Current Affairs of 26 May 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (26 मे 2017)

चालू घडामोडी (26 मे 2017)

अकोला मेडिकल कॉलेज देशात सहावे :

  • इंडिया टुडे या प्रतिष्ठित इंग्रजी साप्ताहिकाने सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख महाविद्यालय उपक्रमांतर्गत देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांचा सर्व्हे केला होता.
  • तसेच या सर्व्हेचा निकाल इंडिया टुडेने प्रसिद्ध केला असून, यात अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सर्वोत्कृष्ट महाविद्यालयाचा बहुमान मिळवून देशातून सहावा क्रमांक पटकावला आहे. यामुळे अकोलेकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवल्या गेला आहे.
  • इंडिया टुडे या प्रतिष्ठित इंग्रजी साप्ताहिकामार्फत दरवर्षी सर्व्हे केला जातो. यावर्षी इंडिया टुडेने देशभरातील नवीन वैद्यकीय महाविद्यालयांचे सर्वेक्षण केले.
  • देशभरातील शेकडो वैद्यकीय महाविद्यालयांचे सर्वेक्षण करण्यात आले. यातून देशभरातून दहा वैद्यकीय महाविद्यालयांची सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख महाविद्यालय म्हणून निवड करण्यात आली.
  • अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने इंडिया टुडेच्या सर्वेक्षणात देशातून सहावा क्रमांक पटकावून सर्वोत्कृष्ट महाविद्यालयाचा बहुमान मिळविला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (25 मे 2017)

आयसीसी विश्वविजेतेपदाचे लक्ष्य :

  • खडतर परिस्थितीवर मात करण्याचे बाळकडू पाळण्यातच मिळाले, तर परिस्थितीचे आव्हान वाटत नाही. भारताची आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू मोना मेश्राम हिच्या देहबोलीवरून हेच स्पष्ट होत होते.
  • परिस्थिती खडतर असली, तरी इंग्लंडमध्ये आयोजित महिला विश्वकप स्पर्धेत जेतेपद पटकावण्याचे लक्ष्य असल्याचा निर्धार मोनाने व्यक्त केला.
  • विदर्भाची पहिली महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू असलेल्या मोनाचा स्पोर्ट्स जर्नालिस्ट असोसिएशन ऑफ नागपूरतर्फे (एसजेएएन) सत्कार करण्यात आला.
  • महापौर नंदा जिचकार व मनपाचे क्रीडा सभापती नागेश सहारे यांच्या हस्ते मोनाला स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफल तसेच भेटवस्तू प्रदान करण्यात आली.

सरकारी शाळेतील माध्यान्ह भोजनासाठीही ‘आधार’सक्ती :

  • आधार कार्ड असणाऱ्यांनाच सरकारी शाळेतील माध्यान्ह भोजन मिळेल, असे परिपत्रक मनुष्यबळ विकास मंत्रालयाने जारी केल्याने संबंधित विद्यार्थ्यांना 30 जूनपर्यंत आधार कार्डसाठी नोंदणी करावी लागणार आहे.
  • राज्यात 1995 मध्ये प्रायोगिक तत्त्वावर पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी बालकल्याण विभागाने ही योजना सुरू केली होती, तर ऑक्‍टोबर 2007 मध्ये ती आठवीच्या विद्यार्थ्यांसाठीही लागू केली.
  • शभरात माध्यान्ह भोजन योजनेतून 12 लाख शाळांतील सुमारे 12 कोटी मुलांना भोजन दिले जाते. आधार कार्डसक्तीमुळे ज्याप्रमाणे मनरेगा आणि सार्वजनिक वितरण व्यवस्था (पीडीएस) यांसारख्या योजनांपासून ज्याप्रमाणे गरीब लोक वंचित राहिले; तसेच माध्यान्ह भोजन योजनेत लाभ मिळणारी मुलेही वंचित राहतील, अशी भीती सामाजिक संस्थांनी व्यक्त केली आहे.

सनदी सेवा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या अध्यक्षपदी सुधीर ठाकरे :

  • श्री साईबाबा संस्थान विश्‍वस्त व्यवस्था शिर्डी यांच्याद्वारे साई पालखी निवारा येथे सुरू करण्यात येणाऱ्या सनदी सेवा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या (आयएएस) अध्यक्षपदाची धुरा सांभाळण्यास महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष सुधीर ठाकरे यांनी संमती दिली असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी दिली.
  • तसेच या ठिकाणी 100 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. या ठिकाणी येत्या 1 ऑक्‍टोबरपासून ही प्रशिक्षण सुरू करण्यात येणार आहे. या ऍकॅडमीमध्ये 100 प्रशिक्षणार्थींना प्रवेश मिळणार आहे.
  • एका प्रशिक्षणार्थीस एकदाच संधी दिली जाणार असून, प्रशिक्षणाचा कालावधी एक वर्षाचा असणार आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनींनी संपूर्ण माहितीसह श्री साईबाबा संस्थानकडे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दिनविशेष :

  • मराठी नाटककार, विनोदकार आणि कवी ‘राम गणेश गडकरी’ यांचा जन्म 26 मे 1885 मध्ये झाला.
  • 26 मे 1999 मध्ये भारत-पाकिस्तानमध्ये कारगिल युद्धाची सुरुवात झाली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (27 मे 2017)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.