Current Affairs of 31 August 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (31 ऑगस्ट 2016)

चालू घडामोडी (31 ऑगस्ट 2016)

भारत-अमेरिका यांच्यात संरक्षण करार :

  • भारत आणि अमेरिकेला एकमेकांचे लष्करी तळ वापरण्याची संमती देणाऱ्या महत्त्वाच्या करारावर (दि.30) स्वाक्षरी झाली.
  • संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर आणि अमेरिकेचे संरक्षण मंत्री ऍश्‍टन कार्टर यांच्या उपस्थितीत झालेल्या या लष्करी सहकार्य करारानुसार (लॉजिस्टिक एक्‍स्चेंज मेमोरेन्डम ऑफ ऍग्रिमेंटलिमोआ) दोन्ही देश एकमेकांना ‘थेट कारवाईदरम्यान’ सहकार्य करू शकणार आहेत.
  • तसेच या करारानुसार, दोन्ही देशाचे लष्कर इंधन भरण्यासाठी, पुरवठ्यासाठी अथवा दुरुस्तीसाठी एकमेकांचे लष्करी तळ वापरू शकणार आहेत. या वेळी वापरलेल्या सेवेचा योग्य मोबदला देण्याची आणि संबंधित देशाच्या पूर्वपरवानगीची अट या करारात आहे.
  • याशिवाय, भारताबरोबर अधिक प्रमाणात अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञान आणि सामग्रीचे आदानप्रदान करण्यास अमेरिकेने मान्यता दिली असल्याने भारत हा अमेरिकेचा अत्यंत जवळचा संरक्षण सहकारी बनला आहे.
  • दोन्ही देशांचे संरक्षण संबंध ‘समान उद्देश आणि हिता’वर आधारित असल्याचे या वेळी सांगण्यात आले.
  • तसेच, जागतिक शांतता आणि सुरक्षेसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांमध्येही हातभार लावण्याचा उद्देश कायम असल्याचे दोन्ही देशांनी स्पष्ट केले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (29 ऑगस्ट 2016)

वन-डे क्रिकेट मध्ये इंग्लंडचा विश्‍वविक्रम नोंद :

  • इंग्लंडने वन-डे क्रिकेटमधील सांघिक धावसंख्येचा विश्‍वविक्रम केला.
  • पाकिस्तानविरुद्ध ट्रेंटब्रीज मैदानावर तिसऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडने 3 बाद 444 धावा केल्या.
  • तसेच यापूर्वीचा उच्चांक त्यांनी एका धावेने मोडला. श्रीलंकेने 2006 मध्ये ऍमस्टलवीन येथील सामन्यात नेदरलॅंड्‌सविरुद्ध 9 बाद 443 धावा केल्या होत्या.
  • इंग्लंडकडून ऍलेक्‍स हेल्सने 171 धावांची खेळी केली. त्याचे हे होमग्राउंड आहे. त्याने ज्यो रूट याच्या साथीत दुसऱ्या विकेटसाठी 248 धावांची भागीदारी रचली.
  • संक्षिप्त धावफलक –
  • इंग्लंड50 षटकांत 3 बाद 444 (ऍलेक्‍स हेल्स 171122 चेंडू, 22 चौकार, 4 षटकार, 140.16 स्ट्राईक रेट, ज्यो रुट 8586 चेंडू, 8 चौकार, जॉस बट्लर नाबाद 9051 चेंडू, 7 चौकार, 7 षटकार, इऑन मॉर्गन नाबाद 5727 चेंडू, 3 चौकार, 5 षटकार, महंमद आमीर 10-0-72-0, हसन अली 10-0-74-2, वहाब रियाझ 10-0-110-0, महंमद नवाझ 1-62)

बांगलादेशचा युद्धकैदी अलीची फाशीचा निर्णय कायम :

