Current Affairs of 29 June 2018 For MPSC Exams

चालू घडामोडी (29 जून 2018)

चालू घडामोडी (29 जून 2018)

पर्यावरणपूरक इंधनाने प्रदूषण रोखता येईल :

 • राज्यातील सार्वजनिक वाहतुकीसाठी पर्यावरणपूरक इंधन (क्‍लीन फ्युएल) वापरले जाईल. यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण रोखता येणार आहे. विकासासह पर्यावरण संवर्धनही शक्‍य होणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस रेग्युलेटरी बोर्डाच्या 9 व्या सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन बिडिंग राउंड निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.Devendra Fadnavis
 • मुख्यमंत्री म्हणाले, की आज होणाऱ्या बिडिंग राउंड्‌सचा फायदा राज्याला मिळणार आहे. आतापर्यंत राज्यात सहा शहरांत सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन केंद्र उपलब्ध होते, आता नऊ शहरांत ही केंद्रे आल्यानंतर राज्यात एकूण 15 जिल्ह्यांत नॅचरल गॅस उपलब्ध होणार आहे. याचा लाभ 56 लाख घरांना आणि सुमारे दोन कोटीपेक्षा जास्त लोकांना होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे क्‍लीन एनर्जीचे स्वप्न पूर्ण करण्यास यामुळे हातभार लागणार आहे.
 • समृद्धी महामार्गालगत गॅस पाइप लाइन टाकण्याच्या केंद्र सरकारच्या प्रस्तावामुळे या प्रकल्पाचे महत्त्व अधिक अधोरेखित होणार आहे. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्याचेही काम पूर्ण झाले असून स्टील हब, कोल्ड चेन यांसारखे प्रकल्प उभे राहत आहेत.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (28 जून 2018)

स्विस बॅंकेत भारतीयांचे सात हजार कोटी :

 • मोदी सरकारच्या काळा पैसा रोखण्याच्या प्रयत्नांना धक्का देणारा स्विस बॅंकेचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. भारतीयांच्या खात्यातील पैसा 2017 या वर्षात 50.2 टक्‍क्‍यांनी वाढला आहे. 2017 मध्ये भारतीयांनी आपल्या खात्यात एकूण 7 हजार कोटी रुपये जमा केले आहेत.
 • सलग तीन वर्षांच्या घसरणीनंतर रकमेत वाढ झाली आहे. त्याचवेळी 2017 मध्ये पाकिस्तानी खातेदारांकडून जमा होणाऱ्या रक्कमेत 21 टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. असे असले तरी या वर्षी 7700 कोटी रुपये जमा झाले असून, ते भारतीय खातेदारांपेक्षा अधिक आहेत.
 • 2016 च्या तुलनेत या वर्षी स्विस बॅंकेत जमा झालेल्या एकूण रकमेत 3 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. ही रक्कम तब्बल 100 लाख कोटी आहे. 2017 मध्ये भारतीयांच्या खात्यातील पैसा एक अब्ज स्विस फ्रॅंक म्हणजेच तब्बल 7 हजार कोटींपर्यंत पोचला आहे. एकीकडे नरेंद्र मोदी सरकार काळ्या पैशांविरुद्ध मोहीम राबवत असताना स्विस बॅंकेतील भारतीयांच्या खात्यातील वाढलेली रक्कम खळबळ उडवणारी आहे.

भारतापेक्षा चीन रशियाचा जवळचा मित्र :

 • एकेकाळी भारताचा सर्वात जवळचा मित्र रशिया होता. पण मागच्या काहीवर्षात भारत-अमेरिका मैत्री दृढ झाल्यामुळे भारत-रशिया संबंधात काहीसा दुरावा निर्माण झाला.
 • भारत-रशियासंबंध आज पूर्वीसारखे नसले तरी आजही भारत रशियाच्याजवळच्या मित्रांपैकी एक आहे. रशियाच्या जवळच्या पाच मित्र देशांमध्ये भारताचा समावेश होतो. मॉस्कोमधील एका थिंक टँकने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे.Modi-Putin
 • रशियाची पाकिस्तानबरोबर जवळीक वाढत चालली असली तरी अजूनही रशियाला पाकिस्तानबद्दल तितका विश्वास वाटत नसल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. रशियातील एकमेव बिगर सरकारी संस्था लवादा सेंटरने हे सर्वेक्षण केले आहे. 2017 साली केलेल्या सर्वेक्षण चाचणीचा अहवाल आता 2018 मध्ये समोर आला आहे.
 • रशियन नागरिक बेलारुसला आपला सर्वात जवळचा मित्र मानतात. त्यानंतर चीन, कझाकिस्तान, सीरिया आणि भारताचा नंबर लागतो. भारत रशियाच्या जवळचा मित्रांपैकी एक असला तरी चीन रशियाच्या अधिक जवळ आहे.
 • रशियन नागरिकांना चीनबद्दल भारतापेक्षा जास्त आपुलकी, विश्वास वाटतो. काही आठवडयांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यामध्ये एक अनौपचारिक परिषद झाली. या बैठकीमुळे पुन्हा एकदा दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ होण्यास मदत मिळेल.

गोवा टुरिझमतर्फे घेता येणार राफ्टींगचा आनंद :

 • गोवा म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येतात ते मोठेच्या मोठे समुद्रकिनारे आणि त्याच्या बाजूनी असणारी उंचच्या उंच नारळाची झाडे. दैनंदिन जीवनातून थोडासा आराम मिळावा यासाठी दरवर्षी गोव्याला जाणारे अनेक जण आहेत. याठिकाणी समुद्रकिनाऱ्यावर वेगवेगळ्या साहसी खेळांचा आनंदही अनेकांनी घेतला असेल.
 • तसेच त्यात आता आणखी एक भर पडणार असून गोवा टुरिझमतर्फे म्हादेई नदीत राफ्टिंग करण्याचा चित्तथरारक अनुभव पर्यटकांना घेता येणार आहे. येत्या 28 जूनपासून ही सुविधा सुरु होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. White-Water-Rafting
 • ऐन पावसाळ्याच्या दिवसांत या उपक्रमाची सुरुवात करण्यात येत असल्याने पर्यटकांसाठी ही नक्कीच आनंदाची बाब आहे. गोव्यातील खळाळत्या म्हादेई नदीत किनाऱ्यावर वसलेल्या वन्यजीवन अभयारण्याच्या साक्षीने लाटांवर स्वार होण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे. हा अनुभव पर्यटकांना सप्टेंबर महिन्यापर्यंत घेता येईल.
 • दर दिवशी राफ्टिंगच्या दोन बॅच असतील, सकाळी 9.30 वाजता आणि दुपारी 2.30 वाजता पर्यटकांना याचा आनं घेता येणार आहे. या अनोख्या सहलीमध्ये 2.5 ते 3.5 तासांत 10 किलोमीटरचे अंतर पार केले जाणार असून त्यादरम्यान पर्यटकांना लाटांच्या वेगाबरोबर पुढे जात निसर्गरम्य लँडस्केप्सचा अनुभव घेता येणार आहे.

उच्च शिक्षणातील सुधारणांसाठी योग्य पाऊल :

 • विद्यापीठ अनुदान आयोगाची (यूजीसी) कार्यकक्षा आणि कार्यपद्धतीमध्ये काळानुसार बदल करणे गरजचे होते. त्यामुळे उच्च शिक्षण आयोग नेमण्यासंदर्भात केंद्र सरकारने घेतलेला निर्णय अत्यंत योग्य असल्याचे मत ‘यूजीसी’चे माजी अध्यक्ष सुखदेव थोरात यांनी मांडले.
 • उच्च शिक्षण क्षेत्रात अनेक बदल होत असल्यामुळे गेली दहा वर्षे यूजीसीत सुधारणा करण्याची चर्चा सुरू होती. यासंदर्भात काँग्रस सरकारने नेमलेल्या यशपाल समितीने ‘उच्च शिक्षण आणि संशोधन आयोग‘ स्थापण्याची शिफारस केली होती. त्याअंतर्गत, उच्च शिक्षण क्षेत्रातील विविध शाखांचे व्यवस्थापन आणि नियमन करणाऱ्या वेगवेगळ्या 15 कौन्सिल (एआयसीटीई, मेडिकल कौन्सिल, शेती संशोधन वगैरे) एकत्रित आणण्याची सूचना यशपाल समितीने केली होती.
 • उच्च शिक्षणाला असलेले महत्त्व लक्षात घेऊन वेगवेगळ्या कौन्सिल असणे योग्य ठरणार नाही. समन्वयात अडचणी येतात, हे त्यामागचे प्रमुख कारण होते. त्यादृष्टीने पडलेले हे पुढचे पाऊल असल्याचे थोरात यांनी सांगितले.

दिनविशेष :

 • सन 1870 मध्ये ब्रिटिश पार्लमेंटने कामगार संघटनांना परवानगी देणारा कायदा केला.
 • मराठी नाटककार, विनोदकार श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचा जन्म 29 जून 1871 मध्ये झाला.
 • ज्येष्ठशास्त्रज्ञ कृष्ण दामोदर अभ्यंकर यांना सन 2001 या वर्षी एम.पी. बिर्ला पुरस्कार जाहीर.
 • पं.हृदयनाथ मंगेशकर यांना सन 2001 या वर्षी नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार जाहीर.
 • सन 2007 मध्ये ऍपल ने आपला पहिला मोबाईल फोन, आयफोन प्रकाशित केला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (30 जून 2018)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.