Current Affairs (चालू घडामोडी) of 3 January 2015 For MPSC Exams

 

अ.क्र
ठळक घडामोडी
1. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. वसंत गोवारीकर यांचे निधन
2. भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी रावसाहेब दानवेंची निवड निश्चित
3. साठेबाजीविरोधी कायद्यात बदल
4. ‘बुर्ज खलिफा’चा विश्वविक्रम
5. “ज्ञानसंगम” बैठक पुण्यात सुरू
6. दिनविशेष

 

ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. वसंत गोवारीकर यांचे निधन :

  • ज्येष्ठ शास्त्रज्ञ वसंत गोवारीकर यांचे शुक्रवारी सकाळी पुण्यात निधन झाले.
  • अवकाश संशोधन, हवामान शास्त्र आणि लोकसंख्या क्षेत्रातील त्यांचे संशोधन अत्यंत महत्वपूर्ण मानले जाते.

भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी रावसाहेब दानवेंची निवड निश्चित :

  • भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदासाठी जालना मतदारसंघाचे खासदार रावसाहेब दानवे यांचे नाव निश्चित करण्यात आले.
  • यांना 30 वर्षाचा राजकीय अनुभव असून ते भाजपच्या मराठवाड्यातील महत्वाच्या नेत्यांपैकी एक आहे.

साठेबाजीविरोधी कायद्यात बदल :

  • साठेबाजीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकार साठेबाजीविरोधी कायद्यात बदल करणार असून या कायद्यातील कमकुवत तरतुदी दूर करणार आहे.
  • अन्न व नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान यांनी घोषणा केली.
  • सध्याच्या कायद्यानुसार साठेबाजीतील दोषींवर जमीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येत होता.
  • यात बदल करत अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याची तरतूद करून कायदा कडक करण्याची तरतूद करून कायदा कडक करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

‘बुर्ज खलिफा’चा विश्वविक्रम :

  • इमारतीला नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला 70.000 एलईडी बल्बची रोषणाई करण्यात आली होती.
  • ‘बुर्ज खलिफा’ही इमारत जगातील सर्वात उंच इमारत असून तिच्यावर करण्यात आलेल्या रोषणाईने विश्वविक्रम केला आहे.

“ज्ञानसंगम” बैठक पुण्यात सुरू :

  • देशाच्या वित्तीय सेवा क्षेत्राविषयीचे व्यापक विचारमंथण करण्यासाठी पुण्यातील एनआयबीएममध्ये पंतप्रधान मोदी यांनी “ज्ञानसंगम” बैठक सुरू केली आहे.
  • सार्वजनिक क्षेत्रातील बँका, विमा कंपन्या आणि वित्तीय संस्थांच्या प्रमुखांच्या उपस्थितीत सरकारी बँकांचे प्रमुख या बैठकीला हजर राहणार आहेत.
  • तसेच सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँकांचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्या आणि वित्तीय संस्थेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सहभागी होणार आहेत.
  • सर्व खात्यांचे राज्यमंत्री, मुख्य अर्थ सल्लागार , वित्त सचिव, केंद्रीय अर्थमंत्री, वित्तीय सेवा विभागाचे सचिव, रिझर्व बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन, डेपोटी गव्हर्नर हेही सहभागी होणार आहे.

 

दिनविशेष :

  • 3 जानेवारी – अ‍ॅक्युपेशन दिन
  • 3 जानेवारी – बालिका दिन
  • 1831 – सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन
  • 1950 – पुण्याच्या राष्ट्रीय रसायनिक प्रयोगशाळेचे पंडित नेहरू यांच्या हस्ते उद्घाटन
  • 2004 – नायगाव (ता. खंडाळा) येथील सावित्रीबाई फुले यांचे जन्मघर राज्य संरक्षित स्मारक राष्ट्राला अर्पण.

 

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.