Current Affairs of 28 November 2017 For MPSC Exams
चालू घडामोडी (28 नोव्हेंबर 2017)
जागतिक उद्योजकता शिखर परिषद 2017 :
- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इव्हांका ट्रम्प भारत दौ-यावर आल्या आहेत. इव्हांका ट्रम्प 28 नोव्हेंबर रोजी पहाटे जवळपास 5 वाजण्याच्या सुमारास हैदराबाद येथे दाखल झाल्या आहेत.
- तीन दिवसांच्या जागतिक उद्योजकता शिखर परिषदेत (जीईएस) इव्हांका ट्रम्प सहभागी होणार आहेत. या परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कन्या इव्हांका ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ परिषदेसाठी भारतात दाखल झाले आहे.
- 36 वर्षीय इव्हांका या डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागारही आहेत. ट्रम्प प्रशासनातील अधिकारी आणि उद्योजकांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व त्या करणार आहेत. अमेरिकेच्या 38 राज्यांतील 350 प्रतिनिधी या शिष्टमंडळात आहेत.
- भारत-अमेरिका यांच्यातर्फे होणा-या या परिषदेसाठी हैदराबादचे सुशोभीकरण केले आहे. शिखर परिषदेत ऊर्जा व पायाभूत सेवा, आरोग्य व जीवन विज्ञान, वित्तीय तंत्रज्ञान व डिजिटल अर्थव्यवस्था, माध्यम व मनोरंजन यांवर भर दिला जाणार आहे.
- जगभरातील उद्योजक, नवोन्मेषी कल्पक उद्योजक, गुंतवणुकदार यांना एकत्र आणणारे व्यासपीठ म्हणजेच जागतिक उद्योजकता शिखर परिषद 2017 (जीईएस) हैदराबाद येथे 28 ते 30 नोव्हेंबर या तीन दिवसात होणार आहे.
- तसेच यावर्षी महिला उद्योजक आणि महिला उद्योजकांमध्ये असणारी शक्ती यावर परिषद विचारमंथन करण्यात येणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या व सल्लागार इवान्का ट्रम्प अमेरिकेच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करत आहेत.
Must Read (नक्की वाचा):
गायीला राष्ट्रीय पशू घोषित करा; धर्म संसदेची मागणी :
- गायीला राष्ट्रीय पशूचा दर्जा देण्याची मागणी कर्नाटकमधील धर्म संसदेत करण्यात आली. याबद्दलचा ठरावदेखील धर्म संसदेसमोर मांडण्यात आला.
- गायीचे संरक्षण करणे आवश्यक असून तो हिंदूंचा कायदेशीर अधिकार आहे, असे धर्मसंसदेचे आयोजक असलेल्या विश्व हिंदू परिषदेकडून सांगण्यात आले.
- गायीच्या संरक्षणासाठी तिला राष्ट्रीय पशूचा दर्जा देणे गरजेचे असल्याचे विश्व हिंदू परिषदेच्या प्रवक्त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले.
- विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय सहसचिव सुरेंद्र कुमार जैन यांनी गोरक्षकांवर होणाऱ्या हल्ल्यांबद्दल चिंता व्यक्त केली.
- ‘गायींची तस्करी करणाऱ्या, गोमांसाची अवैध वाहतूक करणाऱ्यांकडून गोरक्षकांना लक्ष्य केले जाते. त्यामुळेच गायीच्या संरक्षणासाठी तिला राष्ट्रीय पशूचा दर्जा देण्याची गरज आहे,’ असे जैन यांनी म्हटले.
- तसेच गोहत्या आणि गोमांस सेवन करणाऱ्यांवरील हल्ल्यांच्या माध्यमातून गोरक्षकांना बदनाम केले जात असल्याचेही ते म्हणाले.
जीएसटीतून मिळणाऱ्या उत्पन्नात घट :
- वस्तू आणि सेवा करातून मिळणाऱ्या महसूलात जवळपास 10 टक्क्यांनी घट झाली आहे. सप्टेंबरमध्ये सरकारला जीएसटीमधून 92 हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. मात्र ऑक्टोबरमध्ये सरकारला 83 हजार 346 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
- जुलै महिन्यापासून जीएसटी लागू झाल्यानंतर सरकारला पहिल्या तीन महिन्यांमध्ये 90 हजार कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळाला होता. मात्र ऑक्टोबरमध्ये पहिल्यांदाच सरकारच्या महसुली उत्पन्नात घट झाली आहे.
