Current Affairs of 31 July 2015 For MPSC Exams

चालू घडामोडी (31 जुलै 2015)

मीठ-पाण्यावर प्रज्वलित होणारा दिवा तयार :

 • फिलिपिन्समधील संशोधकांनी मीठ-पाण्यावर प्रज्वलित होणारा दिवा तयार केला असून, तो दिवसातील आठ तास प्रकाश देऊ शकतो.
 • एक ग्लासभर पाणी आणि दोन चमचे मिठाचा वापर करून संशोधकांनी हा दिवा प्रज्वलित करण्यासाठी लागणारे द्रावण तयार केले होते.
 • या संशोधनाला “सस्टेनेबल अल्टरनेटिव्ह लाइटिंग”, अर्थात “सॉल्ट लॅंप” असे नाव देण्यात आले आहे.
 • तसेच या सॉल्ट लॅंपसाठी तयार होणाऱ्या विद्युत ऊर्जेवर यूएसबी केबलच्या साह्याने स्मार्टफोनदेखील चार्ज केला जाऊ शकतो.
 • येथे गॅल्वानिक सेल बॅटरीच्या माध्यमातून दिव्याला लागणारी ऊर्जा पुरविली जाते.
 • मीठ आणि पाणी, तसेच दोन इलेक्‍ट्रोड्‌सच्या माध्यमातून ऊर्जेची निर्मिती होत असल्याचे संशोधकांनी सांगितले.
 • या बॅटरीवरील दिवा सहा महिने रोज आठ तास प्रकाश देऊ शकतो.
 • तसेच वेळोवेळी द्रावण बदलून ऊर्जेची निर्मिती केली जाऊ शकते.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (30 जुलै 2015)

सर्वाधिक विदेशी गुंतवणूक खेचणाऱ्या देशातील राज्यांत महाराष्ट्र अग्रक्रमावर :

 • देशातील थेट परकी गुंतवणुकीच्या प्रमाणात मागच्या वर्षीच्या तुलनेत मागच्या आर्थिक वर्षात (2014-2015) तब्बल 27 टक्‍क्‍यांची वाढ झाल्याचे सरकारने आज राज्यसभेत उत्तरात सांगितले.
 • सर्वाधिक विदेशी गुंतवणूक खेचणाऱ्या देशातील पाच राज्यांत महाराष्ट्र अग्रक्रमावर असल्याचे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी एका लेखी प्रश्‍नाच्या उत्तरात स्पष्ट केले.
 • जागतिक स्थिती पाहता, मॉरिशस विदेशी गुंतवणुकीत आघाडीवर असून, भारत पहिल्या दहा देशांमध्येही नाही.
 • तसेच “विकसित अग्र-दशका”मॉरिशस, जपान, अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, रशिया, चीन, दक्षिण कोरिया, कॅनडा व ऑस्ट्रेलियाचा समावेश असल्याचेही सुषमा स्वराज यांनी म्हटले आहे.

भारत 2022 सालापर्यंत जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश होणार :

 • भारत 2022 सालापर्यंत चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश होणार असल्याचे संयुक्त राष्ट्र संघाने जाहीर केलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
 • विशेष म्हणजे, यापूर्वीच्या अहवालापेक्षा हे अंतर आता सहा वर्षांनी कमी झाले आहे.
 • याआधीच्या अहवालात भारत 2028 पर्यंत लोकसंख्येच्या बाबतीत चीनला मागे टाकून अव्वल स्थान गाठेल असे म्हटले होते.
 • ‘जागतिक लोकसंख्या अहवाल-2015’ची सुधारित आवृत्ती बुधवारी जाहीर करण्यात आली.
 • पुढील सात वर्षात भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश होणार असून 2100 सालापर्यंत भारत या स्थानावर कायम राहील, अशी नोंद अहवालात करण्यात आली आहे.
 • सध्या चीनची लोकसंख्या सुमारे 138 कोटी इतकी, तर भारताची 131 कोटींच्या घरात आहे.
 • भारताच्या लोकसंख्या वाढीचा दर २०२२ पर्यंत असाच कायम राहिला तर 2030 साली भारताची लोकसंख्या 150 कोटींच्या आसपास असेल.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला सर्वोत्कृष्ट विद्यापीठाचा पुरस्कार जाहीर :

 • राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत 2014-15 मध्ये औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला सर्वोत्कृष्ट विद्यापीठाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
 • तसेच सर्वोत्कृष्ट कार्यक्रम समन्वयकाचा पुरस्कारही मराठवाडा विद्यापीठातील डॉ. आर. एन. करपे यांनी पटकाविला आहे.
 • समन्वयक पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह आणि 10 हजार रुपये असे आहे.
 • नि:स्वार्थ भावनेने व निष्ठेने समाजाची सेवा करणाऱ्यांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या सेवेचा यथोचित गौरव करण्याच्या दृष्टीने राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
 • या पुरस्कारांची घोषणा नुकतीच उच्च व तंत्रशिक्षण विभागाने शासन निर्णयाद्वारे केली आहे.

नेपाळच्या नव्या घटनेतून ‘सेक्युलॅरिझम’शब्द काढून टाकण्यास मान्यता :

 • नेपाळच्या नव्या घटनेतून ‘सेक्युलॅरिझम’ (धर्मनिरपेक्षता) हा शब्द काढून टाकण्यास नेपाळच्या राजकीय पक्षांनी मान्यता दिली आहे.
 • नेपाळमधील बहुसंख्य नागरिकांना या नव्या घटनेत सेक्युलॅरिझमऐवजी ‘हिंदू’ किंवा ‘धार्मिक स्वातंत्र्य’ असा शब्द हवा आहे.
 • दशकभराच्या बंडखोरीनंतर मुख्य प्रवाहात सामील झालेल्या युनिफाईड कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ-माओईस्ट सरकारने 2007 मध्ये नेपाळ हा धर्मनिरपेक्ष देश असल्याचे जाहीर केले होते.
 • या निर्णयानंतर नेपाळची शेकडो वर्षांचा इतिहास असलेली जगातील एकमेव हिंदू राजवट अशी ओळख संपली होती.
 • तसेच नव्या घटनेवर नागरिकांची मते मागविण्यात आली होती.
 • त्यात बहुसंख्य लक्षावधी नागरिकांनी घटनेतून धर्मनिरपेक्ष (सेक्युलॅरिझम) शब्द काढून टाकण्याची सूचना केल्यानंतर राजकीय पक्षांना आपल्या भूमिकेत बदल करावा लागला.
 • नेपाळच्या एकूण लोकसंख्येपैकी 80 टक्के लोकसंख्या हिंदू आहे.

ट्रायच्या अध्यक्षपदी राम सेवक शर्मा यांची नियुक्ती :

 • राम सेवक शर्मा यांची 27 जुलै 2015  रोजी ‘भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण’च्या (ट्राय) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
 • भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (Telecom Regulatory Authority of India TRAI) हे भारतातील दूरसंचार क्षेत्रावर नियंत्रणास्तव भारत सरकार द्वारा स्थापित स्वतंत्र संस्था आहे.
 • 1997 मध्ये भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अधिनियम 1997 अन्वये ट्रायची स्थापना करण्यात आली.
 • ट्रायचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.
 • तसेच शर्मा यांनी मे 2015 मध्ये निवृत्त झालेले राहुल खुल्लर यांची ते जागा घेतील.
 • राम सेवक शर्मा 1978 च्या बॅचचे झारखंड कॅडेरचे आयएएस अधिकारी आहेत.
 • इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव म्हणून सप्टेंबर 2015 मध्ये शर्मा निवृत्त होत आहेत.
 • तसेच त्यांनी यापूर्वी झारखंड सरकारचे मुख्य सचिव म्हणून काम केले आहे.
 • त्यांनी आयआयटी कानपूरमधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले असून कॅलिफोर्निया विद्यापीठातून (यूएसए) मास्टर्स इन कॉम्प्युटर सायन्स पदवी प्राप्त केली आहे.

