Current Affairs (चालू घडामोडी) of 4 December 2014 For MPSC Exams

 

अ.क्र
ठळक घडामोडी
1. वाजपेयींचा जन्मदिन ‘उत्तम प्रशासन दिन’ म्हणून साजरा करण्याची योजना
2. अनिल कुमार सिन्हा ‘सीबीआय’चे नवे संचालक
3. भ्रष्टाचारात भारत 85 वा
4. ‘बॉम्बे हायकोर्टाचे मुंबई उच्च न्यायालय असे नामकरण करा’
5. अग्निशमन दलातील जवानांना 13 वर्षानी शौर्यपदके मिळणार

 

वाजपेयींचा जन्मदिन ‘उत्तम प्रशासन दिन’ म्हणून साजरा करण्याची योजना :
  • भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस आता ‘उत्तम प्रशासन दिन‘ म्हणून साजरा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
  • 25 डिसेंबर केंद्रातील भाजपप्रणाली सरकारची ओळख एक आदर्श प्रशासक म्हणून व्हावी, या उद्देशाने हा कार्यक्रम हाती घेण्यात आल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सांगितले.

 

अनिल कुमार सिन्हा ‘सीबीआय’चे नवे संचालक :
  • आयपीएस अनिल कुमार सिन्हा यांची सीबीआयच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्य न्यायधीश एच.एल.दत्तू आणि विरोधीपक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गी यांनी सिन्हा यांची संचालक पदावर नेमणूक केली आहे.
  • 40 अधिकार्‍यांच्या यादीतून सिन्हा यांची निवड करण्यात आली आहे.
  • अनिल कुमार सिन्हा यांची पुढील दोन वर्षासाठी सीबीआय पदि नेमणूक करण्यात आली आहे.
  • सिन्हा यांना राष्ट्रपती पदानेही गौरवण्यात आले आहे.

 

भ्रष्टाचारात भारत 85 वा :
  • जगातील सर्व भ्रष्ट देशांच्या यादीत भारताचा 85 व क्रमांक लागला आहे.
  • गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भारताच्या कामगिरीत सुधारणा झाली आहे.
  • ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल या अंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे दरवर्षी भ्रष्टाचारसंदर्भात अहवाल प्रसिद्ध केला जातो.
  • जर्मनीत या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. या अहवालात 175 देशांमधील सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे.
  • पहिले भारत 94व्या स्थानावर होता चीन (80), पाकिस्तान (126), युनायटेड किंगडम (17)

  • सर्वात कमी भ्रष्टाचार असलेले अव्वल 5 देश डेन्मार्क, न्यूझीलंड, फिनलॅँड, स्वीडन, नॉर्वे

  • सर्वाधिक भ्रष्टाचार असलेले 5 देश सोमालिया, उत्तर कोरिया, सुदान, अफगाणिस्तान, दक्षिण सुदान

 

‘बॉम्बे हायकोर्टाचे मुंबई उच्च न्यायालय असे नामकरण करा’ :
  • येत्या 26 जानेवारीपूर्वी बॉम्बे हायकोर्टाचे नाव बदलून मुंबई उच्च न्यायालय करा, अशी मागणी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी बुधवारी लोकसभेत केली.
  • बॉम्बे हायकोर्टाचे नाव बदलण्याची 2008 सालापासून लोकसभेत मागणी करण्यात येत आहे.

 

अग्निशमन दलातील जवानांना 13 वर्षानी शौर्यपदके मिळणार :
  • 63 जवानांची नावे जाहीर.
  • रखडलेली शौर्यपदक परंपरा शिवसेनेच्या संघटनेमुळे पुन्हा सुरू.
  • 2001 पासून बंद पडलेली ही प्रथा ‘मुंबई अग्निशमन लढवू कामगार संघटना‘ या शिवसेनेच्या कामगार संघटनेमुळे पुन्हा एकदा सुरू होणार आहे.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.