Current Affairs of 31 May 2015 For MPSC Exams

14 एप्रिल ‘राष्ट्रीय बंधुत्व व समरसता दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार :

  • भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 125 व्या जयंती वर्षांनिमित्त यापुढे 14 एप्रिल ‘राष्ट्रीय बंधुत्व व समरसता दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे.
  • केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
  • डॉ. आंबेडकरांचे 125 जयंती वर्ष साजरे करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शनिवारी झालेल्या बैठकीत उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली.
  • तसेच या समितीत महाराष्ट्रातून भन्ते राहुल बोधी, राष्ट्रीय भटके विमुक्त आयोगाचे अध्यक्ष भिकू इदाते, केंद्रीय नियोजन आयोगाचे माजी सदस्य डॉ. नरेंद्र जाधव व डिक्कीचे संस्थापक मिलिंद कांबळे यांचा समावेश आहे.  
  • वर्षभरात डॉ. आंबेडकरांच्या स्मरणार्थ नाणे व टपाल तिकिटाचे लोकार्पण करण्यात येईल.
Must Read (नक्की वाचा):

Current Affairs of 28 May 2015

कुपोषित देशांच्या यादीत भारत पहिला :

  • कुपोषित देशांच्या यादीत भारत पहिला असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न व कृषी विभागाने दिलेल्या अहवालात म्हटले असून यामध्ये जागतिक अन्नसुरक्षेवर प्रकाश टाकण्यात आल्याचे म्हटले आहे.
  • देशातील एकूण लोकसंख्येच्या 15 टक्के म्हणजेच 19.46 कोटी लोक रोज उपाशीपोटीच झोपत आहेत.
  • तसेच या तुलनेत चीनमधील कुपोषितांची संख्या कमालीची घटली आहे.
  • 1990-92 मध्ये जगात कुपोषितांची संख्या एक अब्ज होती. हा आकडा 2013 मध्ये 79.5 कोटींवर आला आहे.
  • दक्षिण आशियामध्येही पाच वर्षांखालील कुपोषित बालकांची संख्या सर्वाधिक आहे.
     
  • 1990-92 मध्ये ही संख्या 49.00 टक्के होती. ती 2013 मध्ये 30 टक्क्यांवर आली असल्याचे यात म्हटले आहे.

दहशतवाद तज्ज्ञ ल्युसी रिचर्डसन यांची ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून नियुक्ती :

  • दहशतवाद तज्ज्ञ ल्युसी रिचर्डसन यांची ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • रिचर्डसन या हार्वर्डमध्ये अध्यापक होत्या व सध्या स्कॉटलंडच्या सेंट अँड्रय़ूज विद्यापीठाच्या कुलगुरू होत्या.
  • इस. 1230 पासून ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या कुलगुरुपदी प्रथमच महिलेस नेमण्यात आले आहे.

रेल्वेसाठी “इन्फर्मेशन टेक्‍नॉलॉजी व्हिजन” तयार करण्याची योजना रेल्वे मंत्रालयाने आखली :

  • रेल्वेसाठी “इन्फर्मेशन टेक्‍नॉलॉजी व्हिजन” तयार करण्याची योजना रेल्वे मंत्रालयाने आखली असून, त्यासाठी एका सल्लागार मंडळाची स्थापनाही आज मंत्रालयातर्फे करण्यात आली.
  • रेल्वेच्या एकंदर कारभारातील वर्तमान माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग, त्याची व्याप्ती वाढविणे आणि रेल्वेशी निगडित मुद्द्यांच्या सोडवणुकीसाठी एक कायमस्वरूपी यंत्रणेची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.
  • सल्लागार मंडळाच्या कार्यकक्षेतेतील मुद्दे :
  • 1. रेल्वेच्या एकंदर उद्दिष्टांशी सुसंगत अशा सर्वसमावेशक माहिती तंत्रज्ञान भविष्यदर्शी योजना तयार करणे.
  • 2. यामध्ये माहिती तंत्रज्ञान, संज्ञापन (कम्युनिकेशन), दूरसंचार यांचा समावेश तसेच वर्तमान माहिती तंत्रज्ञानाच्या वापराचा आढावा घेऊन त्याचा नव्या भविष्यदर्शी (व्हिजन) योजनेत समावेश.
  • 3. प्रामुख्याने प्रवासी सेवा, मालवाहतूक, रेल्वे मालमत्ता व्यवस्थापन, रेल्वेगाड्यांची वाहतूक, सुरक्षा व प्रवाशांची सुरक्षा व एकंदर रेल्वे व्यवस्थापन यावर विशेष भर.
  • 4. या भविष्यदर्शी योजनेची अंमलबजावणी आणि त्याचे पूर्णत्व याचे वेळापत्रक आणि त्याबद्दलची रणनीती सुचविणे.
  • 5. रेल्वेच्या क्षमतेत वाढ करण्याबरोबरच व्यवस्थापन बदल आणि आयटी कारभार यांची परिणामकारक योजना सुचविणे.
  • 6. रेल्वेच्या मुद्द्यांबाबत माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तोडगे सुचविणारे कायमस्वरूपी पोर्टलची निर्मिती करणे.
  • “नॅसकॉम‘चे माजी अध्यक्ष सोम मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली हे सल्लागार मंडळ काम करणार असून, यामध्ये माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील अग्रगण्य तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला आहे.

दिनविशेष :

  • 31 मे जागतिक तंबाखू सेवन दिन (युनेस्को)
  • 1725 – पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जन्म.
  • 1960 – दक्षिण आफ्रिकेचा प्रजासत्ताक दिन.
  • 1977 – भारताची पहिली सैनिक तुकडी कांचनगंगा शिखर चढली.

Must Read (नक्की वाचा):

Current Affairs of 1 June 2015

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.