Current Affairs of 29 November 2016 For MPSC Exams
चालू घडामोडी (29 नोव्हेंबर 2016)
नववर्षात राज्यात 30 हजार बॅंकिंग सेवा सुरू होणार :
- राज्यातील 30 हजार तर नाशिक जिल्ह्यात 960 गावांत “आपले सरकार” नावाने केंद्रातून डिजिटल बॅंकिंगची सुविधा देण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम नवीन वर्षात सुरू होणार आहे.
- मुख्य सचिवांनी राज्यातील कॅशलेस बॅंकिंग कामकाजासाठी 28 नोव्हेंबर रोजी घेतलेल्या बैठकीत प्रत्येक गावात पूर्वीच्या संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र अर्थात ‘संग्राम’ केंद्रात “आपले सरकार” उपक्रम सुरू करण्याचा आदेश दिला.
- नाशिक जिल्ह्यात 950 गावांतील ग्रामपंचायतीत नववर्षात ही केंद्रे कार्यान्वित होतील असे नियोजन असल्याचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी सांगितले.
- पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांवरील बंदीनंतर आता “कॅशलेस” अर्थव्यवस्थेकडे वाटचाल सुरू झाली आहे.
- राज्यातील प्रत्येक गावात डिजिटल बॅंकिंग सुरू करण्याच्या दिशेने ही केंद्रे कार्यान्वित केली जाणार आहेत.
- राज्यात 2011 ते 2015 या काळात संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र अर्थात ‘संग्राम’ हा कार्यक्रम राबविण्यात आला होता. त्यानंतर पुढचे पाऊल म्हणून हा कार्यक्रम राबविला जात आहे.
- ग्रामविकास विभाग, माहिती तंत्रज्ञान संचालनालय आणि सीएससी-एसपीव्ही-ई गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड या केंद्र सरकार पुरस्कृत उपक्रमातून हा प्रकल्प कार्यरत आहे.
Must Read (नक्की वाचा):
मलेशियाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताला सिल्वरपदक :
- मलेशिया येथील तीसाव्या आंतरराष्ट्रीय खुल्या चॅम्पियनशिप स्पर्धेत आठशे व पंधराशे मीटर धावण्याच्या शर्यतीत नाशिकच्या पोलीस कर्मचा-याने दोन रजत (सिल्वर) पदक पटकाविले आहे.
- नाशिक येथील परिमंडळ दोन मधील अंबड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार व धावपटू नंदू उगले यांनी आठशे व पंधराशे मीटरच्या शर्यतीत रजत पदक तर पाच हजार मीटरच्या शर्यतीत कांस्य पदक पटकाविल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक मधुकर कड यांनी दिली आहे.
अर्जेंटिना प्रथमच डेव्हिस कप विजेता :
- अर्जेंटिनाने संघर्षपूर्ण लढतीत 27 नोव्हेंबर रोजी माजी चॅम्पियन क्रोएशियाचा 3-2 ने पराभव करून प्रथमच डेव्हिस कप टेनिस स्पर्धेत जेतेपद पटकावले.
- फेररिको डेलबोनिस अर्जेंटिनाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने अखेरच्या व एकेरीच्या निर्णायक लढतीत अनुभवी इव्हो कार्लोविचचा 6-3, 6-4, 6-2 ने पराभव करून संघाला ऐतिहासिक जेतेपद पटकावून दिले.
- तसेच अर्जेंटिनाने पाच वेळा डेव्हिस कप स्पर्धेत अंतिम फेरी गाठली; पण प्रथमच जेतेपद पटकावले.
- क्रोएशियाने 2005 मध्ये जेतेपद पटकावले होते.
- डेव्हिस कप स्पर्धेच्या इतिहासात जेतेपद पटकावणारा अर्जेंटिना 15 वा देश ठरला आहे.
क्रिकेट कॅलेंडर वर्षात सर्वाधिक बळींचा नवा विक्रम :
- इंग्लंडचा यष्टिरक्षक जॉनी बेयरेस्टोने 28 नोव्हेंबर रोजी उमेश यादवचा झेल टिपताना एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक बळी घेण्याचा नवा विक्रम नोंदवला. बेयरेस्टोचा यंदाचा वर्षातील यष्टिपाठी हा 68 वा बळी होता.
- तसेच त्याने ऑस्ट्रेलियाचा इयान हिली व दक्षिण आफ्रिकेचा मार्क बाऊचर यांचा 67 बळींचा विक्रम मोडला.
- हिलीने 1993 मध्ये वेस्ट इंडीजच्या जेफ ड्युजोनने 1984 मध्ये नोंदवलेला 55 बळींचा विक्रम मोडला होता. बाऊचरने 1998 मध्ये हिलीच्या विक्रमाची बरोबरी साधली.
- बेयरेस्टोचा यंदाच्या वर्षातील 15 वा कसोटी सामना आहे. त्याने आतापर्यंत 65 झेल टिपले असून, 3 फलंदाजांना यष्टिचीत केले आहे. त्याने एका वर्षात सर्वाधिक झेल टिपण्याच्या बाऊचरच्या विक्रमाची बरोबरी साधली.
दिनविशेष :
- 29 नोव्हेंबर 1939 हा मराठी भाषेतील कवी, रविकिरण मंडळाचे संस्थापक, माधव ज्युलियन यांचे स्मृतीदिन आहे.
- 29 नोव्हेंबर 1959 हा मराठी इतिहासकार गोविंद सखाराम सरदेसाई यांचे स्मृतीदिन आहे.
- भारतीय उद्योजक जे.आर. डी टाटा यांचे 29 नोव्हेंबर 1993 हे स्मृतीदिन आहे.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा