Current Affairs of 30 December 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (30 डिसेंबर 2017)

चालू घडामोडी (30 डिसेंबर 2017)

लोकमान्य टिळकांच्या सिंहगर्जनेला 101 वर्षे पूर्ण :

 • लोकमान्य टिळक यांनी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळणारच’, ही सिंहगर्जना करून सामान्यांच्या मनातील ब्रिटिशांविरूद्धचा असंतोष जागा केला. या घोषणेला यंदा 101वर्षे पूर्ण होत आहेत.
 • या निमित्ताने उत्तर प्रदेश सरकारने आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात अरुण तिवारी यांच्या ‘ए मॉडर्न इन्टरप्रिटेशन ऑफ लोकमान्य टिलक्‍स्‌ गीतारहस्य’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.
 • लखनौ येथील लोकभवनात 30 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता आयोजित केलेल्या कार्यक्रमात उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक हे या पुस्तकाचे प्रकाशन करतील.
 • सांस्कृतिक संबंध वृद्धिंगत व्हावेत, या उद्देशाने उत्तर प्रदेश व महाराष्ट्र सरकारमध्ये सामंजस्य करारही होणार आहे.

अटल इनोव्हेशन मिशनच्या दुसर्‍या टप्प्यास सुरुवात :

 • निती आयोगाच्या ‘अटल इनोव्हेशन मिशन’ अंतर्गत सुरू केलेल्या ‘अटल टिंकरिंग लॅब’ या अभिनव योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात देशातील 1 हजार 504 शाळांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये राज्यातील 116 शाळांचा समावेश असून, निती आयोगाने नुकतीच या संबंधीची घोषणा केली.
 • निती आयोगाच्या दुसऱ्या टप्प्यात पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक 11 शाळांचा समावेश असून, मुंबई शहर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येकी 10 आणि नाशिक जिल्ह्यातील 5 शाळा समाविष्ट आहेत.
 • सहावी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असून, विद्यार्थ्यांच्या नव्या संकल्पनांना आकार देऊन त्यांच्यातील कौशल्य विकसित करणे या उद्देशाने ‘अटल टिंकरिंग लॅब’ उभारण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यात गेल्या वर्षी देशातील 928 तर, राज्यातील 75 शाळांचा या योजनेत समावेश करण्यात आला होता.

बंगळुरू महापालिकेच्या वतीने नवी योजना :

 • सध्या अजूनही काही ठिकाणी वंशाचा दिवा हवा यासाठी मुलाचा आग्रह धरला जातो. पण स्त्रीजातीचे अर्भक असल्यास अनेकदा त्या अर्भकाची भ्रूणहत्या केली जाते. असा प्रकार सर्रास घडत असल्याचे समोर आले. मात्र, आता 1 जानेवारीला मुलगी जन्माला आल्यास संबंधित बालिकेच्या नातेवाईकांना 5 लाख रुपये मिळणार आहे. हे पाच लाख रुपये मुलीच्या पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन म्हणून दिले जाणार आहे.
 • कर्नाटकाती बंगळुरू महापालिकेच्या वतीने ही नवी योजना आणण्यात आली. नववर्षाच्या सुरवातीला म्हणजे 1 जानेवारीला मुलगी जन्मास आल्यास 5 लाख रुपये दिले जाण्याचा विचार आहे. हे 5 लाख रुपये मुलीच्या भविष्यासाठी देण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती बंगळुरु महापालिकेचे महापौर आर. संपत राज यांनी दिली.
 • तसेच महापालिकेच्या वतीने देण्यात येणारे 5 लाख रुपये महापालिका आयुक्त आणि मुलीच्या संयुक्त बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

सिंधुदुर्ग किल्ला होडी वाहतूकदारांसाठी तात्पुरता बंद :

 • सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक वेल्फेअर असोशिएशनने बंदर विभागाला प्रलंबित मागण्यांचे निवेदन सादर केले होते; परंतु महिना उलटून गेला तरी बंदर विभागाकडून कोणताही ठोस निर्णय न झाल्याने 30 डिसेंबर ते 1 जानेवारी या तीन दिवसांसाठी किल्ले सिंधुदुर्गवरील प्रवासी होडी वाहतूक सेवा बंद ठेवली जाणार असल्याची माहिती किल्ला होडी प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष मंगेश सावंत यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
 • सध्या पर्यटन हंगाम सुरू आहे. वर्षअखेर आणि नववर्षाचा पहिला दिवस या दिवशी पर्यटकांची सर्वाधिक गर्दी असते. सिंधुदुर्गात येणाऱ्या पर्यटकांना मालवण किल्ला दर्शन हे सगळ्यांत मोठे आकर्षण असते; पण या बंदमुळे पर्यटकांना किल्ल्यावर जाता येणार नाही.

