Current Affairs of 27 January 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (27 जानेवारी 2016)

चालू घडामोडी (27 जानेवारी 2016)

जैतापूरमध्ये  सहा अणुभट्ट्या :

  • जैतापूर येथील भारत-फ्रान्स संयुक्त अणुवीजनिर्मिती प्रकल्पात आता फ्रान्सकडून दोनऐवजी सहा अणुभट्ट्या विकत घेण्यात येणार असून, त्यासंदर्भातील सुधारित समझोता करार येथे करण्यात आला. यापूर्वी भारत दोन अणुभट्ट्या विकत घेणार होता.
  • उभय देशांदरम्यान या प्रकल्पाबाबत चर्चा होऊन 2016 म्हणजेच या वर्षअखेरीपर्यंत तो पूर्ण करून 2017 मध्ये या प्रकल्पाच्या अंमलबजावणीस सुरवात करण्याचेही ठरविण्यात आले.
  • फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्स्वा ओलॉंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात व्यक्तिगत पातळीवर आणि मर्यादित सहकाऱ्यांसह सुमारे एकतास स्वतंत्र चर्चा झाली.
  • जैतापूरच्या संदर्भात फ्रान्सची ‘इडीएफ’ ही विद्युतनिर्मिती कंपनी आणि भारताच्या अणुवीज महामंडळादरम्यान करार करण्यात येऊन जैतापूर येथे सहा ‘युरोपियन प्रेशराइज्ड रिऍक्‍टर्स'(इपीआर) उभारण्याचे निश्‍चित करण्यात आले.

सुधारित ‘ऍट्रॉसिटी ऍक्‍ट’ची अंमलबजावणी :

  • अनूसुचित जाती (एससी) आणि जमातींवरील (एसटी) अत्याचारांच्या विरोधात किंवा अशा वर्गांतील व्यक्तींच्या आत्मसन्मानाला ठेच पोचेल असे वर्तन करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची तरतूद असलेल्या सुधारित कायद्याची (ता. 26) अंमलबजावणी करण्यात आली.
  • अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यात (ऍट्रॉसिटीज ऍक्‍ट) दुरुस्ती करण्यात आली असून, सुधारित कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे.
  • ‘एससी’, ‘एसटीं’ वरील सामाजिक आणि आर्थिक बहिष्काराच्या विरोधातही आता कठोर कारवाई करणे शक्‍य होणार आहे.

राष्ट्रपती पोलिस पदक विजेते :

  • प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलिस शौर्य पुरस्कारांची  घोषणा राष्ट्रपती कार्यालयाने केली. महाराष्ट्रातील पाचजणांना शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • शौर्य पदके
  • हिरालाल कोरेती (एएसआय), चंद्रव्य मदनव्या गोदारी (हेड कॉन्स्टेबल), गंगाराम मदनव्या सिदाम (नायक), नागेश्‍वर नारायण कुमारन (नायक), बापू किश्‍तव्य सुरमवार (कॉन्स्टेबल)
  • अतुलनीय सेवा
  • अतुलचंद्र मधुकर कुलकर्णी (सह पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा, मुंबई), रवींद्र गणेश कदम (विशेष पोलिस महासंचालक, नागपूर), शशिकांत दत्तात्रय सुर्वे (पोलिस उपायुक्त, कुलाबा विभाग, मुंबई), नागेश शिवदास लोहार (पोलिस उपायुक्त, ठाणे शहर)
  • तुरुंग विशेष सेवापदक : राजेंद्र तनबाजी धामणे (पोलिस उपअधीक्षक, तुरुंग विभाग, औरंगाबाद)
  • उल्लेखनीय सेवापदक : अमृत तुकाराम पाटील, (शिपाई, तुरुंग प्रशिक्षण कॉलेज, येरवडा, पुणे), हनुमंत हिरवे (शिपाई, येरवडा तुरुंग, पुणे), अनिल रामू लोंढे (हवालदार, कोल्हापूर तुरुंग विभाग), चंद्रमणी अर्जुन इंदरूकर (पोलिस उपअधीक्षक, भायखळा)
  • जीवनरक्षा पदक
  • जीवनरक्षा पदकांची घोषणा झाली. 50 जणांना ही पदके देण्यात येणार असून, यात महाराष्ट्रातील सतीश वैजनाथ बोलगावे व अक्षय आनंद तांबे यांना हा सन्मानमिळाला आहे.
  • लोकांचे जीव वाचविण्यासाठी महत्त्वपूर्ण काम करणाऱ्या 50 जणांना या पदकाने सन्मानित करण्यात येते. तीन गटांमध्ये हा सन्मान दिला जातो.
  • तीन जणांना सर्वोत्तम जीवन रक्षा पदक, नऊ जणांना उत्तम जीवनरक्षा पदक, 38 जणांना जीवनरक्षा पदक जाहीर झाले आहेत.
  • नऊ जणांना हा सन्मान मरणोत्तर देण्यात येणार आहे, पदक, गृहमंत्र्यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र, रोख रक्कम असे या सन्मानाचे स्वरूप आहे.

पद्म पुरस्कारप्राप्त विजेत्यांची यादी :

  • प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला 112 पद्म पुरस्काराची घोषणा केली. यापैकी 10 मान्यवरांना पद्मविभूषण, 19 जणांना पद्मभूषण, तसेच 83 जणांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
  • पद्मविभूषण : धीरुभाई अंबानी (मरणोत्तर) – रिलायन्स समूहाचे संस्थापक (महाराष्ट्र), श्री श्री रविशंकर – आध्यात्मिक गुरू (कर्नाटक), यामिनी कृष्णमूर्ती – शास्त्रीय नृत्यांगना (दिल्ली), रजनीकांत – अभिनेते (तामिळनाडू), गिरीजा देवी – शास्त्रीय गायिका (प.बंगाल),रामोजी राव – माध्यम सम्राट (आंध्र प्रदेश), जगमोहन -जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल (दिल्ली), व्ही. शांता – कर्करोग तज्ज्ञ (तामिळनाडू),व्ही.के. आत्रे – शास्त्रज्ञ व डीआरडीओचे माजी प्रमुख (कर्नाटक), अविनाश दीक्षित- भारतीय वंशाचे अमेरिकन अर्थतज्ज्ञ.
  • पद्मभूषण : अनुपम खेर – अभिनेता (महाराष्ट्र), उदित नारायण झा – गायक (महाराष्ट्र), स्वामी तेजोमयानंद – चिन्मय मिशन(महाराष्ट्र), एन.एस. रामानुज ताताचार्य- संस्कृत पंडित (महाराष्ट्र), हाफीज कॉन्ट्रॅक्टर – आर्किटेक्ट (महाराष्ट्र),इंदू जैन – बेनेट कोलमन अँड कंपनीच्या प्रमुख (दिल्ली), विनोद राय – माजी नियंत्रक व महालेखा परीक्षक(केरळ),दिवंगत स्वामी दयानंद सरस्वती (मरणोत्तर) – आर्य समाजाचे संस्थापक (उत्तराखंड), सानिया मिर्झा – टेनिसपटू (तेलंगण),सायना नेहवाल -बॅडमिंटनपटू (तेलंगण), डी. नागेश्वर रेड्डी – गॅस्ट्रोएनटोरोलॉजिस्ट (तेलंगण), आर. सी. भार्गव – मारुती सुझुकीचे प्रमुख (उत्तर प्रदेश), राम सुतार – मूर्तिकार (महाराष्ट्र), यारालगड्डा लक्ष्मी प्रसाद – हिंदी व तेलगू लेखक (आंध्र प्रदेश),ए.व्ही रामा राव – शास्त्रज्ञ (आंध्र प्रदेश), बरजिंदर सिंह हमदर्द – पंजाबी पत्रकार (पंजाब), हाइसनेम कन्हैयालाल – मणिपुरी रंगमंच कलावंत (मणिपूर), रॉबर्ट ब्लॅकविल – माजी राजदूत (विदेशी), पालोनजी शापूरजी मिस्त्री – भारतीय वंशाचे उद्योजक (आयर्लंड)

सानिया-हिंगीस उपांत्य फेरीत :

  • सानिया मिर्झाने मार्टिना हिंगीसच्या साथीने ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
  • सानिया-मार्टिना हिंगीस यांनी (दि.26) झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात ऍना-लेना ग्रोनेफेल्ड (जर्मनी)-कोको वॅंडेवेघे (अमेरिका) या जोडीचा 6-2, 4-6, 6-1 असा पराभव केला.

भारत-फ्रान्स यांच्यात 60 हजार कोटींचा राफेल करार :

  • फ्रान्सकडून 36 राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याच्या कराराची औपचारिकता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वाक्षरीने पूर्ण झाली.
  • फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्स्वॉ ओलांद हे प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला हजर राहण्यासाठी भारत भेटीवर आले होते.
  • ओलांद यांच्या तीन दिवसीय दौऱ्यात मोदींसोबत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत लढाऊ विमाने खरेदी करण्याच्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या.
  • फ्रान्सकडून 36 राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याचा करार हा द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.
  • उपलब्ध असलेली लढाऊ विमाने पाकिस्तान आणि चीनचा सामना करण्यासाठी पुरेशी नाहीत, त्यासाठी किमान 44 विमानांची गरज आहे. त्यामुळे सदर 6 विमाने मिळाल्यावर हवाई दलाचे सामर्थ्य वाढणार आहे.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.