Current Affairs (चालू घडामोडी) of 29 January 2015 For MPSC Exams

 

अ.क्र
ठळक घडामोडी
1. नीती आयोगाची बैठक फेब्रुवारीत
2. दिनकर रायकर यांना जीवनगौरव पुरस्कार
3. फौजदारपदाच्या परीक्षेत वयात सवलत
4. जयशंकर नवे विदेशी सचिव 
5. दिनविशेष 

 

 

 

 

 

 

नीती आयोगाची बैठक फेब्रुवारीत :

 • नीती आयोगाची पहिली बैठक 6 फेब्रुवारीला होणार आहे.
 • ह्या बैठकीचे संबोधन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहे.
 • पंतप्राधानांकडून भविष्यातील धोरणाविषयी निश्चित मार्गदर्शन केले जाणार आहे.

दिनकर रायकर यांना जीवनगौरव पुरस्कार :

 • राज्य शासनाचा लोकमान्य टिळक जीवन गौरव पत्रकारिता पुरस्कार लोकमत समूह संपादक श्री. दिनकर केशव रायकर यांना जाहीर झाला.
 • पुरस्काराची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
 • तसेच ज्येष्ठ पत्रकार श्री. लक्ष्मण त्र्यंबकराव जोशी आणि श्री. विजय विश्वनाथ कुवळेकर यांनाही पुरस्कार देण्यात येणार आहेत.
 • 4 फेब्रुवारी यशवंतराव चव्हाण सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.

फौजदारपदाच्या परीक्षेत वयात सवलत :

 • ‘ओबीसी’ व माजी सैनिक या दोन्ही प्रवर्गातील उमेदवार पोलिस उमेदवाराची पदे बढतीने भरण्यासाठी घेण्यात येणार्‍या खात्यांतर्गत परीक्षेत कमाल वयोमर्यादेत एकूण 10 वर्षाची सवलत मिळण्यास पत्र ठरतो असा निकाल महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने दिला आहे.
 • ओबीसी‘ व माजी सैनिक या दोन्ही प्रवर्गातील उमेदवार परीक्षा देण्यासाठी वयाची 45 वर्ष पूर्ण होईपर्यंत पात्र ठरतो.

जयशंकर नवे विदेशी सचिव :

 • विदेशी सचिव म्हणून अमेरिकेतील भारताचे राजदूत एस. जयशंकर यांची नियुक्ती करण्यात आली.
 • पहिले विदेशी सचिव सुजात सिंग हे होते.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली जयशंकर यांची नियुक्ती करण्यात आली.

दिनविशेष :

 • 1955 – भारतीय कामगार किसान पक्षाची स्थापना.
 • 1870 – भारतातील पहिले वृत्तपत्र हिक्लेचे बेंगाल गॅझेट प्रसिद्ध.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.