या 10 मीटर एअर रायफलमध्ये मेहुलीने 228.4 गुण नोंदवत कांस्यपदक मिळवले. तिची सहकारी अंजुम मुदगिलला चौथा क्रमांक मिळाला. तिने 208.6 गुण नोंदवले. अपूर्वी चंडिला हिला सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. तिने 144.1 गुण मिळवले.

दिनविशेष :

 • सन 1558 मध्ये 5 मार्च रोजी फ्रान्सिस्को फर्नांडिस यांनी धुम्रपान बनवण्यात पहिल्यांदा तंबाखूचा वापर केला.
 • 5 मार्च 1851 रोजी जिओलॉजीकल सर्व्हे ऑफ इंडिया ची स्थापना झाली.
 • दुसर्‍या गोलमेज परिषदेपुर्वी 5 मार्च 1931 रोजी गांधी-आयर्विन करार झाला.
 • संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा असलेले टपाल तिकीट 5 मार्च 1997 मध्ये प्रकाशीत झाले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (6 मार्च 2018)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.