Current Affairs (चालू घडामोडी) of 4 January 2015 For MPSC Exams
अ.क्र |
ठळक घडामोडी |
1. | चीनमध्ये सहायक परराष्ट्रमंत्री बडतर्फ |
2. | किरण वडोदारिया आयएनएसचे नवे अध्यक्ष |
3. | शत्रुघ्न सिन्हा आणि तनुजा यांना पिफ विशेष गौरव सन्मान जाहीर |
4. | कुंदन व्यास यांना लोकमान्य टिळक पत्रकारिता पुरस्कार जाहीर |
5. | स्टीफन मरांडी हंगामी अध्यक्ष |
6. | देवयाणी बाड नौदलात लेफ्टनंटपदी |
7. | दिनविशेष |
चीनमध्ये सहायक परराष्ट्रमंत्री बडतर्फ :
- चीनमध्ये भ्रष्टाचाराच्या संशयावरून सहायक परराष्ट्र मंत्र्यास बडतर्फ करण्यात आले आहे.
- झांग कुनशेंग हे आता सहायक परराष्ट्रमंत्री राहिले नाहीत.
- शिस्तभंग केल्याच्या संशयावरून त्यांची चौकशी सुरू आहे.
- झांग चीनच्या चार सहायक परराष्ट्र मंत्र्यांपैकी सर्वात वरिष्ठ मंत्री होते आणि त्यांच्याकडे शिष्टाचार विभागाचे काम होते.
- परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते असलेल्या क्वीन गांग यांच्याकडे आता शिष्टाचार विभागाचा कारभार देण्यात आला आहे.
- सहायक परराष्ट्रमंत्री लियू जियानचाओ हे प्रभारी प्रमुख प्रवक्ते असतील याआधी लियू ही जबाबदारी सांभाळत होते.
किरण वडोदारिया आयएनएसचे नवे अध्यक्ष :
- संभव मेट्रोचे किरण बी. वडोदारिया यांची 2014-15 या वर्षासाठी इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या(आयएनएस)अध्यक्षपदी निवड झाली.
- याआधी स्टेटस्मनचे रविद्र कुमार हे अध्यक्ष होते.
- पी.व्ही.चंद्रन यांची डेप्युटी प्रेसिडेंट तर राष्ट्रदूत साप्ताहिकाचे सोमेश शर्मा यांची व्हाईस प्रेसिडेंटपदी निवड झाली.
शत्रुघ्न सिन्हा आणि तनुजा यांना पिफ विशेष गौरव सन्मान जाहीर :
- पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातर्फे(पिफ) जेष्ठ अभिनेते ‘शॉटगण‘ शत्रुघ्न सिन्हा आणि जेष्ठ अभिनेत्री तनुजा यांना यंदाचा पिफ विशेष गौरव सन्मान जाहीर झाला आहे.
- मराठी चित्रपटसृष्टीमध्ये योगदान देणारे जेष्ठ कवी-गीतकार ना.धों.महानोर यांना पिफ विशेष सन्मान तर, संगीत क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल कल्याणजी-आनंदजी जोडीतील जेष्ठ संगीतकार आनंदजी शहा यांना एस.डी.वर्मण इंटरनॅशनल अवॉर्ड फॉर क्रेएटीव्हसाऊंड अँड म्यूझिक हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
- 8 डिसेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 13व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.
कुंदन व्यास यांना लोकमान्य टिळक पत्रकारिता पुरस्कार जाहीर :
- केसरी-मराठा संस्थेच्या वतीने राष्ट्रीय स्थरावर दिला जाणारा ‘लोकमान्य टिळक पत्रकारिता पुरस्कार’ यंदा ‘जन्मभूमी’चे संपादक कुंदन व्यास यांना जाहीर झाला आहे.
- या पुरस्काराचे यंदाचे सातवे वर्ष आहे.
- केसरी 135 व्या वर्षात पदार्पण करत आहे.
- 4 जानेवारी रोजी टिळकवाडयात वर्धापनदिनानिमित्त होणार्या कार्यक्रमात हा पुरस्कार दिला जाणार आहे.
- यापूर्वी वीर संघवी, एन.राम.एच.के.दूआ , श्रवण गर्ग, विनोद मेहता आणि मॅमेन मॅथ्यु यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
स्टीफन मरांडी हंगामी अध्यक्ष :
- झारखंड विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी झारखंड मुक्ती मोर्चाच्या स्टीफन मरांडी यांची निवड करण्यात आली आहे.
- राज्यपाल साईद अहमद यांनी त्यांना शपथ दिली.
देवयाणी बाड नौदलात लेफ्टनंटपदी :
- सावंतवाडी ची सुकन्या देवायाणी प्रशांत बाड ही हिंदुस्थानी नौदलात लेफ्टनंटपदावर रुजू झाली आहे.
दिनविशेष :
- 4 जानेवारी – आंतरराष्ट्रीय ब्रेल दिन, 1809 ब्रेल लिपि तयार करणार्या लुई ब्रेल यांचा जन्म.
- 1851 – दुसरे बाजीराव पेशवे यांचे निधन.
- 1881 – लोकमान्य टिळक यांनी केसरी वृत्तपत्र सुरू केले.