  • बांगलादेश मुक्तिसंग्रामात 1971 मध्ये पाकिस्तानबरोबर झालेल्या युद्धातील कैदी असलेला आरोपी व ‘जमाते इस्लामी’ या संघटनेचा प्रमुख नेता मीर कासीम अली (वय 64) याची फाशीची शिक्षा येथील सर्वोच्च न्यायालयाने (दि.30) कायम ठेवली.
  • फाशीची शिक्षा रद्द व्हावी, यासाठी कासीमने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 
  • तसेच याची सुनावणी झाल्यावर मुख्य न्यायाधीश सुरेंद्रकुमार सिन्हा यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यांच्या खंडपीठाने ‘नामंजूर‘ या एका शब्दातच निकाल दिला.
  • न्या. सिन्हा हे बांगलादेशातील पहिले हिंदू न्यायाधीश आहेत. या निकालानंतर ऍटर्नी जनरल मेहबूबी अलम म्हणाले, की फाशीच्या शिक्षेतून सूट मिळण्यासाठी आता अली याला राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करावा लागेल.
  • जर त्याचा दयेचा अर्ज फेटाळला तर अलीला कोणत्याही क्षणी फासावर चढविले जाईल.
  • बांगलादेशमधील 1971च्या मुक्तिसंग्रामात मानवतेविरोधात गुन्हे गेल्याचा आरोप त्याच्यावर असून, फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

योगेश्वर दत्तला मिळणार रौप्यपदक :

  • रिओ ऑलिंपिकमध्ये पहिल्या फेरीतच पराभवाला सामोरे जावे लागलेल्या कुस्तीपटू योगेश्वर दत्तला आता 2012 लंडन ऑलिंपिकमधील कामगिरीमुळे रौप्यपदक मिळणार आहे.
  • योगेश्वर लंडन ऑलिंपिकमध्ये ब्राँझपदक मिळाले होते. तो खेळत असलेल्या 60 किलो फ्रीस्टाईल प्रकारातील रौप्यपदक विजेता रशियाचा खेळाडू बेसिक कुदुखोव हा उत्तेजक द्रव सेवन चाचणीत दोषी आढळल्याने योगेश्वर आता रौप्यपदक देण्यात येणार आहे.
  • कुदुखोव याचा 2013 मध्येच अवघ्या 27 व्या वर्षी एका कार अपघातात त्याचा मृत्यू झाला आहे.
  • मात्र, आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने (आयओसी) लंडन ऑलिंपिकदरम्यान गोळा केलेल्या नमुन्यांचे पुन्हा परीक्षण केल्यानंतर त्यात कुदुखोव दोषी आढळला आहे.
  • नियमांनुसार खेळाडूंचे नमुने 10 वर्षांपर्यंत सुरक्षित ठेवले जातात.
  • योगेश्वरला रौप्य मिळाल्याचे अद्याप अधिकृत जाहीर करण्यात आलेले नाही.
  • रिओ ऑलिंपिकमध्ये योगेश्वरकडून भारताला पदकाची आशा होती. पण, त्याला पहिल्याच फेरीतून बाहेर व्हावे लागले होते.
  • तसेच या पदकामुळे कुस्तीमध्ये सुशीलकुमारनंतर रौप्यपदक मिळविणारा योगेश्वर हा दुसरा खेळाडू ठरणार आहे.

आयसीसी टी-20 क्रमवारीत अश्विनचे पुनरागमन :

  • भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली याने आयसीसी टी-20 फलंदाजांच्या क्रमवारीतील आपले अग्रस्थान कायम राखले आहे.
  • तसेच ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल 5 स्थानांमध्ये पुनरागमन केले आहे. त्याची तीन स्थानांनी प्रगती झाली असून ताज्या क्रमवारीनुसार अश्विन चौथ्या क्रमांकावर विराजमान आहे.
  • वेस्ट इंडिजयविरुध्द अमेरिकेतील लॉडरहिल येथे झालेल्या दोन सामन्यांच्या टी-20 मालिकेत नाबाद शतक झळकावणारा लोकेश राहुलने तब्बल 67 क्रमांकानी मोठी झेप घेत 31 वे स्थान पटकावले आहे.
  • तसेच या मालिकेतील पहिल्या सामन्यात विक्रमी 489 धावा काढल्या गेल्या. यामध्ये राहुलने नाबाद 110 धावांची घणाघाती खेळी केली होती.
  • विंडिजने प्रथम फलंदाजी करताना 245 धावा केल्या होत्या आणि या धावांचा पाठलाग करताना भारताला 244 धावांवर समाधान मानावे लागले होते.
  • दोन वेळचा टी-20 जगज्जेत्ता वेस्ट इंडिजचे या मालिकेनंतर 125 गुण असून भारताचे गुण 126 झाले आहेत.
  • न्यूझीलंड सर्वाधिक 132 गुणांसह अव्वल स्थानी विराजमान आहे.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.