- व्यापारी आणि दुकानदार स्वत:हून जाहीर केलेल्या उत्पन्नावर करभरणा करत असल्याने जीएसटी घटल्याचे अर्थ मंत्रालयाने सांगितले. यासोबतच करांमध्ये कपात करण्यात आल्याचा परिणामही जीएसटीवर झाल्याचे अर्थ मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
- तसेच सुरुवातीच्या तीन महिन्यांमध्ये एकीकृत जीएसटी लागू होत असल्यानेही सरकारला जास्त उत्पन्न मिळाले होते. या तीन महिन्यांमध्ये राज्य आणि केंद्राचा जीएसटी एकत्रितपणे लागू होत होता.
विलीनीकरण झालेल्या बॅंकांचे चेकबुक अमान्य :
- स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये (एसबीआय) एप्रिल 2017 मध्ये सहा सहयोगी बॅंकांचे विलीनीकरण झाले होते. त्यामुळे स्टेट बॅंकेशी सहयोगी बॅंकेसहित सहा बॅंकांचे चेकबुक डिसेंबरनंतर अमान्य होणार आहे.
- याव्दारे कोणताही खातेधारक आपल्या खात्यामधून पैसे काढू शकणार नाही. सुरवातीला सप्टेंबरमध्ये ही व्यवस्था लागू केली जाणार होती. मात्र, रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने नुकतीच याची मुदत वाढवल्याचे समजते आहे.
- प्राप्त माहितीनुसार, एप्रिल 2017 मध्ये सहा बॅंकांचे एसबीआयमध्ये विलीनीकरण झाले होते. त्यामुळे सहाही बॅंकांमधील खातेधारकांची खाती ‘एसबीआय’मध्ये वळविली आहेत. विलीनीकरणानंतर या बॅंकांचे चेकबुक अमान्य करण्यात आले असून, या बॅंकांच्या खातेधारकांना मोबाईल बॅंकिंग अथवा शाखेत येऊन नव्या चेकबुकसाठी अर्ज करावा लागेल. यानंतरच खातेधारक चेकद्वारे व्यवहार करू शकतील.
आता परमीट रूम नूतनीकरण ‘एनओसी’विना :
- शहर किंवा जिल्ह्यात परमीट रूमच्या (एफएल-3) नूतनीकरणासाठी पोलिसांचे “ना हरकत प्रमाणपत्र” (नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट) घेणे गरजेचे नसल्याचा आदेश गृह विभागाने शासन निर्णयाव्दारे 27 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केला. या निर्णयामुळे राज्यातील व्यावसायिकांना दिलासा मिळाला असून, त्यांना पोलिसांकडे ‘एनओसी’साठी हेलपाटे मारावे लागणार नाहीत.
- पूर्वीच्या आदेशानुसार, नवीन परमीट रूम सुरू करताना राज्य उत्पादन शुल्क विभागाचा परवाना घेणे बंधनकारक होते. तसेच, दरवर्षी आवश्यक ‘परवाना शुल्क’ भरून परवाना नूतनीकरण करणेदेखील बंधनकारक होते.
- नवीन परवान्यांसाठी आलेल्या प्रस्तावांची छाननी करताना सार्वजनिक वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, तसेच कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांकडून “ना-हरकत प्रमाणपत्र” नूतनीकरणावेळी घेणे बंधनकारक करण्यात आले होते.
- नवीन निर्णयानुसार, एकदा मंजूर केलेल्या परवान्याच्या नूतनीकरणासाठी पुन्हा नव्याने पोलिसांचे ना-हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक नसल्याचे आदेशात नमूद केले आहे.
- महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातही नूतनीकरणाकरिता पोलिसांकडून “ना-हरकत” घेण्याची तरतूद नाही. त्यामुळे यापुढे परवाना नूतनीकरण करताना पोलिस ना-हरकत अहवाल मागविण्यात येऊ नये, असेही स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.
दिनविशेष :
- 28 नोव्हेंबर 1890 हा दिवस भारतीय समाजसुधारक ‘महात्मा जोतिबा फुले’ यांचा स्मृतीदिन आहे.
- 28 नोव्हेंबर 1967 हा दिवस भारतीय क्रांतिकारक स्वातंत्र्यसैनिक ‘पांडुरंग महादेव तथा सेनापती बापट’ यांचा स्मृतीदिन आहे.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा