Current Affairs of 5 July 2018 For MPSC Exams

चालू घडामोडी (5 जुलै 2018)

चालू घडामोडी (5 जुलै 2018)

महाराष्ट्र स्टार्ट-अप धोरण 2018 जाहीर :

  • राज्यात विकासाला चालना देत रोजगार निर्मिती व्हावी, यासाठी राज्य सरकारने नावीन्यपूर्ण संकल्पानावर अधारित उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र स्टार्ट-अप धोरण-2018 जाहीर केले.
  • या धोरणाची अंमलबजावणी करताना नावीन्यपूर्ण उत्पादनाचे प्रदर्शन करण्यासाठी ‘स्टार्ट-अप आठवड्या’चे नियोजन करण्यात येणार असून दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात ‘स्टार्ट-अप आठवडा’ साजरा करण्यात येणार आहे. Startup India
  • केंद्र सरकारने नवीन व नावीन्यपूर्ण उद्योग सुरू करणाऱ्या नव उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी स्टार्ट-अप धोरण जाहीर केले आहे.
  • केंद्राच्या धर्तीवर राज्यानेही स्टार्ट-अप धोरणास गती दिली. यानुसार स्टार्ट-अप धोरणाखाली सुरू झालेल्या उद्योग-व्यावसायातील उत्पादनाचे प्रदर्शन, विक्री आदींसाठी ‘स्टार्ट-अप आठवडा’ साजरा करण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे. यानुसार दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात हा आठवडा साजरा करण्यात येणार आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (4 जुलै 2018)

थेट परदेशी गुंतवणुकीचा पाच वर्षांतील नीचांक :

  • भारतातील थेट परदेशी गुंतवणूक वाढीचा गेल्या पाच वर्षांतील नीचांक झाला असून परकीय गुंतवणुकीच्या वाढीचा दर 2017-18 मध्ये 3 टक्के नोंदला गेला असून केवळ 44.85 अब्ज अमेरिकी डॉलर्स एवढी गुंतवणूक झाली आहे.
  • औद्योगिक धोरण व प्रोत्साहन विभागाच्या आकडेवारीनुसार 2017-18 मध्ये थेट परकीय गुंतवणूक केवळ 3 टक्के वाढली असून 44.85 अब्ज डॉलर्स एवढीच गुंतवणूक झाली आहे.
  • परदेशी निधीचा देशातील ओघ 2016-17 मध्ये 8-67 टक्क्य़ांनी वाढला तर 2015-16 मध्ये हे प्रमाण 27 टक्के तर 2013-14 मध्ये 8 टक्के होते. 2012-13 मध्ये थेट परदेशी गुंतवणूक ऋण 35 टक्के होती.
  • तज्ज्ञांच्या मते देशांतर्गत गुंतवणूक वाढवणे आता गरजेचे असून परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी उद्योगस्नेही वातावरण निर्माण केले पाहिजे. डेलॉइट इंडियाचे अनिल तलरेजा यांनी सांगितले की, ग्राहक व किरकोळ क्षेत्रात परदेशी गुंतवणूक कमी झाली आहे कारण भारताच्या थेट परदेशी गुंतवणूक धोरणात अनिश्चितता व गुंतागुंत आहे.
  • उद्योगस्नेही मानांकनात भारताची कामगिरी चांगली असली तरी परदेशी गुंतवणूकदारांमध्ये उत्साह निर्माण करण्यात अपयश आले आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे प्राध्यापक बिस्वजित धर यांनी सांगितले की, थेट परदेशी गुंतवणूक ही देशाच्या अर्थव्यवस्थेची व्यापकता दाखवत असते.

उत्तराखंडाने प्राण्यांना दिला कायदेशीर व्यक्तीचा दर्जा :

  • उत्तराखंड उच्च न्यायालयाने 4 जुलै रोजी वन्यजीवांसंबंधी महत्वपूर्ण निकाल दिला. हवा, पाणी आणि जमिनीवर राहणारे विविध पशू, पक्षी आणि जलचर प्रजातींना न्यायालयाने कायदेशीर व्यक्तीचा दर्जा दिला आहे. Animal
  • सजीव माणसाप्रमाणेच त्यांना सर्व अधिकार असतील असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने हा निर्णय देतानाच उत्तराखंडच्या नागरिकांना या प्राणीमात्रांचे संरक्षक म्हणून घोषित केले आहे. उत्तराखंडची जनता या सर्व वन्यजीवांची पालक राहिल असे कोर्टाने म्हटले आहे.
  • उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश राजीव शर्मा आणि न्यायमूर्ति लोकपपाल सिंह यांच्या खंडपीठाने नारायण दत्त भट्ट यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना हा आदेश दिला.

आशियाई खेळांसाठी ऑलिम्पिक संघटनेची मान्यता :

  • भारतीय ऑलिम्पिक संघटनेने इंडोनेशियातील जकार्ता येथे होणाऱ्या आशियाई खेळांसाठी 524 खेळाडूंच्या भारतीय पथकाला आपली मान्यता दिलेली आहे.
  • 18 ऑगस्ट ते 2 सप्टेंबरदरम्यान इंडोनेशियात भारतीय खेळाडू 36 क्रीडाप्रकारांमध्ये पदकांच्या शर्यतीमध्ये उतरताना दिसतील. या पथकामध्ये 277 पुरुष तर 247 महिला खेळाडूंचा समावेश आहे. IOA
  • सन 2014 या साली झालेल्या आशियाई खेळांसाठी भारताने 541 जणांचे पथक पाठवले होते. त्या तुलनेमध्ये भारताने यंदा आपल्या पथकात कपात केल्याचे दिसून येते.
  • यंदा ऑलिम्पिक संघटनेने नेहमीच्या क्रीडाप्रकारांसोबत 8 नवीन खेळांसाठीही भारतीय संघाला मान्यता दिलेली आहे. कराटे, रोलर स्केटिंग, सॉफ्ट टेनिस यांच्यासारख्या 8 नवीन प्रकारांमध्ये यंदा भारतीय खेळाडू आपलं नशिब आजमावताना दिसतील.
  • तसेच 524 जणांच्या पथकापैकी 52 पदकांची भारताला आशा आहे. भारतीय महिला व पुरुष फुटबॉल संघाला मात्र या आशियाई खेळांसाठी ऑलिम्पिक संघटनेने मान्यता दिलेली नाही.

दिनविशेष :

  • सन 1913 मध्ये बालगंधर्वांनी गंधर्व नाटक मंडळीची स्थापना केली.
  • आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाची स्थापना 5 जुलै 1954 मध्ये झाली.
  • बीबीसीने पहिले टेलिव्हिजन बातम्या बुलेटिन 5 जुलै 1954 मध्ये प्रसारित केले.
  • सन 1975 मध्ये 5 जुलै रोजी भारतातून देवी रोग पूर्णपणे बरा झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जाहीर केले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (6 जुलै 2018)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.