‘एफएसएसएआय’च्या अध्यक्षपदी आशिष बहुगुणा :

 • आशिष बहुगुणा यांची भारतीय ‘अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण’च्या अध्यक्षपदी (Food Safety and Standards Authority : FSSAI) नियुक्ती करण्यात आली.
 • ‘अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण’ची (Food Safety and Standards Authority : FSSAI) स्थापना ऑगस्ट 2011 मध्ये अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, 2006 अन्वये करण्यात आली.
 • या कायद्यामध्ये विविध मंत्रालयांद्वारे अन्न विषयक मुद्दे हाताळण्यासाठी केलेल्या विविध कायदे व आदेशांना अंतर्भूत केले आहे.
 • आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे ‘एफएसएसएआय’ची अंमलबजावणी केली जाते.
 • त्याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.
 • त्याची कारकीर्द तीन वर्षाची असेल तसेच जानेवारी 2015 मध्ये निवृत्त झालेले के. चंद्रमौली यांची ते जागा घेतील.
 • जानेवारी 2015 पासून हे पद रिक्त होते आणि आरोग्य विभागाचे सचिव भानू प्रताप शर्मा यांच्यावर ‘एफएसएसएआय’च्या अध्यक्षपदाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली होती.
 • बहुगुणा राजस्थान कॅडेरचे एक 1978 च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) अधिकारी आहेत.
 • ते फेब्रुवारी 2015 मध्ये कृषी मंत्रालयाच्या सचिव पदावरुन निवृत्त झाले आहेत.

नेपाळमध्ये पशू हत्येवर बंदी :

 • नेपाळमध्ये गधीमाई उत्सवादरम्यान होणाऱ्या पशू हत्येवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 • तसेच गढीमाई मंदिराच्या ट्रस्टेनेच ही बंदी घातली आहे.
 • गढीमाई उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात बैल, बकऱ्या, कोंबड्या, म्हशी इत्यादी प्राण्यांची हत्या केली जात होती.
 • दर पाच वर्षांनी हा उत्सव साजरा केला जात होता.
 • जगातील सर्वांत मोठ्या प्रमाणात या उत्सवात पशूंची हत्या होत होती.
 • जगात सर्वात जास्त पशूबळी नेपाळच्या गढीमाई मंदिरातील जत्रेच्या काळात जातात.
 • गढीमाई मंदिरात पुढील पूजा 2019 मध्ये होणार आहे.
 • या जत्रेसाठी येताना भाविकांनी प्राणी आणू नयेत असे आवाहन मंदिराच्यावतीने करण्यात आले आहे.
 • भारतासह अनेक देशांनी ही पद्धत बंद करावी यासाठी मागील काही वर्षांपासून सातत्याने नेपाळ सरकारला पशूबळी थांबवण्याचे आवाहन केले होते.
 • अखेर या आवाहनाला प्रतिसाद देत गढीमाई मंदिराच्या ट्रस्टने पशूबळींवर बंदी घातली आहे.
 • भारतात सुप्रीम कोर्टाने एका सुनावणीदरम्यान गढीमाई मंदिरातील पशुबळींवर बंदी घालण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
 • तसेच भारतातून गढीमाई मंदिरात जाणाऱ्या पशूंवर बंदी घातली होती.

दिनविशेष :

 • 1917पहिले महायुद्ध – य्प्रेसची तिसरी लढाई.
 • 1951जपान एरलाइन्सची स्थापना.
 • 1954 – इटलीच्या अर्दितो देसियोच्या नेतृत्त्वाखाली गिर्‍यारोहक पथकाचे के-2 शिखरावर पहिले यशस्वी आरोहण.
 • 1971अपोलो 15 च्या अंतराळवीरांनी चंद्रावर पहिल्यांदा मानवनिर्मित बग्गी चालवली.

 

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.