Current Affairs of 27 November 2015 For MPSC Exams

चालू घडामोडी (27 नोव्हेंबर 2015)

बिहारमध्ये पुढील वर्षी दारूबंदी लागू :

 • बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सत्ता हाती येताच धडाकेबाज निर्णय घ्यायला सुरवात केली असून, पुढील वर्षी एक एप्रिलपासून राज्यभर दारूबंदी लागू केली जाणार असून, यासाठी स्वतंत्र कायदाही तयार केला जाणार आहे.
 • पाटण्यामध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही घोषणा केली.
 • राज्य सरकार एक स्वतंत्र कायदा तयार करत असून, त्या माध्यमातून टप्प्या-टप्प्याने राज्य दारूमुक्त केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अयोध्येत भव्य राममंदिर बांधले जाईल :

 • राममंदिर उभारणी, जम्मू-काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे 370 कलम रद्द करणे आणि समान नागरी कायदा लागू करणे, या भाजपच्या कार्यक्रम पत्रिकेवरील प्रमुख मुद्द्यांवर मोदी सरकारने प्रथमच संसदेमध्ये तोंड उघडले.
 • अयोध्येत भव्य राममंदिर बांधले जाईल, अशी ग्वाही सरकारमधील वरिष्ठ मंत्री थावरचंद गेहलोत यांनी घटना दिनाच्या चर्चेचे निमित्त साधून थेट संसदेच्या व्यासपीठावरच दिली.

अण्वस्त्रधारी “पृथ्वी 2” या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी :

 • अण्वस्त्रधारी “पृथ्वी 2” या मध्यम पल्ल्याच्या जमिनीवरून मारा करणाऱ्या या क्षेपणास्त्राची आज यशस्वी चाचणी घेण्यात आली. Pruthvi 2
 • चंडीपूरस्थित इंटिग्रेटेड टेस्ट रेंज (आयटीआर) या संस्थेने ही मोहीम पार पाडली.
 • आयटीआरच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्ट गायडन्स पद्धतीनुसार या क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण करण्यात आले.
 • तसेच या क्षेपणास्त्राने नियोजित लक्ष्य अचूक वेळेत साधत आपली क्षमता सिद्ध केली.
 • या मोहिमेमध्ये उपयुक्‍त सर्व रडार यंत्रणा, इलेक्‍ट्रो ऑप्टिकल ट्रेकिंग यंत्रणा, टेलीमेट्री स्टेशन्स आदी उपकरणाचा प्रक्षेपण मोहिमेदरम्यान वापर करण्यात आला.
 • तसेच क्षेपणास्त्राचा पल्ला 350 किलोमीटर आहे, तर ते एक हजार किलो अण्वस्त्रे वाहून नेऊ शकते.

पूर्व चिनी सागरामधील वादग्रस्त बेटांच्या सुरक्षेसाठी जपान सैन्य तैनात करणार :

 • पूर्व चिनी सागरामधील वादग्रस्त बेटांच्या सुरक्षेसाठी जपान या भागात सैन्य तैनात करणार असल्याचे वृत्त सूत्रांनी दिले.
 • या बेटावर 2019 सालामध्ये सुमारे 500 सैनिकांची एक तुकडी तैनात करण्याची जपानची योजना आहे.
 • या बेटसमूहावर चीननेदेखील हक्क सांगितला आहे. तेव्हा चीनने या भागात आक्रमक लष्करी हालचाली सुरु केल्याच्या वृत्ताच्या पार्श्‍वभूमीवर, जपानने हे पाऊल उचलल्याचे मानले जात आहे.

पॉंडिचरीमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत सायकल योजना :

 • पॉंडिचरीचे मुख्यमंत्री एन. रंगास्वामी यांनी सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत सायकल योजना सुरू केली आहे.
 • तसेच मुख्यमंत्री रंगास्वामी यांनी या योजनेवर 7.68 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
 • या योजनेत इयत्ता दहावीपर्यंतचे विद्यार्थी मोफत सायकल मिळविण्यासाठी पात्र ठरणार आहेत तर योजनेमुळे 26,207 विद्यार्थ्यांना मोफत सायकली मिळणार आहेत.

पश्‍चिम आफ्रिकेमधील देशामध्ये सैन्याची तुकडी पाठविण्याचा निर्णय :

 • दहशतवाद व हिंसाचाराच्या गर्तेत सापडलेल्या माली या पश्‍चिम आफ्रिकेमधील देशामध्ये सैन्याची एक छोटी तुकडी पाठविण्याचा निर्णय जर्मनीने घेतला आहे.
 • जर्मनीच्या संरक्षण मंत्री उर्सुला वॉन डेर लेयेन यांनी यासंदर्भातील माहिती दिली.
 • मालीमध्ये जर्मनी 650 सैनिकांची एक तुकडी पाठविणार आहे.

