Current Affairs of 30 September 2015 For MPSC Exams

चालू घडामोडी (30 सप्टेंबर 2015)

चालू घडामोडी (30 सप्टेंबर 2015)

कनिष्ठ पदांसाठीच्या मुलाखती रद्द करण्यात येतील :

  • शासकीय नोकऱ्यांमधील कनिष्ठ पदांसाठी करण्यात येणाऱ्या “शिफारशी”ची संस्कृती बंद करण्यासाठी यापुढे कनिष्ठ पदांसाठीच्या मुलाखती रद्द करण्यात येतील असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिनाभरापूर्वी म्हटले होते.
  • त्याला प्रतिसाद देत सरकार यंत्रणेने मुलाखती रद्द करण्यासाठी प्रक्रिया सुरू केल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तवाहिनीने दिले आहे.
  • येत्या नवीन वर्षापासून म्हणजेच 1 जानेवारी 2016 पासून अंमलात येणाऱ्या नव्या पद्धतीमध्ये कनिष्ठ पदांसाठीच्या मुलाखती रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • तसेच एखाद्या विभागाला मुलाखती घेणे आवश्‍यक वाटल्यास त्यासाठी केंद्र सरकारच्या मनुष्यबळ व प्रशिक्षण विभागाची विशेष मान्यता घ्यावी लागणार आहे.
  • लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्यदिनानिमित्त भाषण करताना पंतप्रधान मोदी यांनी मुलाखती रद्द करण्याची घोषणा केली होती.

बिलियर्डसपटू पंकज अडवानी यांना चौदावे जागतिक विजेतेपद :

  • प्रतिभाशाली बिलियर्डसपटू पंकज अडवानीने चौदावे जागतिक विजेतेपद संपादन करीत कारकिर्दीत आणखी एक “माईलस्टोन” गाठला.
  • ऑस्ट्रेलियातील ऍडलेडमधील स्पर्धेत त्याने वेळेच्या स्वरूपाची (टाइम फॉरमॅट) स्पर्धा जिंकली.
  • त्याने पीटर गिलख्रिस्ट या मातब्बर खेळाडूला हरविले.
  • गिलख्रिस्टकडून तो गुणांच्या स्वरूपाच्या (पॉइंट फॉरमॅट) स्पर्धेतील अंतिम सामन्यात हरला होता.
  • पंकजने अंतिम सामना एकतर्फी करीत जवळपास दुप्पट गुणांच्या फरकाने विजय मिळविला.
  • 249 गुणांचा ब्रेक गिलख्रिस्टकरिता सर्वोच्च ठरला आणि तो पाच शतकी ब्रेक नोंदवू शकला.
  • या तुलनेत पंकजचा सर्वोच्च ब्रेक अखंडित 430 गुणांचा होता.
  • याशिवाय त्याने दोन त्रिशतकी, एक द्विशतकी, तर सहा शतकी ब्रेक मिळविले.
  • पंकजने 2005 मध्ये प्रथम गुणांच्या स्वरूपाचे विजेतेपद मिळविले.

क्‍लाउड कॉम्प्युटिंग डेटा सेंटर्स “डिजिटल महाराष्ट्रा”साठी मैलाचा दगड :

  • मायक्रोसॉफ्ट या कंपनीने स्थापन केलेली पुणे आणि मुंबई येथील क्‍लाउड कॉम्प्युटिंग डेटा सेंटर्स “डिजिटल महाराष्ट्रा”साठी मैलाचा दगड ठरणार असल्याचा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
  • मायक्रोसॉफ्टच्या या दोन डेटा सेंटरचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले.
  • या वेळी मायक्रोसॉफ्टचे भारतातील मुख्य व्यवस्थापक भास्कर प्रामाणिक उपस्थित होते.
  • मायक्रोसॉफ्ट या कंपनीने भारतात पुणे, मुंबई आणि चेन्नई येथे ही डेटा सेंटर उभारली आहेत.
  • या केंद्राची भारतातीलच नव्हे तर आशियातील सर्व देशांमधील माहिती ठेवण्याची क्षमता आहे.
  • या केंद्रामुळे मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत.
  • सेवा क्षेत्रात पूरक रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत तसेच या केंद्रांच्या मदतीने सरकारी कार्यालये जनतेस देणाऱ्या सेवा अधिक वेगाने देण्यास समर्थ होतील.

दोन वर्षांच्या किमान नोकरीची अट रद्द :

  • नव्याने शासन सेवेत रुजू झालेल्या महिला कर्मचाऱ्यांना प्रसूती रजा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला.
  • यापूर्वी असलेली दोन वर्षांच्या किमान नोकरीची अट रद्द करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
  • महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम 1981 मधील प्रचलित नियमानुसार दोन वर्षं किंवा अधिक सेवा झालेल्या महिला कर्मचारीच 180 दिवसांपर्यंतच्या भर पगारी प्रसूती रजा घेण्यास पात्र आहेत.
  • एका वर्षापेक्षा अधिक परंतु दोन वर्षांपेक्षा कमी सेवा झालेल्या महिला कर्मचाऱ्यांना अर्ध पगारी प्रसूती रजा देण्यात येते.
  • मात्र एक वर्षापेक्षा कमी सेवा झालेल्या महिला कर्मचाऱ्यास प्रसूती रजा दिली जात नव्हती, त्यामुळे शासन सेवेत नव्याने रुजू झालेल्या मात्र प्रसूतीच्या कारणास्तव रजेची आवश्‍यकता असणाऱ्या महिला कर्मचारी प्रसूती रजेपासून वंचित होत्या.
  • यामुळे प्रचलित नियमातील किमान दोन वर्षांच्या सेवेची अट रद्द करून नव्यानेच शासन सेवेत रुजू झालेल्या महिला कर्मचाऱ्यांना रुजू झाल्यानंतर तत्काळ प्रसूती रजेस पात्र ठरविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय वित्तमंत्र्यांनी घेतला आहे.
  • मात्र एखाद्या स्त्रीने नोकरी लागल्यापासून दोन वर्षांच्या आत प्रसूती रजा घेतली आणि काही कारणास्तव नोकरीचा राजीनामा दिल्यास संबंधित स्त्रीला सहा महिन्यांचे घेतलेले वेतन सरकारजमा करावे लागणार आहे.
  • तसेच विधवा स्त्रीला पतीची पेन्शन मिळत असताना तिने दुसरे लग्न केल्यास ही पेन्शन बंद होत असे. आता या नियमातही सुधारणा करण्यात आली असून, अशा स्त्रीची पेन्शन सुरू राहणार असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
  • “सरोगेट मदर”ला प्रसूती रजा मिळण्याची प्रचलित नियमात तरतूद नव्हती. मात्र माता म्हणून लहान मुलाचा तिलाही सांभाळ करावा लागत असल्याने सहा महिन्यांची भरपगारी प्रसूती रजा अशा स्त्रीलाही मिळणार असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली.

एसीबी महासंचालक प्रवीण दीक्षित यांची नवे पोलीस महासंचालक म्हणून निवड :

  • बुधवारी सेवानिवृत्त होत असलेले संजीव दयाल यांच्या जागी भ्रष्टाचाऱ्यांचे कर्दनकाळ ठरलेले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) महासंचालक प्रवीण दीक्षित यांची नवे पोलीस महासंचालक म्हणून निवड करण्यात आली आहे.
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्या नियुक्त्यांना मंजुरी दिली.
  • महामंडळ सुरक्षा विभागाचे प्रमुख विजय कांबळे हे एसीबीचे प्रमुख असतील.
  • पोलीस गृहनिर्माण विभागाचे महासंचालक अरुप पटनायक सेवानिवृत्त होत असल्याने त्यांच्या जागी सतीश माथूर यांची नियुक्ती झाली आहे.
  • तसेच विधी आणि तांत्रिक विभागाच्या महासंचालकपदी मीरा बोरवणकर यांना बढती देण्यात आली आहे.
  • प्रवीण दीक्षित हे 1977 च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत.
  • एसीबीचा पदभार घेतल्यानंतर त्यांनी गेल्या दोन वर्षांत भ्रष्ट व लाचखोरांविरुद्ध धडक मोहीम उघडली.
  • दीक्षित पुढच्या वर्षी 31 जुलैला सेवानिवृत्त होतील.
  • 2012 पासून पोलीस महासंचालक होते.

शासनाने ऑनलाईन दस्तनोंदणी केली सुरू :

  • दस्तनोंदणी गतिमान व पारदर्शक करण्यासाठी शासनाने ऑनलाईन दस्तनोंदणी सुरू केली.
  • यामध्ये आता पुढचे पाऊल टाकून नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने के्रडिट कार्ड वा कॅश कार्डद्वारेदेखील दस्तनोंदणीचे मुद्रांक शुल्क भरता येणार आहे.
  • यासाठी आवश्यक असलेल्या सर्व तांत्रिक बाबीची पूर्तता झाली असून, येत्या दोन दिवसांत संपूर्ण राज्यात ही सुविधा सुरू होईल, अशी माहिती नोंदणी व मुद्रांक विभागाचे महानिरीक्षक एन. रामास्वामी यांनी दिली.
  • मुद्रांक शुल्क विभागात विविध कागदपत्रांसाठी अंतर्गत चलन भरावे लागते. त्याचे शुल्क रोख द्यावे लागते. ते रोख न देता ऑनलाईन जमा करण्यासाठी मुद्रांक शुल्क विभाग प्रयत्नशील आहे.

बीसीसीआयने आपल्या नव्या अध्यक्षाच्या निवडीसाठी 4 ऑक्टोबर रोजी :

  • बीसीसीआयने आपल्या नव्या अध्यक्षाच्या निवडीसाठी 4 ऑक्टोबर रोजी आमसभेची विशेष बैठक बोलाविली आहे.
  • त्यात नागपूरचे अ‍ॅड. शशांक मनोहर सर्वांच्या पसंतीचे उमेदवार म्हणून पुढे आले आहेत.
  • तसेच ही बैठक मुंबईत होणार आहे.
  • नामांकन अर्जाची छाननी 3 ऑक्टोबर रोजी होईल.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.