Complete Guidance For MPSC Exams, Current Affairs, Rajyaseva, PSI, STI Exams, Job Alerts 2020

Current Affairs (चालू घडामोडी) of 3 December 2014 For MPSC Exams

 

अ.क्र
ठळक घडामोडी
1. वाजपेयी यांचा जन्मदिन ‘सुप्रशासन दिन’ म्हणून साजरा करणार 
2. ज्येष्ठ अभिनेते देवेन वर्मा कालवश 
3. माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांचे निधन
4. टीबी जनजागृती कार्यक्रमाचा अमिताभ होणार ब्रँन्ड ऍम्बेसेडर
5. बढत्यांनमधील आरक्षण रद्द
6. ‘अग्नी-४’ चाचणी यशस्वी

 

वाजपेयी यांचा जन्मदिन ‘सुप्रशासन दिन’ म्हणून साजरा करणार :
 • 25 डिसेंबर रोजी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्मदिन आहे, आणि तो आता ‘सुप्रशासन दिन’ म्हणून साजरा करणार आहे.
 • ही घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
 • भारतीय जनता पक्षाच्या संसदीय समितीच्या बैठकीत बोलत होते त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली.

 

ज्येष्ठ अभिनेते देवेन वर्मा कालवश :
 • प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारे ज्येष्ठ अभिनेते देवेन वर्मा यांचे मंगळवारी पहाटे पुण्यात हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले, ते 78 वर्षाचे होते.
 • अंगूर, खट्टा मीठा, चोर के घर चोर या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका चांगल्याच गाजल्या होत्या.

 

माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांचे निधन :
 • राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि कोंग्रेसचे ज्येष्ठ नेते बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले.
 • किडणीच्या विकारामुळे त्यांचे निधन झाले.

 

टीबी जनजागृती कार्यक्रमाचा अमिताभ होणार ब्रँन्ड ऍम्बेसेडर :
 • अमिताभ बच्चन टीबी जंनजागृती कार्यक्रमाचा ब्रॅंन्ड एम्बेसेडर होणार आहे.
 • पालिकेच्या जाहिराती विनामूल्य करणार.
 • शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना दिलेले वचन पाळण्यासाठी बच्चन हे एकही पैसा न घेता पालिकेसाठी काम करणार आहे.
 • याआधी पोलिओ मोहीम बच्चन यांनी राबवली आहे.

बढत्यांनमधील आरक्षण रद्द :
 • सरकारी, निमसरकारी आस्थापने व अनुसूचीत संस्थांमध्ये सर्व स्थरावरील बढत्यांनमधील आरक्षण रद्द करण्यात आले आहे.
 

‘अग्नी-४’ चाचणी यशस्वी :

 • भारताच्या अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता असलेल्या अग्नी-४ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी ओडिशा किनारपट्टीवर घेण्यात आली.
 • मारक क्षमता ४ हजार की.मी असलेल्या अग्नी-४ ची ही चौथी यशस्वी चाचणी आहे.
 • याआधी याच वर्षी २० जानेवारी रोजी त्याची चाचणी घेण्यात आली होती.
 • व्हिलन या बेटावर असलेल्या एकात्मिक चाचणी केंद्राच्या परिसर-४ मधून मंगळवारी क्षेपणास्त्राचा मोबाईल लॉचरमधून मारा करण्यात आला.
You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World