राज्यसभेचे सदस्य खेकीहो झिमोमी यांचे निधन :

 • नागा पिपल्स फ्रंटचे नेते आणि राज्यसभेचे सदस्य खेकीहो झिमोमी यांचे निधन झाले. ते 69 वर्षांचे होते.
 • झिमोमी यांनी नागालॅंड स्टुडंट फेडरेशनमधून आपली राजकीय कारकिर्द सुरु केली होती. नागालॅंडमधील ते एक यशस्वी उद्योजक होते.
 • ते तीन वेळा नागालॅंड विधानसभेचे सदस्य होते. तसेच नागालॅंडमध्ये त्यांनी काही मंत्रिपदेही भूषविली होती.

भारत-पाकिस्तान द्विपक्षीय मालिकेवर अखेर शिक्कामोर्तब :

 • गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण क्रिकेटजगताचे लक्ष वेधलेल्या प्रस्तावित भारत-पाकिस्तान द्विपक्षीय मालिकेवर अखेर शिक्कामोर्तब करीत दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डाने आपली सहमती दर्शवली.
 • ही मालिका श्रीलंकेत खेळवली जाईल, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) वरिष्ठ अधिकारी राजीव शुक्ला यांनी स्पष्ट केले.
 • भारत-पाक क्रिकेट मालिका अंदाजे 15 डिसेंबरपासून खेळविण्यात येईल.
 • तसेच ही मालिका पाच सामन्यांची असेल. या निर्णयावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली असून, यामुळे संबंध मजबूत होतील.
 • नियोजित कार्यक्रमानुसार भारत-पाकिस्तान मालिकेमध्ये 2 ‘कसोटी’ , 5 ‘एकदिवसीय’ आणि 2 ‘टी-20’ सामने खेळविण्यात येणार होते.

इन्टेक्स टेक्नोलॉजी ही भारतीय बाजारातील पहिल्या क्रमांकाची कंपनी :

 • आयडीसी क्यू3, 2015 च्या अहवालानुसार गेल्या तिमाहीत (जुलै-सप्टेंबर 2015) इन्टेक्स टेक्नोलॉजी ही भारतीय बाजारातील पहिल्या क्रमांकाची भारतीय मोबाइल कंपनी ठरली आहे.
 • गेल्या तिमाहीत कंपनीने तब्बल 87,55,697 मोबाईल फोनची विक्री केली आहे.
 • आधीच्या तिमाहीत झालेल्या विक्रीच्या तुलनेत या तिमाहीतील विक्रीत 42.5 टक्के वाढ झाली आहे.
 • तसेच या वर्षाच्या पूर्वार्धात इन्टेक्सने अक्वा पॉवर प्लस, अक्वा 4जी प्लस, अक्वा ट्रेन्ड, अक्वा ड्रीम 2, क्वाऊड स्वीफ्ट अशी अनेक उत्पादने बाजारात आणली.

विश्वाच्या उत्पत्तीसंबंधीच्या महाविस्फोट सिद्धान्ताला आव्हान :

 • भौतिकशास्त्रातील प्रचलित सिद्धान्तांना आव्हान देणारे संशोधन साऊथ हॅम्पटन विद्यापीठातील ख्रिस्तोफर सॅचरदा यांनी केले आहे.
 • काऑन नावाचे अणूच्या उपकरणांचे क्षरण होत असते असे वैज्ञानिकांचे मत आहे. त्यामुळे विश्वाच्या निर्मितीविषयी अधिक माहिती मिळू शकते. तसेच विश्वाच्या उत्पत्तीसंबंधीच्या महाविस्फोट सिद्धान्ताला त्यामुळे आव्हान मिळू शकते.
 • काऑन कणांबाबत सॅचरदा यांनी केलेल्या संशोधनात एक नवीन परिणाम दिसून आला असून, त्यामुळे काऑन कणांचे वर्तन जेव्हा द्रव्य व प्रतिद्रव्यात अदलाबदल होते तेव्हा कसे बदलते हे समजले आहे याला सीपी सिम्रिटी उल्लंघन असे नाव देण्यात आले आहे, त्याबाबत काही आकडेमोडही करण्यात आली आहे.
 • जर यातील गणने प्रायोगिक निष्कर्षांशी जुळली नाहीत तर तो सीपी सिम्रिटी उल्लंघन परिणामाचा पुरावा असणार आहे.
 • आताचे अणूकण व उपकरण यांच्याविषयी भौतिकशास्त्रज्ञांनी प्रमाणित प्रारूप सिद्धान्त मांडला आहे त्याच्यापेक्षा वेगळा सीपी सिम्रिटी उल्लंघन सिद्धान्त आहे.
 • अजून तरी सिद्धान्त व प्रयोग यात असा फरक आढळून आलेला नाही, पण वैज्ञानिकांच्या मते काटेकोर आकडेमोड केली तर हा फरक दिसून येईल व त्यामुळे सीपी सिम्रिटी उल्लंघन परिणामाचा सिद्धान्त खरा ठरेल.
 • फिजिकल रिव्हय़ू लेटर्स या नियतकालिकात हा संशोधन निबंध प्रसिद्ध झाला आहे.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.