Current Affairs (चालू घडामोडी) of 30 December 2014 For MPSC Exams

 

अ.क्र
ठळक घडामोडी
1. सर्व बँक खात्यांसाठी एकच ‘ई-पासबूक
2. म्यूचुअल फंड विक्रीसाठी समिती
3. ‘बीसीसीआय’ची ओझावर बंदी
4. सत्यार्थीना नोबेल

 

 

 

 

सर्व बँक खात्यांसाठी एकच ‘ई-पासबूक’ :

  • व्यवहार करणे सुलभ करण्याच्या दृष्टीने आता सर्व बँकांसाठी एकच वेबसाईट ही संकल्पना प्रत्ययास येणार आहे.
  • 2015 मध्ये मार्चपुर्वी ही वेबसाईट प्रत्यक्षात येणार असून, त्यामुळे बँकिंग व्यवहार अधिक सुलभ होतील असे मानले जात आहे.
  • रिझर्व्ह बँकेच्या देखरेखीखाली आता नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून वेबसाईटची निर्मिती सुरू झाली आहे.
  • ग्राहकाला या वेबसाईटवरुण अकाऊंटमधील बॅलेन्स तपासणे, बिल भरणा करणे किंवा याच्याच एका खात्यातून दुसर्‍या खात्यात पैसे जमा करणे अशा प्राथमिक सुविधा देण्यात येतील.

म्यूचुअल फंड विक्रीसाठी समिती:

  • म्यूचुअल फंड उद्योगाला नव्याने चालना देण्यासाठी भारतीय रोख व विनिमय मंडळ अर्थात सेबीने तज्ज्ञ समितीची स्थापना केली आहे.
  • ही समिती इंटरनेट मोबाईल यासारख्या डिजिटल माध्यमांचा वापर करून म्यूचुअल फंड अर्थात एमएफ उत्पादनांच्या वितरणाचा मार्ग सुचविणार आहे.

‘बीसीसीआय’ची ओझावर बंदी :

  • भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अवैध गोलंदाजी शैलीमुळे फिरकी गोलंदाज प्रज्ञान ओझा याच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.
  • रणजी ट्रॉफीत हैद्राबादकडून खेळणार्‍या ओझाच्या अवैध गोलंदाजी शैलीची माहिती हैद्राबाद संघटनेला देण्यात आली आहे.

सत्यार्थीना नोबेल :

  • सन 2014 मध्ये जगात प्रतिष्ठित समजला जाणारा शांततेचा नोबेल पुरस्कार भारतातील बालहक्कांसाठी काम करणार्‍या कैलाश सत्यार्थी यांना प्रदान करण्यात आला.
  • सत्यार्थी यांनी बालकांना त्यांचे हक्क आणि अधिकार मिळावेत, त्यांना शिक्षण मिळावे तसेच बालकामगार म्हणून त्यांची पिळवणूक करण्यात येऊ नये म्हणून मोठी चळवळ उभारली.
  • त्यांनी 1980 साली “बचपण बचाओ आंदोलन” या मोहिमेतून त्यांनी आपल्या कार्याला सुरवात केली.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.