Current Affairs of 29 February 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (29 फेब्रुवारी 2016)

चालू घडामोडी (29 फेब्रुवारी 2016)

मॅरेथॉनमध्ये महाराष्ट्रच्या रोहणी राऊत हे प्रथम :

 • महाराष्ट्राच्या रोहिणीमोनिका राऊत भगिनींनी (दि.28) झालेल्या दिल्ली पूर्ण मॅरेथॉनमध्ये अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक जिंकून निर्विवाद वर्चस्व राखले.
 • तसेच पुरुष गटात पश्चिम रेल्वेच्या संतोष कुमारने विजेतेपद जिंकले.
 • महिलांच्या पूर्ण मॅरेथॉनमध्ये महाराष्ट्रच्या राऊत भगिनींनी कमाल दाखवली.
 • रोहिणी राऊत हिने दोन तास 50 मिनिटे 45 सेकंदांत मॅरेथॉन पूर्ण करून विजेतेपद जिंकले.
 • मोनिकाने दोन तास 55 मिनिटे48 सेकंदांची वेळ नोंदवत दुसरे स्थान मिळवले.
 • ज्योती गवतेला (2 तास 57 मि. 16 सेकंद) तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले.
 • पुरुषांच्या गटात संतोष याने दोन तास 20 मिनिट 51 सेकंदांची वेळ नोंदवली.
 • सैन्यदलाच्या सुजित लुवांग याने दोन सात 21 मिनिट पाच सेकंदांत ही स्पर्धा पूर्ण केली.
 • सैन्यदलाच्याच राहुल पाल याने दोन तास 21 मिनिटे 46 सेकंदांची वेळ नोंदवत तिसरे स्थान मिळवले.
 • हाफ मॅरेथॉनमध्ये पुरुषांच्या गटात राकेश कुमार याने एक तास आठ मिनिट 22 सेकंदांची वेळ नोंदवत पहिले स्थान पटकावले.
 • सत्येंद्र सिंह याने दुसरे आणि प्रदीप सिंह याने तिसरे स्थान पटकावले.
 • महिलांमध्ये किरण सहदेव हिने एक तास 19 मिनिटे 54 सेकंदांची वेळ नोंदवत हाफ मॅरेथॉनचे विजेतेपद पटकावले, तर मंजू यादव आणि मोनिका चौधरी या अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या.

88 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला सुरूवात :

 • हॉलिवूडमधील अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या 88 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला सुरूवात झाली आहे.
 • तसेच यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात द रेव्हनंट या चित्रपटाला सर्वाधिक 12 नामांकने देण्यात आली आहेत.
 • तर, मॅड मॅक्स फ्युरी रोड, स्पॉट लाईट आदी चित्रपटही स्पर्धेत आहेत, या पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.
 • ख्रिस रॉक हे ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन करत आहेत.
 • पुरस्कारांची यादी

 • सर्वोत्कृष्ट पटकथा – स्पॉट लाईट (जॉश सिंगर आणि टॉम मॅकार्थी)
 • सर्वोत्कृष्ट आधारित पटकथा – द बिग शॉर्ट (चार्ल्स रॅन्डॉल्फ आणि अॅडम मॅके)
 • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – अलिशिया विकॅन्डर (डॅनिश गर्ल)
 • सर्वोत्कृष्ट वेशभूषा – जेनी बिव्हन (मॅड मॅक्स फ्युरी रोड)
 • सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईन – कॉलिन गिब्सन, लिसा थॉम्प्सन (मॅड मॅक्स फ्युरी रोड)
 • सर्वोत्कृष्ट छायाचित्रण – एमॅन्यूएल लुबेस्की (द रेव्हनंट)
 • सर्वोत्कृष्ट ध्वनी संकलन – मॅड मॅक्स फ्युरी रोड
 • सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईन – कॉलिन गिब्सन, लिसा थॉम्प्सन (मॅड मॅक्स फ्युरी रोड)
 • सर्वोत्कृष्ट व्हिज्यूएल इफेक्ट्स – एक्स माचिना
 • सर्वोत्कृष्ट ऍनिमेटेड लघुकथा – गॅब्रियल ओसोरियो व पॅटो एस्काला (बिअर स्टोरी)
 • सर्वोत्कृष्ट ऍनिमेटेड चित्रपट – इनसाईड आऊट
 • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – मार्क रायलान्स (ब्रिज ऑफ स्पायसेस)
 • सर्वोत्कृष्ट माहितीपट – असिफ कपाडीया, जेम्स गे-रीस (ऍमी)

