Current Affairs of 3 March 2018 For MPSC Exams

चालू घडामोडी (3 मार्च 2018)

चालू घडामोडी (3 मार्च 2018)

जागतिक विद्यापीठांमध्ये ‘एमआयटी’ अव्वलस्थानी :

 • ‘क्वॅकक्वॅरेली सायमंड’ या संस्थेने 2018 मधील जागतिक पातळीवरील उत्कृष्ट विद्यापीठांची क्रमवारी नुकतीच जाहीर केली आहे. अमेरिकेतील मॅसॅच्युसेक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (एमआयटी) सलग सहाव्या वर्षी बाजी मारली आहे.
 • जगातील 950 उत्कृष्ट विद्यापीठांमध्ये ‘एमआयटी‘ यंदाही प्रथम क्रमांकावर झळकत आहे. विशेष म्हणजे या यादीतील पहिली चारही विद्यापीठे अमेरिकेतील आहेत. दुसरा क्रमांक स्टॅनफर्ड विद्यापीठाने पटकाविला असून, तिसऱ्या व चौथ्या जागेवर अनुक्रमे हारवर्ड विद्यापीठ व कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी या शैक्षणिक संस्था आहेत.
 • ब्रिटनमधील विद्यापीठांची घसरण सुरूच असल्याचे या वर्षीही दिसून येते. 76 ब्रिटिश विद्यापीठांपैकी 51 विद्यापीठे एका क्रमांकाने उतरली आहेत. यात केवळ कॅब्रिज विद्यापीठाचा समावेश पहिल्या पाचामध्ये असून, त्याचा क्रमांक पाच आहे.
 • भारतातील नऊ विद्यापीठांना या यादीत स्थान मिळाले आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्थांपैकी दिल्लीतील तंत्रशिक्षण संस्थेला 172 वे स्थान मिळाले आहे. आयआयटी मुंबई 179, आयआयएस्सी बंगळूर 190, तर आयआयटी मद्रासचे 264 वा क्रमांक आहे. दिल्ली विद्यापीठ 481-490 या स्थानावर आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (2 मार्च 2018)

बारामती महिला ग्रामीण रुग्णालयास राज्य शासनाचा पुरस्कार :

 • राज्य शासनाच्या वतीने दिल्या जाणा-या काया कल्प अंतर्गत राज्य स्तरावरील व्दितीय क्रमांकाचे 20 लाख रुपयांचे पारितोषिक बारामतीच्या महिला ग्रामीण रुग्णालयास जाहीर झाले आहे. अवघ्या तीनच वर्षात राज्यस्तरावरील वैशिष्टयपूर्ण समजला जाणारा हा पुरस्कार या रुग्णालयाने पटकावल्याने बारामतीकरांनी आनंद व्यक्त केला.
 • येथील डॉ. बापू भोई यांनी गेल्या तीन वर्षात या रुग्णालयाचा चेहरामोहरा बदलून अधिकाधिक समाजाभिमुख करण्यासाठी मनापासून प्रयत्न केल्यानेच शासन स्तरावरही त्याची नोंद घेतली गेली. एप्रिल 2015 पासून फेब्रुवारी 2018 अखेरीस या रुग्णालयाने 3656 नॉर्मल प्रसूती तर 2012 सिझेरियन प्रसूती करुन तब्बल 5668 प्रसूती विनामूल्य करण्याचा नवीन विक्रमच प्रस्थापित केलेला आहे.
 • तसेच या रुग्णालयामध्ये अवघे दहा रुपये भरुन केसपेपर काढल्यानंतर तपासणी, औषधोपचार, शस्त्रक्रिया, औषधे, इंजेक्शन किंवा रक्त लघवी तपासणी कशासाठीही एक रुपयाही द्यावा लागत नाही. पूर्णपणे शासकीय निधीतून महिलांवर प्रभावी उपचार येथे केले जातात.
 • तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाठपुरावा करुन अवघ्या 365 दिवसांत ही इमारत उभारण्यात मोलाची भूमिका बजावली. त्यानंतर शासन दरबारी पाठपुरावा करुन हे रुग्णालय अधिकाधिक सुसज्ज करण्याचा प्रयत्न केला.

‘फरार आर्थिक गुन्हेगार विधेयका’ला केंद्र सरकारची मंजूरी :

 • केंद्र सरकारने ‘फरार आर्थिक गुन्हेगार विधेयका’ला 1 मार्च रोजी मंजूरी दिली. आर्थिक घोटाळे करुन परदेशात पळून जाणाऱ्यांची संपत्ती जप्त करण्यासाठी हे विधेयक आणण्यात आले आहे. या कायद्याच्या सहाय्याने भारतातून देशाबाहेरील संपत्ती संबंधीत देशाच्या सहकार्याने जप्त करण्यात येऊ शकते, अशी माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली आहे.
 • आर्थिक घोटाळे करुन कारवाई टाळण्यासाठी परदेशात पळून जाणाऱ्या विजय मल्ल्या, नीरव मोदी यांसारख्या गुन्हेगारांवर कठोर कारवाईसाठी या विधेयकाची बऱ्याच काळापासून मागणी होत होती. अखेर केंद्रीय मंत्रीमंडळाने फरार आर्थिक गुन्हेगार विधेयक 2018 ला मंजूरी दिली.
 • मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत अरुण जेटली यांनी सांगितले की, फरार आर्थिक गुन्हेगार विधेयकाला मंजूरी देशहितासाठी अत्यंत आवश्यक होते. यामुळे मोठ्या आर्थिक गुन्हेगारांवर कारवाई करणे सोपे होणार आहे. याव्यतिरिक्त अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नॅशनल फायनान्शिअल रिपोर्टिंग अथॉरिटी (एनएफआरए) या संस्थेची स्थापनाही केली.
 • तसेच लिस्टेड आणि मोठ्या कंपन्यासाठी याची नोंदणी बंधनकारक असणार आहे. यामुळे आर्थिक घोटाळ्यात समावेश असणाऱ्या ऑडिटर्स आणि सीए यांच्यावर यामुळे कडक कायदेशीर कारवाई करता येणार आहे.

बँकांचे नवे व्याजदर 1 मार्चपासून लागू :

 • भारतीय स्टेट बँक, पंजाब नॅशनल बँक आणि आयसीआयसीआय बँक या देशातील तीन मोठ्या बँकांनी आपल्या कर्जावरील व्याजदरात वाढ केली आहे. यामुळे नवे कर्ज घेणाऱ्यांना याचा फटका बसणार आहे. हे व्याजदर 1 मार्चपासून लागू करण्यात आले आहेत. बँकांच्या या निर्णयामुळे गृहकर्ज महागणार असून त्यामुळे इएमआयमध्येही वाढ होणार आहे.
 • एसबीआयने एप्रिल 2016 नंतर पहिल्यांदाच आपल्या व्याजदरांमध्ये वाढ केली आहे. या बँकेच्या एका वर्षाच्या कर्जावर एमसीएलआर 7.95 टक्के इतका होता. यामध्ये 0.20 टक्के वाढ करण्यात आली आहे.
 • तसेच याबरोबर सहा महिन्यांच्या कर्जावर एमसीएलआर 0.10 टक्के वाढवून 8 टक्के ठेवण्यात आला आहे. 3 वर्षांच्या कालावधीसाठी व्याजदरांत 0.25 टक्के वाढ करण्यात आली असून तो 8.35 टक्के इतका करण्यात आला आहे.
 • एसबीआयप्रमाणेच आयसीआयसीआय आणि पीएनबी बँकेने देखील एमसीएलआरमध्ये 15 बेसिस पाँईंटने वाढ केली आहे. त्यानंतर आता एचडीएफसी आणि इतरही काही बँका पुढच्या आठवड्यापर्यंत व्याजदरात वाढ करु शकतात.

ड्रोन कॅमेऱ्याव्दारे राज्यातील गावठाणांचे सर्वेक्षण :

 • पुणे जिल्हा महसूल विभागाच्या मदतीने भारतीय सर्वेक्षण विभाग सोनोरी (ता. पुरंदर) गावठाणाचे ‘ड्रोन’ कॅमेऱ्यांव्दारे सर्वेक्षण करून डिजिटल नकाशे तयार करणार आहे. त्यामुळे अवघ्या तीन दिवसांत खासगी, सरकारी मालमत्तेसह सरकारी मोकळ्या जागांचा नकाशा तयार होणार आहे. यामुळे गावठाणातील प्रत्येकाला प्रॉपर्टीकार्ड मिळणार आहे.
 • तसेच या वर्षअखेर राज्यातील 43 हजार गावठाणांचा डिजिटल नकाशा तयार होणार असल्याची माहिती सर्वेक्षण अधिकारी एस. त्रिपाटी यांनी दिली.
 • भारतीय सर्वेक्षण विभागाच्या डेहराडूनच्या मुख्य कार्यालयातून एक पथक येणार असून, पाच मार्चला सारोळे गावठाणाचे ड्रोन कॅमेऱ्याद्वारे छायाचित्रीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर येरवड्यातील भारतीय सर्वेक्षण विभागाच्या कार्यालयात छायाचित्रीकरणावर प्रक्रिया करून दोन दिवसांत डिजिटल नकाशे तयार करण्यात येणार आहेत.
 • या नकाशांच्या आधारे गावठाणातील खासगी, सरकारी मालमत्तेच्या व सरकारी मोकळ्या जागेच्या नोंदी होणार आहेत. त्यामुळे गावठाणातील प्रत्येकाला त्यांच्या मालमत्तेची खरेदी व विक्री करणे सोपे होणार आहे. भविष्यात सरकारी मोकळ्या जागेवरील अतिक्रमणांचा प्रश्‍नच उद्‌भवणार नसल्याचे त्रिपाटी यांनी सांगितले.

दिनविशेष :

 • टेलिफोनचा जनक ‘अॅलेक्झांडर ग्राहम बेल’ यांचा जन्म सन 1847 मध्ये 3 मार्च रोजी झाला.
 • नाशिक येथील कला राम मंदिरात सर्वांना प्रवेश मिळण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 3 मार्च 1930 रोजी सत्याग्रह केला.
 • सौदी अरेबिया मध्ये खनिज तेलाचा शोध 3 मार्च 1938 मध्ये लागला.
 • 3 मार्च 1973 रोजी भारताच्या ओडिशा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली.
 • जयपूर येथील गिटारवादक पंडित विश्वमोहन भट यांना सन 1994 मध्ये 3 मार्च रोजी ग्रॅमी पुरस्कार प्रदान केला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (4 मार्च 2018)

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.