Current Affairs of 27 April 2016 For MPSC Exams
चालू घडामोडी (27 एप्रिल 2016)
‘हार्ट ऑफ एशिया’ परिषदेला सुरवात :
- युद्धजर्जर अफगाणिस्तानमध्ये शांतता निर्माण करण्याच्या उद्देशाने आणि तेथे गुंतवणूक वाढवून विकासप्रक्रिया वेगाने करण्यासाठी (दि.27) ‘हार्ट ऑफ एशिया’ ही परिषद सुरू होत असून, या परिषदेचे यजमानपद भारताकडे आहे.
- पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव एझाझ अहमद चौधरी यांच्यासह अनेक देशांचे प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित राहणार आहेत.
- अफगाणिस्तानमध्ये कायमस्वरूपी विश्वासाचे वातावरण निर्माण करण्याच्या प्रक्रियेला वेग आणणे आणि त्यासाठी विविध उपाययोजना करणे, हा परिषदेचा गाभा असणार आहे.
- अफगाणिस्तानच्या आर्थिक उन्नतीसाठी त्यांच्याबरोबर ऊर्जा, पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीचे करार करण्याबाबतही उपस्थित देशांमध्ये चर्चा होईल.
- अफगाणिस्तानमधील स्थैर्य आणि सुरक्षेसाठी आशियामधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करावेत आणि त्यांची आश्रयस्थाने नष्ट करावेत, ही भारताची प्रमुख मागणी आहे.
- दहशतवाद्यांना असणारी आर्थिक रसद तोडून त्यांना मिळणारा पाठिंबा थांबविण्याबरोबरच मूलतत्त्ववादी आणि फुटीरतावादी यांच्याविरोधातही कारवाई करण्याबाबत भारत आग्रही आहे.
- अफगाणिस्तानमध्ये संपर्क आणि दळणवळण जाळे विकसित करून आंतरराष्ट्रीय बाजाराशी त्यांना जोडणे, हा परिस्थिती सुधारण्याचा चांगला मार्ग असल्याचेही भारताचे म्हणणे आहे.
- 2011 पासून ‘हार्ट ऑफ एशिया’ या परराष्ट्रमंत्री स्तरावरील परिषदेला सुरवात झाली असून, आतापर्यंतच्या सर्व परिषदांमध्ये भारताने ठोस भूमिका मांडली आहे.
- तसेच या परिषदेमध्ये अफगाणिस्तान, अझरबैजान, चीन, भारत, इराण, कझाकस्तान, किरगिझीस्तान, पाकिस्तान, रशिया, सौदी अरेबिया, ताजिकीस्तान, तुर्कस्तान, तुर्कमेनिस्तान आणि संयुक्त अरब अमिराती या चौदा देशांचा समावेश आहे.
Must Read (नक्की वाचा):
पुणे विद्यापीठात होणार ज्ञानमंडळांची स्थापना :
- मराठी विश्वकोशाच्या अद्ययावतीकरणासाठी नुकतेच महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ मुंबई विद्यापीठात 10 ज्ञानमंडळांची स्थापना केली.
- तसेच या धर्तीवर लवकरच पुणे विद्यापीठातही ज्ञानमंडळे स्थापन करण्यात येणार आहे, या माध्यमातून विश्वकोश अद्ययावत करण्याच्या प्रकल्पाला गतीमान पद्धतीने सुरुवात होणार आहे.
- जगातील विविध विषयांतील ज्ञान मराठीत आणण्यास विश्वकोश मंडळाने ही ज्ञानमंडळे स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे, त्याच्या रचनेमध्ये पाच तज्ज्ञांचे सल्लागार मंडळ व एक समन्वयक यांचा समावेश असेल.
- तसेच हे ज्ञानमंडळ महाराष्ट्रातील त्या विषयासंबंधातील लेखकांचा शोध त्यांच्या मदतीने नोंदींच्या लिखाणाचे व अद्ययावतीकरणाचे काम करेल.
- वीस खंडांच्या नोंदींचे अद्ययावत करणे, विविध विषयांवरील नव्या माहितीची सातत्याने भर टाकणे यासाठी ज्ञानमंडळाची स्थापना करून प्रत्येक उपविषयासाठी स्वतंत्र ज्ञानमंडळ स्थापन करून ही सर्व ज्ञानमंडळे एकमेकांशी जोडून त्या आधारावर विश्वकोशाची रचना करण्याच्या उद्देशाने हा सामंजस्य करार करण्यात येणार आहे.
हिरवे गावात नळपाणी योजना सुरू :
- गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेली हिरवेगावची नळपाणी योजना परिवर्तन आणि रोटरी क्लब ठाणे सेंट्रल याच्या प्रयत्नांमुळे सुरू झाली आहे.
- 333 लोकसंख्या असलेल्या हिरवे गावात शासनाने लाखो रुपये खर्च करून सन 2009-2010 च्या दरम्यान नळ पाणीपुरवठा योजना राबविली होती.
- परंतु हजारो रूपयांच्या थकीत वीज बिलामुळे गेल्या अनेक वषार्पासून ही योजना बंद होती.
- शासनाने लाखोचा खर्च करून देखील त्याचा काहीच फायदा हिरवेवासिंयाना झाला नव्हता परंतु आता ही योजना या सामाजिक संस्थाच्या प्रयत्नामुळे सुरू झाली असल्याने येथील गावकऱ्यांना त्याचे आभार मानले आहेत.
- तसेच ही नळ पाणी योजना सौर उर्जेवर चालणारी आहे. यामुळे तिला विजेची गरज भासणार नाही त्यामुळे ती अखंडीत चालू राहणार आहे.