बॅंकांसाठी ‘बॅंक बोर्ड ब्यूरो’ स्थापन :

 • कर्ज बुडव्यांमुळे अडचणीत आलेल्या बॅंकांना सावरण्याबाबत तसेच बॅंकांमधील उच्चपदस्थांच्या नियुक्तीबाबत सरकारला सल्ला देण्यासाठी मोदी सरकारने ‘बॅंक बोर्ड ब्यूरो’ची स्थापना केली असून माजी महालेखा नियंत्रक (कॅग) विनोद राय हे या ब्यूरोचे अध्यक्ष आहे.
 • सरकारी बॅंकांमध्ये बुडीत कर्जाचे प्रमाण सुमारे सव्वालाख कोटी रुपयांपर्यंत पोचल्याने एकच खळबळ उडाली होती; तर सरकारने मंदीमुळे बॅंकांवर आर्थिक ताण आल्याचे मान्य करताना यावर उपाययोजना करण्याची ग्वाही दिली होती.
 • तसेच या उपाययोजनांचा भाग म्हणून बॅंक बोर्ड ब्यूरोकडे पाहिले जात आहे.
 • सरकारच्या दाव्यांनुसार, गेल्या दीड वर्षापासून बॅंकांवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेच्या मदतीने प्रयत्न सुरू असून त्यासाठी तीन प्रमुख क्षेत्रे निश्‍चित करण्यात आली आहेत.
 • पायाभूत तसेच उद्योगांना पूरक असलेल्या सिमेंट, पोलाद, वस्त्रोद्योग, साखर, रस्तेनिर्मिती यांसारख्या क्षेत्रांमध्ये सुधारणांना प्राधान्य दिले आहे.
 • त्याचप्रमाणे, कर्ज चुकवू न शकणाऱ्या आजारी कंपन्या, उद्योगांना हेरून वस्तुस्थिती जाणून घेणे आणि कर्जाची वसुली करणे यासाठी बॅंकांच्या सहकार्याने ‘जॉइंट लेंडर फोरम’ स्थापण्यात आला आहे.
 • तसेच थकीत कर्जाबाबत कर्जाची पुनर्रचना करण्यापासून ते संबंधित उद्योगाचे प्रवर्तक बदलण्यापर्यंतचे अधिकारही बॅंकाना देण्यात येणार आहे.

भारतीय टेक्‍नोक्रॅट्‌सच्या व्दारे एक विशेष संकेतस्थळ विकसित :

 • फेसबुकच्या भारतातील वर्चस्वाला आव्हान देणारी एक नवी सोशल नेटवर्किंग साइट (दि.28) सुरू करण्यात आली.
 • बिहारचे अर्थमंत्री जगन्नाथ मिश्र यांचा मुलगा मनीष मिश्र यांच्या नेतृत्वाखाली भारतीय टेक्‍नोक्रॅट्‌सच्या एका पथकाने हे संकेतस्थळ विकसित केले आहे.
 • डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट ट्रूइंडियन डॉट को डॉट इन (www.trueindian.co.in) असे या संकेतस्थळाचे नाव आहे.
 • तसेच हे संकेतस्थळ पूर्णपणे देशी बनावटीचे असून, भारतीय समाजाच्या बहुसंख्यांचे, समता आणि न्यायाचे प्रतिनिधित्व करते.
 • ही भारतीय सोशल मीडिया साईट एक विना नफा सार्वजनिक न्यास म्हणून तसेच फेसबुकला ईस्ट इंडिया कंपनीप्रमाणे समजणाऱ्या मित्रांच्या आयुष्यासाठी सुरू करण्यात आली आहे.
 • सुरवातीला साइटची बीटा आवृत्ती सुरू करण्यात येणार असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
 • ज्या पद्धतीने ऑर्कुटचे वर्चस्व मोडून काढले, त्याच पद्धतीने येत्या पाच वर्षांत भारताला फेसबुकमुक्त करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.
 • ईस्ट इंडिया कंपनीने 19व्या शतकात ज्या पद्धतीने भारतीयांचे शोषण केले, त्याच पद्धतीचे काम फेसबुक आज करत आहे, असे कंपनीने त्यांच्या निवेदनात म्हटले आहे.

40 कंपन्यांवर सेबी करणार कारवाई :

 • बेकायदेशीर मार्गांनी पैसा गोळा करणाऱ्या योजनांविरुद्ध सेबीने (सिक्युरिटीज अ‍ॅण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया) या वर्षी कठोर कारवाई करून आतापर्यंत 40 पेक्षा जास्त कंपन्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
 • तसेच या कंपन्यांनी लोकांकडून जवळपास 1,500 कोटी रुपये गोळा केले आहेत.
 • पैसा गोळा करण्यासाठी या कंपन्यांना आपल्या रोख्यांना सूचिबद्ध करावे लागते.
 • कारण प्रत्येक कंपनीला 50 पेक्षा जास्त लोकांना भाग (शेअर) द्यावे लागतात.
 • त्यांना इतर गोष्टींबरोबरच मसुदाही सादर करावा लागतो; परंतु या कंपन्यांनी यातील काहीच केले नाही, असे सेबीने म्हटले.
 • काही कंपन्यांनी नोंदणी नसलेल्या सामूहिक गुंतवणूक योजनांच्या माध्यमातून पैसे गोळा केले.
 • सेबीकडील माहितीनुसार 2016 च्या प्रारंभापासून आतापर्यंत 43 कंपन्यांविरोधात कारवाई करण्यात आली आहे, या कंपन्यांनी 5.2 लाखांपेक्षा जास्त गुंतवणूकदारांकडून 1,479 कोटी रुपये गोळा केले.

साऊथ कॅरोलिनात हिलरी यांचा विजय :

 • साऊथ कॅरोलिनात डेमोक्रॅटिकच्या प्रायमरीत हिलरी क्लिंटन यांनी बर्नी सँडर्स यांच्यावर मात करीत विजय मिळविला.
 • तसेच यानिमित्ताने अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी हिलरी यांनी उमेदवारीवर दावा पक्का केला आहे.
 • साऊथ कॅरोलिनात प्रायमरीत हिलरी यांना 73.5, तर सँडर्स यांना 23 टक्के मते मिळाली.
 • न्यू हॅम्पशायरच्या प्रायमरीत सँडर्सने हिलरी यांना पराभूत केले होते, तर आयोवात हिलरी यांना निसटता विजय मिळाला होता.
 • तसेच या प्रायमरींच्या तुलनेत हिलरी यांचा हा मोठा विजय आहे.

आशियातील टॉप टेनमध्ये 3 भारतीय सागरकिनारे :

 • ट्रिप ऍडव्हाईजर या पर्यटन व्यवसायामधील प्रसिद्ध कंपनीने जगभरातील पर्यटकांची पसंती असलेल्या आशिया खंडामधील पहिल्या 10 समुद्र किनाऱ्यांच्या तयार केलेल्या यादीमध्ये भारतामधील तीन समुद्र किनाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
 • अगोंदा व पलोलेम (दोन्ही किनारे गोव्यामधील) आणि अंदमान द्वीपसमुहामधील हवेलॉक बेटांवरील राधानगर समुद्रकिनाऱ्याचा या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
 • ‘भारतास विस्तृत व सुंदर समुद्रकिनारा लाभला आहे. तेव्हा भारतामधील सागर किनाऱ्यांना जागतिक पातळीवर मान्यता मिळणे, ही निश्‍चितच अत्यंत आनंदाची बाब आहे,’ असे या कंपनीचे भारत विभाग व्यवस्थापक निखिल गांजु यांनी या पार्श्‍वभूमीवर बोलताना सांगितले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (1 मार्च 2016)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.