देशात डायनॅमिक रँकिंगमध्ये भद्रावती पालिका प्रथम :

 • स्वच्छ सर्वेक्षण 2018 अंतर्गत अ‍ॅपद्वारे तक्रारी नोंदवून प्रतिक्रिया देण्याबाबतच्या डायनॅमिक रँकिंगमध्ये भद्रावती नगर परिषदेने देशात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. असा मान मिळविणारे महाराष्ट्रातील हे पहिलेच शहर ठरले आहे.
 • भद्रावती नगरपालिकेच्या या प्रक्रियेमध्ये साडेचार हजार नागरिकांनी अ‍ॅप डाऊनलोड करून घेतले. त्यातील पावणेचार हजार नागरिक दररोज तक्रारी अपलोड करीत असून स्वच्छता अभियानात आपला सहभाग दर्शवीत आहेत.
 • भद्रावती शहराची स्पर्धा छत्तीसगढमधील सरायपल्ली या 20 हजार लोकसंख्येच्या शहरासोबत होती. 15 दिवसांपासून हे शहर प्रथम क्रमांक टिकवून होते. या काळात सरायपल्ली व भद्रावती शहरातील गुणांचा फरक हा पाच ते 10 हजारांच्या दरम्यान होता.
 • मात्र तीन दिवसांच्या सलग सुट्यांमध्ये भद्रावतीकरांनी या अभियानात उत्स्फूर्त सहभाग घेतल्याने 25 डिसेंबरला हा फरक केवळ 180 गुणांचा राहिला. अखेर त्यावर 27 डिसेंबरला भद्रावती शहराने सरायपल्ली शहरावर दोन हजार गुणांची आघाडी घेत प्रथम क्रमांक पटकाविला.

महिला बोगीत बॅरिकेड्स-महाव्यवस्थापक :

 • एसी लोकलमध्ये महिला आणि पुरुष बोगींची रचना सलग आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेसाठी महिला बोगीत बॅरिकेड्स बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक ए.के. गुप्ता यांनी दिली.
 • एसी लोकलमधील महिला प्रवाशांनी अन्य लोकलमध्ये विशेष बोगीची मागणी केली आहे. एसी लोकलमध्ये सलग बोगींची रचना आहे. एकमेकांसोबत या बोगी जोडण्यात आल्या आहेत. महिला बोगीत पुरुष प्रवाशांना बंदी आहे.
 • बोगीच्या सलग रचनेमुळे महिलांसाठी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हे पाऊल उचलण्यात आले आहे. गर्दीच्या काळात तसेच महिला सुरक्षितता लक्षात घेत महिला बोगीत बॅरिकेड्स बसवण्यात येणार आहे.
 • बॅरिकेड्स नियोजनाच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत. सध्या एसी लोकलमध्ये पहिली आणि शेवटची बोगी महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. लवकरच एसी लोकलमध्ये महिला आणि पुरुष बोगीमध्ये वर्गीकरणासाठी बॅरिकेड्सची उभारणी करण्यात येणार आहे.

दिनविशेष :

 • सन 1906 मध्ये 30 डिसेंबर रोजी ऑल इंडिया मुस्लिम लीगची ढाका येथे स्थापना. या घटनेतच भारताच्या फाळणीची बीजे रोवली गेली.
 • एडविन हबलने आकाशगंगे खेरीज इतर दीर्घिकाही अस्तित्त्वात असल्याचे 30 डिसेंबर 1924 रोजी जाहीर केले.
 • 30 डिसेंबर 1943 मध्ये सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअर येथे भारतीय स्वातंत्र्याचा झेंडा फडकविला.
 • ‘सी++’ प्रोग्रामिंग भाषाचे जनक बर्जनी स्ट्रास्ट्रुप यांचा जन्म 30 डिसेंबर 1950 मध्ये झाला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

आजच्या चालू घडामोडींचा व्हिडिओ

{source}
<iframe width=”350″ height=”250″ src=”https://www.youtube.com/embed/CBStHfN5g7o?autoplay=1″ frameborder=”0″ gesture=”media” allow=”encrypted-media” allowfullscreen></iframe>
{/source}
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.