Complete Guidance For MPSC Exams, Current Affairs, Rajyaseva, PSI, STI Exams, Job Alerts 2020

Current Affairs of 26 September 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (26 सप्टेंबर 2016)

चालू घडामोडी (26 सप्टेंबर 2016)

आंतरराष्ट्रीय नेमबाजीसाठी विश्वजीत शिंदे यांची निवड :

 • जागतिक रेल्वे नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेसाठी मुंबईकर विश्वजीत शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.
 • 9 ते 12 ऑक्टोबर दरम्यान फ्रान्स येथील माद्रिद शहरात ही स्पर्धा पार पडणार आहे.
 • या आधी पोलंडच्या क्रेकाऊ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विश्वजीत यांनी सुवर्ण पदक मिळविले आहे.  
 • तसेच अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही त्यांनी अनेक पदके मिळविली आहे.
 • विशेष म्हणजे, विश्वजीत यांच्यासह सुमा शिरूर, अयोनिका पॉल, तेजस्विनी मुळ्ये, स्वप्निल कुसळे, जितेंद्र विभुते, सुमेध देवळालीवाला, रुचिता विणेरकर हे नामांकित नेमबाजदेखील या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
 • दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक रायफल क्लबमध्ये प्रशिक्षक म्हणून विश्वजीत शिंदे यांनी अनेक गुणवान नेमबाज घडवले आहेत.

राजा माने राज्य मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी :

 • महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ‘लोकमत’च्या सोलापूर आवृत्तीचे संपादक राजा माने यांची एकमताने निवड करण्यात आली.
 • राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले.
 • राजा माने हे सध्या शासनाच्या पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष आहेत.
 • 29 सप्टेंबरला पुणे विभागीय कार्यालयात ‘लोकमत’चे समूह संपादक दिनकर रायकर यांच्या अध्यक्षतेखाली व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते राजा माने यांचा सत्कार होणार आहे.
 • तसेच याच कार्यक्रमात पत्रकार संघातर्फे जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतील.

तनय ठरला ‘डान्स प्लस 2’चा बादशाह :

 • जळगाव येथील तनय मल्हारा हा स्टार प्लस वाहिनीवरील ‘डान्स प्लस 2’या नृत्यस्पर्धेत विजेता ठरला आहे.
 • अवघ्या 14 वर्षांचा सर्वात कमी वयाचा डान्सिंग आयकॉन होण्याचा मान तनयला मिळाला आहे.
 • वाईल्ड रिपर्स हा ग्रुप उपविजेता तर पीयूष भगत सेकंड रनरअप ठरला.
 • ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिक हिच्या हस्ते त्याला अभिनेता रणबीर कपूरच्या उपस्थितीत 25 लाख रुपयांचे पहिले बक्षिस तसेच कार व इतरही बक्षिसांचा वर्षाव त्याच्यावर झाला.
 • तनयच्या विजयाची माहिती जळगावमध्ये सोशल मीडियाद्वारे पोहोचताच फटाके फोडून आनंद व्यक्त केला.
 • रविवारी (दि.25) स्टारच्या स्टुडिओत झालेल्या ग्रँड फिनालेत प्रेक्षकांचा कौल जाहीर करण्यात येऊन तनयला विजेता घोषित करण्यात आले.

चीनची महादुर्बीण अखेर कार्यरत :

 • चीनने (दि.25) जगातील सगळ्यात मोठ्या व प्रचंड आकाराच्या रेडिओ दुर्बीणचा वापर सुरू केला.
 • फुटबॉलची 30 मैदाने एकत्र केल्यावर जेवढा आकार होईल तेवढी ही दुर्बीण असून ती 4,450 परावर्तक आरशांपासून (रिफ्लेक्टर पॅनेल्स) बनलेली आहे.
 • तसेच या विश्वाचा जन्म वा उत्पत्ती कशी झाली आणि पृथ्वीच्या बाहेरील जीवनाचा शोध घेण्यास ही दुर्बीण मदत करील.
 • चीनच्या अकॅडमी ऑफ सायन्सेस अंतर्गत काम करणाऱ्या नॅशनल अ‍ॅस्ट्रॉनोमिकल ऑब्झर्वेशनचे उप प्रमुख झेंग शिओनियन यांनी ही माहिती सांगितली.
 • गुईझोऊ प्रांतातील पिंगटॅँग परगण्यातील कार्स्ट खोऱ्यात ही दुर्बीण आहे.
 • हा दुर्बीण प्रकल्प 2011 मध्ये सुरू झाला व त्यासाठी 1.2 अब्ज युआन (180 दशलक्ष अमेरिकन डॉलर) खर्च आला.

आगा खान चषक स्पर्धेत मराठा लाईट इन्फन्ट्रीचे विजेतेपद :

 • महाराष्ट्र हॉकी संघटनेच्या सहकार्याने पार पडलेल्या 113 व्या आगा खान चषक अखिल भारतीय हॉकी स्पर्धेत मराठा लाईट इन्फन्ट्री (एमएलआय) ‘अ’ संघाने (दि.25) पुरुष गटात विजेतेपद पटकाविले.
 • महिलांमध्ये नवी दिल्ली येथील जिझस अँड मेरी कॉलेज संघाने बाजी मारली.
 • पिंपरी-चिंचवड येथील नेहरूनगर परिसरातील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर झालेल्या या स्पर्धेत पुरुषांच्या चुरशीच्या अंतिम फेरीत एमएलटी ‘अ’ संघाने लखनौ येथील के. डी. सिंगबाबू सोसायटी संघावर 2-1 ने विजय मिळविले.
 • तसेच दुसरीकडे एकतर्फी झालेल्या सामन्यात आझम कॅम्पस संघाला 5-0 ने पराभूत करून जिझस अँड मेरी संघाने महिला गटाच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World