Current Affairs of 3 August 2015 For MPSC Exams

चालू घडामोडी (3 ऑगस्ट 2015)

संयुक्त संसदीय समितीला पुन्हा एकदा मुदतवाढ :

 • भूसंपादन विधेयकाच्या अभ्यासासाठी स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीला पुन्हा एकदा मुदतवाढ दिली जाण्याची शक्‍यता सूत्रांनी वर्तविली आहे.
 • सूत्रांच्या म्हणण्यानुसार, समिती विधेयकातील 15 दुरुस्त्यांवर सदस्यांचा दृष्टिकोन समजावून घेणार असून, त्यानंतर प्रत्येक कलमाच्या आधारे चर्चा केली जाईल.
 • आपला अहवाल सादर करण्यासाठी समितीला 5 ऑगस्ट ही तारीख देण्यात आली होती.
 • त्यामुळे समितीकडून अहवाल सादर करण्यासाठी आणखी आठवडाभराची मुदत मागितली जाईल.
 • 21 जुलैपासून सुरू झालेले संसदेचे पावसाळी अधिवेशन 13 ऑगस्ट रोजी संपणार आहे.
 • तसेच समितीने आतापर्यंत दोन वेळा मुदतवाढ मागितली आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (1 ऑगस्ट 2015)

“गुगल प्ले”वर लवकरच सशुल्क ऍप्स उपलब्ध :

 • लोकप्रिय सर्च इंजिन “गुगल”ने आपल्या “ऍप स्टोअर” आणि “गुगल प्ले”वर लवकरच सशुल्क ऍप्स उपलब्ध करून देणार आहे.
 • भारतातील सशुल्क ऍप्सची बाजारपेठ वाढावी यासाठी ही सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
 • तसेच या सशुल्क ऍप्स 10 रुपयांपासून उपलब्ध असतील.
 • “गुगल प्ले”द्वारे नवीन युजर्सपर्यंत पोचण्यासाठी भारत चांगली बाजारपेठ असल्याचे मानले जाते.

शास्त्रज्ञांना एक सिक्रेट ग्रहमाला आढळली :

 • पृथ्वीपासून फक्त 21 प्रकाशवर्षे अंतरावर खगोल शास्त्रज्ञांना एक सिक्रेट ग्रहमाला आढळली असून, त्यात एक महाकाय ग्रह व तीन सुपर अर्थ आहेत.
 • एचडी 219134 असे या ग्रहमालेच्या ताऱ्याचे नाव असून ग्रहमाला कॅसियोपिया या नक्षत्र समूहात आहे.
 • तसेच या तीन सुपर अर्थपैकी एक ग्रह त्यांच्या सूर्यासमोरून जातो.
 • सूर्यासमोरून जाणाऱ्या या सुपरअर्थची घनता पृथ्वीसारखीच आहे.
 • हा ग्रह आतापर्यंत आढळलेल्या पृथ्वीसारख्या ग्रहापैकी सर्वात जवळ आहे.

एक रुपया बाजारमूल्याच्या नोटा दरवर्षी छापण्याचे केंद्र सरकारने ठरवले :

 • एक रुपया बाजारमूल्याच्या 15 कोटी नोटा दरवर्षी छापण्याचे केंद्र सरकारने ठरवले आहे.
 • 1 जानेवारी 2015 पासून दरवर्षी या नोटा छापल्या जातील.}
 • 1 जानेवारीपासून दरवर्षी 1 रुपया बाजारमूल्याच्या नोटा छापण्याविषयी 15 डिसेंबर 2014 रोजी राजपत्र (गॅझेट) अधिसूचना जारी करण्यात आली होती.
 • तसेच या नोटा कॉइनेज अॅक्टमधील तरतुदींनुसार छापण्यात येतील.
 • नोटा छपाईचा खर्च वाढत असल्याचे कारण देऊन 1, 2 व 5  रुपये बाजारमूल्याच्या नोटा छापणे शक्य नसल्याचे रिझर्व्ह बँकेने यापूर्वी स्पष्ट केले होते.
 • त्यामुळे या नोटा सरकारने छापण्याचे ठरवले आहे. मात्र अद्याप 2 व 5 रुपये बाजारमूल्याच्या नोटा छापण्याविषयी कोणताही निर्णय झालेला नाही.

दिनविशेष :

 • विषुववृत्तीय गिनी सेना दिन
 • 3 ऑगस्ट 1960नायजर स्वातंत्र्य दिन
 • 2005मॉरिटानियाच्या राष्ट्राध्यक्षाविरुद्ध उठाव.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.