Current Affairs of 5 January 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (5 जानेवारी 2016)

चालू घडामोडी (5 जानेवारी 2016)

दक्षिणपूर्व आशियातील सर्वात मोठा बोगदा :

    • जम्मू-काश्‍मीरमध्ये दक्षिणपूर्व आशियातील सर्वात मोठा झोझिला खिंडित 14.08 किलोमीटर लांबीचा बोगदा बांधण्यास येणार आहे.
    • आयआरबी इन्फ्राक्‍स्ट्रचर डेव्हलपर्स लिमिटेड या कंपनीने बोगद्याचे काम हाती घेतले असून, त्याचा खर्च 10,050 कोटी इतका अपेक्षित आहे.
    • या बोगद्यामुळे जम्मू-काश्‍मीर ते लेह-लडाखपर्यंत बारामाही वाहतूक सुरू राहणार आहे.
    • आयआरबी इन्फ्रास्ट्रक्‍चर डेव्हलपर्स लिमिटेडला रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नुकतेच काश्‍मीरमधील झोझिला पास टनल या बोगद्याच्या बांधकामाबाबत आणि देखभाल करण्यासंदर्भातील पत्र देण्यात आले.

इस्रो उभारणार स्पेस पार्क :

  • उपग्रहांची वाढती मागणी लक्षात घेता भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) आता दर महिन्याला उपग्रह सोडण्याचा विचार करीत आहे.
  • त्याचप्रमाणे यामध्ये खासगी क्षेत्राच्या सहभागीसाठी त्यांना प्रोत्साहन देण्याची योजना आखत असल्याची माहिती इस्रोच्या उपग्रह केंद्राचे संचालक एम. अण्णादुराई यांनी आज येथे पत्रकारांना सांगितले.
  • येथे सुरू असलेल्या 103 व्या भारतीय सायन्स कॉंग्रेसमध्ये “अवकाश योजनांबद्दल‘ आयोजित चर्चासत्रानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
  • “मेक इन इंडिया‘ कार्यक्रम हा आमचा मुख्य भाग आहे आणि आत्तापर्यंत अनेक खासगी क्षेत्रांतील भारतीय कंपन्यांनी यात सहभाग घेतला आहे.

गुंतवणुकीच्या दृष्टीने भारत ‘सर्वात आकर्षक देश’ :

  • पूर्ण जगात मंदीचे वारे वाहत असताना गुंतवणुकीच्या दृष्टीने भारत ‘सर्वात आकर्षक देश’ ठरला.
  • त्यामुळे 2015 मध्ये भारताने वेगवान आर्थिक वृद्धीचा विचार करता चीनला मागे टाकले.
  • आर्थिक सुधारणा चालूच राहिल्यास आणि व्यावसायिक वातावरणात सुधारणा झाल्यास नवीन वर्षात भारताचा वृद्धीदर 7 ते 7.5 टक्के राहण्याची अपेक्षा आहे.

प्रणव धनावडेचा धावांचा विक्रम :

  • मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या एच. टी. भंडारी आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात कल्याणच्या के. सी. गांधी स्कूलच्या प्रणव धनावडेने नाबाद 652 धावांची विक्रमी खेळी उभारली आहे.
  • क्रिकेट खेळाच्या इतिहासात ही सर्वोच्च धावसंख्या आहे.

चीनची दुसरी विमानवाहू युद्धनौका :

  • चीन सध्या आपली दुसरी विमानवाहू युद्धनौका बांधत असून, लष्करी कारवायांचे प्रशिक्षण व संरक्षण यंत्रणा सुधारण्यासाठी तंत्रज्ञानविषयक प्रयोगांवर अधिक भर देणे हा या युद्धनौकेचा उद्देश आहे.
  • जगातील सर्वांत मोठी म्हणजे 23 लाख सैन्यसंख्या असलेल्या चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीमध्ये मोठे बदल करण्यात येत आहेत.
  • ‘चीनची पहिली विमानवाहू युद्धनौका लियानिंगपेक्षा सध्या निर्मिती करण्यात येत असलेली युद्धनौका वेगळी आहे,‘ असे वरिष्ठ अधिकारी कॅप्टन झांग जुन्श यांनी सांगितले.
  • पहिल्या युद्धनौकेचा उपयोग प्रशिक्षणादरम्यान क्षमतेच्या चाचण्या घेण्यासाठी करण्यात येतो. या दुसऱ्या नौकेचा उपयोग प्रत्यक्षात ही यंत्रणा कशी वापरायची यासाठी करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

दिनविशेष :

  • पक्षी दिन : अमेरिकेची संयुक्त संस्थाने
  • 1949 : राष्ट्रीय सरंक्षण प्रबोधिनी (एन.डी.ए) पुणे येथे सुरु झाली.
  • 1957 : विक्रीकर कायद्याची सुरुवात झाली.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.