Current Affairs (चालू घडामोडी) of 30 January 2015 For MPSC Exams
अ.क्र |
ठळक घडामोडी |
1. | महाराष्ट्राच्या चित्ररथाचा पहिला क्रमांक |
2. | पुढच्या वर्षी टी-20 वर्ल्ड कप भारतात |
3. | पंतप्रधान बॅनरचे उपविजेतेपद महाराष्ट्राला |
4. | लर्निग लायसन्ससाठी महिलांना स्वतंत्र वेळ |
5. | सीन एबॉटला सर्वोत्तम क्रिकेट्पट्टुचा पुरस्कार |
6. | दिनविशेष |
महाराष्ट्राच्या चित्ररथाचा पहिला क्रमांक :
- संचालनात सहभागी झालेल्या महाराष्ट्राच्या चित्ररथाला पहिला क्रमांक मिळाला आहे.
- प्रजासत्ताक दिनाच्या संचालनात महाराष्ट्राने पंढरपूरची वारी हा विषय घेवून चित्रपटाची रचना केली होती.
- या चित्ररथातून महाराष्ट्रातील वारीला जाणारे वारकरी आणि त्यातून सामाजिक परंपरेचे दर्शन झाले.
- अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा तसेच राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांच्यासमोर या चित्ररथाचे सादरीकरण करण्यात आले.
- चंद्रशेखर मोरे यांनी या महाराष्ट्राच्या चित्ररथाचे संकल्पचित्र तसेच त्रिमिती आणि कला दिग्दर्शन तयार केले आहे.
- संतोष भांगारे यांच्या मार्गदर्शनाखाली ताल, मृदुंग, वीणेच्या गजरात सादरीकरण करण्यात आले.
पुढच्या वर्षी टी-20 वर्ल्ड कप भारतात :
- पुढच्या वर्षी 11 मार्च ते 3 एप्रिल टी-20 वर्ल्ड कप भारतात खेळला जाणार आहेत.
- आशियाला सलग श्रीलंका, बांग्लादेश आणि आता भारत सलग टी-20 चे यजमानपद आशियाई देशांना मिळाले आहे.
- तसेच 2019 च वर्ल्ड कप इंग्लंड मध्ये आयोजित केला जाणार आहे.
- आयसीसीचे महत्वपूर्ण निर्णय :
- अंतिम सामना टाय झाल्यास सुपर ओव्हर खेळवून निकाल लावला जाईल.
- ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये फेब्रुवारीत असलेल्या वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात ओव्हरचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
पंतप्रधान बॅनरचे उपविजेतेपद महाराष्ट्राला :
- नॅशनल कॉडेट कॉर्प्स(एनसीसी)चा सर्वोच्च बहुमान असणार्या पंतप्रधान बॅनरचे उपविजेतेपद महाराष्ट्राला मिळाले आहे.
- पंजाबला विजेते तर महाराष्ट्राला उपविजेतेपद मिळाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
- महाराष्ट्राला सलग दुसर्यांदा हा बहुमान मिळाला आहे.
लर्निग लायसन्ससाठी महिलांना स्वतंत्र वेळ :
- आरटीओत लर्निग लायसन्ससाठी महिलांना स्वतंत्र वेळ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- दुपारी 2 ते सायंकाळी 4 ही वेळ महिलांसाठी निश्चित करण्यात आली आहे.
- परिवहन मंत्री दिवाकर राऊत यांनी घोषणा केली.
सीन एबॉटला सर्वोत्तम क्रिकेट्पट्टुचा पुरस्कार :
- ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज सीन एबॉट ल सर्वोत्तम क्रिकेट्पट्टुचा पुरस्कार जाहीर.
- ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड ने हा पुरस्कार जाहीर केला आहे.
दिनविशेष :
- 30 जानेवारी – हुतात्मा दिन
- 30 जानेवारी – कुष्ठरोग निवारण दिन
- 1948 – महात्मा गांधींची गोळ्या घालून हत्या.
- 2002 – गरीब मुलांवर 57 हजार प्लॅस्टिक सर्जरी करणारे भारतीय डॉ. शरदकुमार दीक्षित यांना ‘एनआरआय ऑफ द इयर 2001’ पुरस्कार जाहीर.