Current Affairs (चालू घडामोडी) of 5 February 2015 For MPSC Exams
अ.क्र |
ठळक घडामोडी |
1. | एल.सी.गोयल नवे गृहसचिव |
2. | नीती आयोगाची उद्या बैठक |
3. | फ्राँक इस्लाम यांना मार्टिन ल्युथर किंग पुरस्कार प्रदान |
4. |
मध्य प्रदेशला राज्याला पुरस्कार प्रदान |
एल.सी.गोयल नवे गृहसचिव :
- ग्रामविकास सचिव एल.सी.गोयल यांची गृहसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- अनिल गोस्वामी यांच्या जागेवर ही नियुक्ती करण्यात आली.
- 1979 च्या बॅचचे केरळ कॅडरचे गोयल हे आयएएस अधिकारी आहेत.
- यापूर्वी गोयल यांनी सहसचिव म्हणून पदभार सांभाळला आहे.
नीती आयोगाची उद्या बैठक :
- नियोजन आयोगच्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेल्या नीती आयोगचे पंतप्रधान हे पदसिद्ध अध्यक्ष आहेत.
- नीती आयोगाची पहिली बैठक उद्या (शुक्रवारी) होणार आहे.
- तसेच आयोगाची बैठक ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे.
- बैठकीत आगामी अर्थसंकल्पसंदर्भात चर्चा होणार आहे.
- तसेच या बैठकीत अर्थतज्ञ व विविध क्षेत्रातील जाणकारांची उपस्थिती असणार आहे.
फ्राँक इस्लाम यांना मार्टिन ल्युथर किंग पुरस्कार प्रदान :
- समाजसेवक आणि अमेरिकेचे उद्योजक फ्राँक इस्लाम यांना मार्टिन ल्युथर किंग पुरस्कार प्रदान करण्यात आला.
- आंतरराष्ट्रीय सेवा आणि नागरी क्षेत्रात केलेल्या कामाबद्दल हा पुरस्कार फ्राँक इस्लाम यांना देण्यात आला.
मध्य प्रदेशला राज्याला पुरस्कार प्रदान :
- मनरेगामध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल मध्य प्रदेशला राज्याला पुरस्कार प्रदान करण्यात आला.
- मरेगामार्फत स्वच्छ भारत अभियानांतर्गत ग्रामीण भागात शौचालय बांधणीचे काम करण्यात येत आहे.