Current Affairs (चालू घडामोडी) of 30 November 2014 For MPSC Exams

अ.क्र
ठळक घडामोडी
1. वरिष्ठ पेंशन वीमा योजना पुन्हा सुरू
2. मकरंद अनासपुरेंकडुन गोगलगाव स्वच्छतेसाठी द्तक
3. 19 वी सार्क शिखर परिषद पाकिस्तानात
4. व्हीएलएमएस (VLMS) नावाचे वेब आधारित अ‍ॅप
5. संस्कृत भाषा अतिरिक्त विषय
6. अखिल भारतीय सुरक्षा हेल्पलाइन कार्यान्वित

वरिष्ठ पेंशन वीमा योजना पुन्हा सुरू :

  • भारतीय जीवन वीमा महामंडळाद्वारे या योजनेची अमबाजवणी होईल आणि 15 ऑगस्ट 2014 ते 14 ऑगस्ट 2015 या कालावधीसाठीही योजना खुली राहील.
  • वरिष्ठ पेंशन योजनेत 60 वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या जेष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ व्हावा यासाठी सरकारने ही योजना पुन्हा सुरू केली.

मकरंद अनासपुरेंकडुन गोगलगाव स्वच्छतेसाठी द्तक :

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छता अभियानात अभिनेता मकरंद अनासपूरे सहभागी झाले आहेत व त्यांनी नेवासा तालुक्यातील (जिल्हा: अहमदनगर) गोगलगाव हे गाव दत्तक घेतले आहे.
  • गोगलगावात या उपक्रमावर आधारित ‘सापडेना राव …..गोगलगाव’ या चित्रपटाची निर्मितीही केली जाणार आहे.
  • चित्रपटाचा प्रारंभ हिवारेबाजाराचे सरपंच पोपट पवार यांच्या हस्ते झाला.

19 वी सार्क शिखर परिषद पाकिस्तानात :

  • 18 वी सार्क परिषद 2014 मध्ये नेपाळची राजधानी काठमांडू येथे पार पडली.
  • 19 वी सार्क परिषद 2016 मध्ये पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे होणार आहे.

व्हीएलएमएस (VLMS) नावाचे वेब आधारित अ‍ॅप :

  • या वेब अ‍ॅप मुळे मंत्रालये आणि पंतप्रधान कार्यालय यांच्यात कागद विरहित संवाद सुरू राहील.
  • पंतप्रधान संबोधित अति महत्वाच्या पत्रांच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी एनआयसीने व्हीव्हीआयपी लेटर्स मॉनिटरिंग सिस्टम नावाचे वेब अ‍ॅप विकसित केले आहे.

संस्कृत भाषा अतिरिक्त विषय :

  • न्यायालयाच्या या आदेशामुळे जर्मन भाषेचे तिसरे स्थान कायम राहणार आहे.
  • केंद्रीय विद्यालयांमध्ये इयत्ता आठवीसाठी संस्कृत भाषा अतिरिक्त विषय म्हणूनच शिकवला जावा, असे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला संगितले.
  • न्यायमूर्ती अनिल आर. दवे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हे आदेश दिले.

अखिल भारतीय सुरक्षा हेल्पलाइन कार्यान्वित :

  • रेल्वेच्या प्रवाशांना सुरक्षेसंदर्भात मदत मिळावी यासाठी 1800-111-322 ही अखिल भारतीय सुरक्षा हेल्पलाइन कार्यान्वित झाली आहे.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.