Current Affairs (चालू घडामोडी) of 27 February 2015 For MPSC Exams
अ.क्र |
ठळक घडामोडी |
1. | रेल्वे अर्थसंकल्प जाहीर |
2. | इसार मुजावर यांचे निधन |
3. | दिनविशेष |
रेल्वे अर्थसंकल्प जाहीर :
- रेल्वेमंत्री सुरेश प्रभू 2015-16 वर्षाचा रेल्वे अर्थसंकल्प लोकसभेत गुरुवारी जाहीर केले.
- हा पूर्ण वेळेसाठीचा पाहिलाच अर्थसंकल्प आहे तसेच या अर्थसंकल्पात रेल्वेच्या प्रवासी आणि मालवातुकीच्या भाड्यात कोणतीही वाढ करणार नसल्याचे प्रभू यांनी स्पष्ट केले.
- अर्थसंकल्पातील वैशिष्ठ :
- रेल्वेमध्ये स्वच्छतेसाठी नवीन विभाग
- स्थानके आणि रेल्वेगाड्यांना कंपन्यांची नावे देऊन निधीची उभारणी.
- ज्येष्ठ नागरिकांना व्हीलचेअर ऑनलाइन आरक्षित करता येणार
- रेल्वेच्या नव्या डब्यांमध्ये ब्रेल लिपीतही सूचना लिहिल्या जाणार
- रेल्वे कर्मचार्यांना कामगिरीवर आधारित बोनस
- रेल्वेमध्ये सौरऊर्जेचा जास्तीत जास्त वापर
- प्रवाशांच्या सूचनांचा अर्थसंकल्पात विचार करणार
- रेल्वेच्या विकासासाठी 11 कलमी कार्यक्रम
- रेल्वेरुळ वाढविण्याला प्राधान्य
- रेल्वेमध्ये खासगी कंपन्यांची गुंतवणूक
- रेल्वेत बायोटॉयलेट उभारणार
- रेल्वेच्या वेळापत्रकाची माहिती देणारे एसएमएस अलर्ट
- 138 हा क्रमांक असलेली हेल्पलाइन देशपातळीवर सुरू करणार
इसार मुजावर यांचे निधन :
- ज्येष्ठ चित्रपटअभ्यासक, पत्रकार इसाक मुजावर यांचे गुरुवारी वृद्धापकाळने निधन झाले.
- मुजावर 1955 सालापासून चित्रपट सृष्टीवर लिखाण केले आहे.
- मुजावर यांचा ‘चित्रभूषण’ पुरस्कार देऊन सन्मान केला होता.
दिनविशेष :
- 27 फेब्रुवारी – जागतिक मराठी भाषादिन
- 2004 – सी.के.नायडू पुरस्कारासाठी भाऊसाहेब निंबाळकर व चंदू बोर्डे यांची निवड
- 1912 – श्रेष्ठ मराठी कवि, नाटककार व कादंबरीकार, ज्ञानपीठ प्राप्त 1964 साली मडगाव येथे झालेल्या 45व्या ए.भा.मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विष्णु वामन शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचा जन्म.
- 1931 – चंद्रशेखर आझाद यांचे निधन.