Current Affairs of 5 August 2017 For MPSC Exams
चालू घडामोडी (5 ऑगस्ट 2017)
तीन भारतीयांची ट्रम्प प्रशासनात नियुक्ती :
- अमेरिकन सरकारच्या तीन महत्वाच्या जागांवर तीन भारतीय-अमेरिकनांना नियुक्त करण्याचा सिनेटने एकमुखाने निर्णय घेतला. यातील एक नियुक्ती ही डोनाल्ड ट्रम्प प्रशासनातील बौद्धीक संपदेवर आहे.
- ट्रम्प प्रशासनात नील चॅटर्जी हे फेडरल एनर्जी रेग्युलेटरी कमीशनचे सदस्य बनले असून विशाल अमीन हे इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी एन्फोरसमेंट कोऑर्डिनेटर झाले आहेत.
- अमेरिका आणि भारत यांच्यात बौद्धीक संपदेवरून तीव्र स्वरुपाचे मतभेद आहेत. कृष्णा अर्स यांना पेरुच्या राजदुताची जबाबदारी दिली गेली आहे.
- तसेच अर्स हे 1986 पासून विदेश सेवेत अधिकारी असून निक्की हॅलेनंतर ते राजदूतपदाची संधी मिळालेले दुसरे भारतीय-अमेरिकन ठरले आहेत.
- हॅले या साऊथ कॅरोलिनामध्ये दोन वेळा गव्हर्नर होत्या व सध्या त्या संयुक्त राष्ट्रांत अमेरिकेच्या राजदूत आहेत.
Must Read (नक्की वाचा):
‘मिशन वन मिलियन’ मोहिमेची सुरुवात :
- ऑक्टोबर महिन्यात होत असलेल्या 17 वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी यजमान भारत सज्ज असून, या स्पर्धेनिमित्त 8 सप्टेंबरला महाराष्ट्रात सुमारे 10 लाख शालेय विद्यार्थी फुटबॉल खेळतील. या वेळी ऐतिहासिक मोहीम साकारण्यात येईल, असा विश्वास राज्य क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केला.
- फिफा 17 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेनिमित्त ‘महाराष्ट्र मिशन वन मिलियन’ फुटबॉल क्रांती निर्माण करण्यात येणार आहे. याबाबत तावडे यांनी माहिती दिली. या वेळी वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे (विफा) उपाध्यक्ष विश्वजीत कदम, विफाचे उपाध्यक्ष छत्रपती मालोजी राजे भोसले यांचीही उपस्थिती होती.
- ‘मोहीम ‘महाराष्ट्र मिशन वन मिलियन’ अंतर्गत राज्यातील 30 हजारांहून अधिक शाळांमध्ये सुमारे 1 लाख फुटबॉलचे वाटप करण्यात आले आहे, तसेच शालेय-महाविद्यालयीन स्तरीय, विद्यापीठस्तरीय विशेष फुटबॉल स्पर्धांचेही आयोजन करण्यात येणार आहे.
गंगागिरी महाराजांचा सप्ताहाची गिनीज बुकात नोंद :
- शतकीय वर्षे परंपरा असलेला गंगागिरी महाराज यांचा अखंडपणे सुरू असलेला हा सप्ताह जगातील आणखी एक आश्चर्यच आहे.
- उपस्थित जनसागर बघितल्यावर योगिराज श्री गंगागिरी महाराज यांच्या कार्याचे मूर्त स्वरूप दिसून येते, यामुळेच या सप्ताहाची गिनीज बुकामध्ये नोंद झाली.
- जलसागर अनेकदा मी पाहिला, पण असा जनसागर प्रथमच बघतो आहे, असे भावनिक उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाखो भाविकांकडे पाहून काढले.
- या सप्ताहाचा मुख्य उद्देश अन्नदान आहे. दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांची उपासमार होऊ नये व व्यसनमुक्त समाज निर्माण व्हावा, ही दूरदृष्टी ठेवून 1847 मध्ये योगिराज श्री गंगागिरी महाराजांनी या सप्ताहाची सुरुवात केली होती, अशी माहिती महंत रामगिरी महाराज यांनी काल्याच्या कीर्तनातून उपस्थितांना दिली.
- प्रसादाच्या स्वरूपात 10 लाख भक्तांना बुंदीचे महाप्रसादाचे लाडू 8 मिनिटांमध्ये वाटणे आणि एकाच वेळी 10 लाख भाविकांनी एकत्र येऊन सत्संगात सहभागी होणे, असे दोन जागतिक विक्रम यावेळी घडले.
- विक्रमाचे प्रमाणपत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महंत रामगिरी महाराजांना लाखो भाविकांच्या साक्षीने प्रदान करण्यात आले.
अभिनेता अक्षय कुमार उत्तर प्रदेशचा स्वच्छतादूत :
- अभिनेता अक्षय कुमारची ‘टॉयलेट एक प्रेम कहाणी’ या चित्रपटाची चर्चा प्रदर्शनापूर्वीच सुरू झाली आहे. हा चित्रपटाची कथा स्वच्छतेवर विशेषतः घरात शौचालय असण्यावर आधारित आहे.
- तसेच याची दखल घेत अक्षय कुमारला उत्तर प्रदेशचा स्वच्छतादूत म्हणून नियुक्त केल्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जाहीर केले.
- उघड्यावर शौचाला जाण्याला प्रतिबंध करण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारने अनेक योजना आखल्या आहेत. यासाठी त्यांनी अक्षय कुमारची ‘ब्रॅंड ऍबेसिडर’ म्हणून नियुक्ती केली आहे.
- लखनौ येथे झालेल्या स्वच्छता मोहिमेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनीच याबाबत घोषणा केली. यावेळी ‘टॉयलेट’ची नायिका भूमी पेडणेकरही त्यांच्यासोबत होती.
- लखनौमध्ये चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर कॅबिनेटमधील सर्व मंत्र्यासह योगी आदित्यनाथ तो पाहणार असल्याचेही सांगण्यात आले.
दिनविशेष :
- मराठी इतिहाससंशोधक व लेखक ‘दत्तो वामन पोतदार’ यांचा जन्म 5 ऑगस्ट 1890 मध्ये झाला.
- सन 1914 मध्ये 5 ऑगस्ट रोजी जगातील पहिला विद्युतचलित वाहतूक नियंत्रक दिवा अमेरिकेच्या क्लीव्हलँड शहरात सुरू झाला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा