Current Affairs of 4 February 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (4 फेब्रुवारी 2016)

चालू घडामोडी (4 फेब्रुवारी 2016)

महाराष्ट्रातील पाच विद्यार्थ्यांना आंबेडकर पुरस्कार :

 • दहावी व बारावीच्या गुणवत्ता यादीत प्रथम येणाऱ्या महाराष्ट्रातील पाच विद्यार्थ्यांना दिल्लीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय गुणवत्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 • तसेच 60 हजार रुपये रोख आणि पुस्तके असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
 • देशातील विविध राज्यांतून गुणवत्ता यादीत प्रथम येणाऱ्या अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
 • महाराष्ट्रातून दहावीच्या गुणवत्ता यादीत मराठी माध्यमातून प्रथम आलेला श्रीपतराव भोसले हायस्कूल उस्मानाबादचा विद्यार्थी राहुल बनसोडे आणि इंग्रजी माध्यमातून प्रथम आलेला होलीसिटी हायस्कूल नांदेडचा विद्यार्थी सार्थक अक्कुलवार यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 • तसेच बारावीच्या गुणवत्ता यादीत कला शाखेतून प्रथम येणारा लातूरच्या दयानंद कला महाविद्यालयाचा विद्यार्थी राहुल डोंगरे, विज्ञान शाखेतून प्रथम आलेल्या नागपूर येथील डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी प्रांजली खांडेकर आणि ऋतुजा बडगे यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 • सामाजिक न्याय मंत्रालयातर्फे इंडिया हॅबीटॅट सेंटरमध्ये निबंध स्पर्धा आणि गुणवत्ता पुरस्कारांचे वितरण केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांच्या हस्ते करण्यात आले.

‘एसपीव्ही’ला स्थापन करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी :

 • रेल्वेचे राज्यांमधील रखडलेले पायाभूत प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यासाठी राज्यांशी भागीदारी असलेली विशेष संयुक्त कंपनी (स्पेशल पर्पज व्हेईकल) स्थापन करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला, यामुळे राज्य सरकारे आपापल्या भागातील महत्त्वाचे रेल्वे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी रेल्वेशी संयुक्त कंपनीचा करार करता येईल.
 • मंत्रिमंडळ बैठकीनंतर ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी पत्रकार परिषदेत निर्णयांची माहिती दिली.
 • पायाभूत प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राज्यांबरोबरच बॅंका, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या, खाण कंपन्या; तसेच राज्यांसमवेत संयुक्त कंपन्या स्थापन करण्यासाठी रेल्वेला परवानगी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला.
 • संबंधित राज्यांशी रेल्वे मंत्रालयाच्या करारातून संयुक्त कंपनी स्थापन होईल.
 • तसेच या कंपनीसाठी प्रत्येक राज्याला रेल्वेतर्फे प्रत्येकी 50 कोटी रुपयांचे अर्थसाह्य दिले जाईल; तर राज्यांचा सहभाग तेवढाच (50 कोटी रुपये) असेल.

ऐतिहासिक पाटणा उच्च न्यायालयाची शंभराव्या वर्षांत पदार्पण :

 • युरोपियन वास्तूरचनेचा सुंदर अविष्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक पाटणा उच्च न्यायालयाच्या वास्तूने (दि.4) शंभराव्या वर्षांत पदार्पण केले.
 • पल्लेडियन डिझाइनवर आधारित ‘निओ क्‍लासिकल’ शैलीमध्ये या इमारतीची उभारणी करण्यात आली आहे.
 • तसेच या इमारतीच्या उभारणीचे काम 1 डिसेंबर 1913 मध्ये पूर्ण झाले होते, त्यानंतर 3 फेब्रुवारी 1916 रोजी तत्कालीन व्हाइसराय लॉर्ड चार्ल्स हार्डिंग्ज यांच्या हस्ते तिचे उद्‌घाटन झाले होते.
 • या इमारतीच्या उभारणीचे काम सुरू असतानाच पहिल्या जागतिक महायुद्धाचा भडका उडाला होता, त्यामुळे इंग्रज सरकारला नव्या राजधानीच्या उभारणीवरील खर्चामध्येही लक्षणीय कपात करावी लागली होती.
 • तसेच यामुळे सचिवालयाच्या इमारती आणि अन्य कार्यालयांच्या उभारणीसही ब्रेक लागला होता.
 • पण बिहार आणि ओडिशा प्रांतांचे तत्कालीन राज्यपाल सर एडवर्ड गैत यांनी पुढाकार घेऊन या इमारतीच्या उभारणीचे बांधकाम पूर्ण केले होते.

ज्येष्ठ सारंगीवादक पं. राम नारायण यांना पं. भीमसेन जोशी पुरस्कार :

 • स्व. पंडीत भीमसेन जोशी यांच्या नावे शास्त्रीय संगीतासाठी दिला जाणारा सन 2015-16 चा पुरस्कार ज्येष्ठ सारंगीवादक पंडीत राम नारायण यांना जाहीर झाला आहे.
 • प्रतिवर्षी राज्य शासनातर्फे शास्त्रीय गायन व वादन या क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलाकारास भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी यांच्या नावे शास्त्रीय संगीत क्षेत्रातील जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
 • तसेच या पुरस्काराचे स्वरूप रुपये 5 लाख रोख, मानपत्र, सन्मानचिन्ह असे आहे.
 • यापूर्वी हा पुरस्कार गानसरस्वती किशोरी आमोणकर, पंडीत जसराज आणि श्रीमती प्रभा अत्रे यांना प्रदान करण्यात आला आहे.

आंतरराष्ट्रीय नौदल ताफा संचलनासाठी 53 देशांच्या 90 युद्धनौका :

 • भारतीय नौदलातर्फे आयोजित दुसऱ्या आंतरराष्ट्रीय नौदल ताफा संचलनासाठी 53 देशांच्या 90 युद्धनौका येथील नौदल बंदरात दाखल झाल्या आहेत.
 • भारतीय नौदलाच्या आयएनएस सुमित्रा, आयएनएस सुमेधा, आयएनएस शरयू, आयएनएस सुनयना या चार गस्तीनौकांचा ताफा राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्यासाठी सज्ज ठेवण्यात आला आहे.
 • संचलनासाठीची रंगीत तालीम (दि.3) विशाखापट्टणम बंदरापासून आतमध्ये खोल समुद्रात पार पडली, एकूण 90 युद्धनौका, सहा रांगांमध्ये उभ्या करण्यात आल्या होत्या.
 • प्रत्यक्ष 6 फेब्रुवारी रोजी राष्ट्रपतींना मानवंदना देण्यासाठी या युद्धनौका याच रचनेमध्ये उभ्या असतील.
 • सध्या येथे येऊन दाखल झालेल्या नौदलांमध्ये अमेरिका, ब्रिटन, रशिया, चीन, ओमान, श्रीलंका, बांगलादेश, ब्राझील, मालदिव, मॉरिशस व ऑस्ट्रेलिया आदींचा समावेश आहे.
 • अमेरिकेचे नौदल 10 हजार टन वजनाच्या मिसाईल गायडेड क्रूझर युद्धनौकेसह दाखल झाले आहे.
 • भारतीय नौदलातील दोन्ही विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रमादित्य व आयएनएस विराट या निमित्ताने प्रथमच एकत्र पाहायला मिळतील.

लोकसभेचे माजी अध्यक्ष डॉ. जाखड यांचे निधन :

 • लोकसभेचे माजी अध्यक्ष आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. बलराम जाखड यांचे (दि.3) येथे निधन झाले, ते 92 वर्षांचे होते.
 • डॉ. जाखड हे 1980 ते 1989 या कालावधीत लोकसभेचे अध्यक्ष होते.
 • माजी पंतप्रधान नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात डॉ. जाखड यांनी कृषिमंत्रिपदही भूषविले होते.
 • जून 2004 ते मे 2009 या कालावधीत ते मध्य प्रदेशचे राज्यपाल होते.

दिनविशेष :

 • 1906 : प्लुटो हा ग्रह शोधणारे क्लाईड विल्यम टॉमबॉ यांचा जन्म.
 • 1922 : स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांचा जन्म.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World