दादासाहेब फाळके फिल्म अॅवॉर्ड्सचे वितरण :
- पुरस्कार विजेत्यांची नावे :-
- शाहरूख खान (किंग ऑफ बॉलीवूड), मिका सिंग (बेस्ट मेल सिंगर ऑफ द ईअर), मधुर भांडारकर (महिला केंद्री सिनेमा क्षेत्रातील काम), नुसरत भरुचा (बेस्ट अॅक्ट्रेस इन कॉमिक रोल), मनोज वाजपेयी (बेस्ट अॅक्टर क्रिटिक्स चॉइस), अरमान मलिक (पॉप्युलर सिंगर ऑफ द ईअर), अमल मलिक (बेस्ट म्युझिक डायरेक्टर ऑफ द ईअर), बीडी गुलाटी (दादासाहेब फाळके फिल्म फाउंडेशन अॅवॉर्ड), समीर अंजान (मोस्ट आऊटस्टँडिंग लिरिसीस्ट).
- अर्या बब्बर (बेस्ट डेब्यू आर्टिस्ट ऑफ द ईअर), वैशाली सामंत (बेस्ट फीमेल सिंगर-मराठी), देवोलिना भट्टाचारजी (बेस्ट टीव्ही अॅक्ट्रेस इन लीड रोल-टेलिव्हिजन), मिताली नाग (बेस्ट टीव्ही अॅक्ट्रेस इन लीड रोल-टेलिव्हिजन), आशा नेगी (बेस्ट अॅक्ट्रेस-टेलिव्हिजन), सुदेश बेरी (बेस्ट अॅक्टर-टेलिव्हिजन), रुत्विक धनजानी (बेस्ट अॅक्टर-टेलिव्हिजन), मुकेश खन्ना (लाइफटाइम अचिव्हमेंट-टेलिव्हिजन).
- सुदेश लाहिरी (बेस्ट टेलिव्हिजन एंटरटेनर्स ऑफ द ईअर), कृष्णा अभिषेक (बेस्ट टेलिव्हिजन एंटरटेनर्स ऑफ द ईअर), मुश्ताक पाशा (बेस्ट डायरेक्टर इन पंजाबी फिल्म), अमिंदर गिल (बेस्ट डायरेक्टर इन पंजाबी फिल्म), अरविंद कुमार आणि नीलू वाघेला (बेस्ट राजस्थानी जोडी), रवीना टंडन (दादासाहेब फाळके फिल्म फाउंडेशन अॅवॉर्ड), रणजित कपूर (दादासाहेब फाळके फिल्म फाउंडेशन अॅवॉर्ड).
- ए. एम. तुराज (बेस्ट लिरीसिस्ट ऑफ द ईअर), शत्रुघ्न कुमार (बेस्ट अॅक्टर इन भोजपुरी फिल्म), मधू शर्मा (बेस्ट अॅक्ट्रेसेस इन भोजपुरी फिल्म), विवेक मिश्रा (टीव्ही एंटरटेनर), प्रीतम सिंग (बेस्ट टेलिव्हिजन एंटरटेनर्स ऑफ द ईअर), मुकेश खन्ना (लाइफ टाइम अचिव्हमेंट-बॉलीवूड), आम्रपाली दुबे (बेस्ट भोजपुरी फिल्म), दिनेश लाल यादव (मेगा सुपरस्टार-भोजपुरी), शकील सिद्दिकी (बेस्ट कॉमेडियन), राम रहीम सिंग.
आता मोबाईलमध्ये पॅनिक बटण बंधनकारक :
- मोबाईल संवादासोबतच स्वसंरक्षणाचे प्रमुख माध्यम व्हावे, या हेतूने केंद्र सरकारने हॅण्डसेटमध्ये पॅनिक बटण पुढील वर्षापासून बंधनकारक केले आहे.
- पॅनिक बटण असल्याशिवाय कोणताही हॅण्डसेट देशात विकता येणार नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.
- पॅनिक बटण दाबल्यानंतर संबंधित कॉल नजीकच्या सुरक्षा यंत्रणेशी किंवा पोलीस ठाण्याशी जोडला जाईल, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे, या सुविधेचा महिलांना विशेष उपयोग होणार आहे.
- काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने सर्व आपत्कालीन सेवांसाठी ‘112’ हा एकच क्रमांक उपयोगात आणण्याचे निश्चित केले होते, त्यानंतर आता पॅनिक बटण सुविधेमुळे धोकादायक परिस्थितीत त्वरित संपर्क साधणे शक्य होणार आहे.
- केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले, मानवी आयुष्य अधिक सुखकर बनण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर झाला पाहिजे.
- महिलांच्या सुरक्षेसाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे अधिक उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे 1 जानेवारी 2017 पासून पॅनिक बटण असल्याशिवाय कोणताही मोबाईल हॅण्डसेट देशात विकता येणार नाही.
- तसेच त्याबरोबर 1 जानेवारी 2018 पासून प्रत्येक मोबाईल हॅण्डसेटमध्ये अंतर्गत ‘ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम’ असेल, असेही त्यांनी सांगितले.
दिनविशेष :
- 1909 : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म.
- 1992 : सर्बिया व मॉन्टेनिग्रोने एकत्र येउन युगोस्लाव्ह प्रजासत्ताकची स्थापना केली.
- टोगो, सियेरा लिओन स्वातंत्र्य दिन.
- दक्षिण आफ्रिका मुक्ति दिन.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा