Current Affairs of 26 June 2018 For MPSC Exams

चालू घडामोडी (25 जून 2018)

चालू घडामोडी (26 जून 2018)

रामदेव बाबांचाही बनणार मेणाचा पुतळा :

 • योगगुरू आणि पतंजली योगपीठाचे कर्तेधर्ते रामदेव बाबा आता जगप्रसिद्ध मॅडम तुसाद संग्रहालयात दिसणार आहेत तर लवकरच त्यांचाही मेणाचा पुतळा दिल्लीतील मॅडम तुसाद संग्रहालयात ठेवण्यात येणार आहे.
 • यासाठी सध्या लंडनमध्ये असलेले रामदेव बाबा यांची मॅडम तुसादच्या पथकाने भेट घेऊन त्यांचे माप घेतले, तसेच त्यांच्या चेहऱ्यावरील हावभावही टिपले आहेत.

  Ramdev Baba
 • तसेच रामदेव बाबांचा मेणाचा पुतळा वृक्षासन मुद्रेत असणार आहे.
 • दिल्लीतील मॅडम तुसाद संग्रहालयाचे सात भाग बनवण्यात आले आहेत तर रामदेव बाबांचा पुतळा फन अँड इंटॅरक्टिव्ह विभागात ठेवण्यात येणार आहे.
 • तसेच नवी दिल्लीतील संग्रालयात सात विभागांमध्ये इतिहास, क्रीडा, संगीत, चित्रपट आणि राजकीय जगतातील लोकप्रिय 51 प्रभावशाली व्यक्तींचा मेणाचा पुतळा ठेवण्यात आले आहेत.
 • सलमान खान, टॉम क्रूझ, राज कपूर, रणबीर कपूर. क्रीडा क्षेत्रातील मेरा कोम, डेव्हिड बॅकहम, मिल्खा सिंग आणि उसेन बोल्ट यांच्याबरोबरच कपिल देव आणि सचिन तेंडुलकर यांचाही समावेश आहे.
 • इतिहासातील भागात महात्मा गांधी, भगत सिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल, एपीजे अब्दुल कलाम आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा समावेश आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (25 जून 2018)

सेशल्सची सागरी सुरक्षा क्षमता वाढवण्यासाठी भारत देणार 10 कोटी डॉलरचे कर्ज :

 • सेशल्स देशाच्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सेशल्सचे राष्ट्रपती डॅनी फॉर यांची द्विपक्षीय बैठक पार पडली.
  त्यानंतर 6 विविध करारांवर दोघांकडून स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत.
 • यावेळी सेशल्सच्या सागरी सुरक्षेची क्षमता वाढवण्यासाठी भारताकडून 10 कोटी डॉलरचे कर्ज देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
 • सेशल्सच्या समुद्रात होत असलेल्या चीनच्या कारवायांमुळे निर्माण झालेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर भारताच्या मदतीने नाविक तळ निर्माण करण्याच्या प्रस्तावावर सेशल्स तयार झाला आहे. त्यामुळे भारत आणि सेशल्सदरम्यान नाविक तळ
  निर्माण करण्याबाबत करार करण्यात आला आहे.

भारतीय विद्यार्थ्यांसाठी कॅनडाचं रेड कार्पेट :

 • कॅनडाने विद्यार्थी व्हिसाच्या (स्टुडंट व्हिसा) नियमांमध्ये बदल केला आहे त्यामुळे भारत आणि अन्य तीन देशांच्या विद्यार्थ्यांना सहज आणि जलदगतीने व्हिसा मिळणार आहे.
 • यापूर्वी व्हिसाच्या प्रक्रियेसाठी 60 दिवसांचा वेळ लागायचा, पण आता नियमांमध्ये बदल केल्यामुळे केवळ 45 दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना व्हिसा मिळणार आहे.
 • तसेच भारताव्यतिरिक्त चीन, व्हिएतनाम आणि फिलिपाइन्स या देशांसाठी कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये बदल केला आहे.
 • तर या देशांमधील ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे आणि भाषेवर प्रभुत्व आहे असे विद्यार्थी कॅनडाच्या एसडीएस म्हणजे स्टुडंट डायरेक्ट स्ट्रीम या अभ्याक्रमासाठी पात्र ठरणार आहेत.

दीपिकाने जिंकले विश्वचषकात सुवर्णपदक :

 • भारतीय तिरंदाज दीपिका कुमारी हिने येथे विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत महिला रिकर्व्ह गटात सुवर्णपदक जिंकले आहे.
 • तसेच दीपिकाने अंतिम फेरीत जर्मनीच्या मिशेली क्रोपेन हिला 7-3 असे पराभूत केले.
 • अशा प्रकारे तिने सहा वर्षांनंतर जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. तर 2011, 2012, 2013 आणि 2015 मध्ये झालेल्या विश्वचषकात तिने चार वेळेस रौप्यपदक जिंकले आहे.

भारत उपग्रह तंत्रज्ञान इतर देशांना शिकविणार :

 • ज्यांच्याकडे उपग्रह बांधणीची क्षमता व तंत्रज्ञान नाही अशा देशाच्या वैज्ञानिकांना उपग्रह तयार करण्याचे विनामूल्य प्रशिक्षण देण्याचे भारताने ठरविले आहे.
 • तसेच हे प्रशिक्षण विनामूल्य दिले जाईल. मात्र ज्यांना प्रशिक्षण द्यायचे त्या वैज्ञानिकांच्या निवडीत भारताची भूमिका असेल.
 • अशा प्रकारे भारताने प्रशिक्षित केलेल्या अन्य देशांच्या वैज्ञानिकांनी भविष्यात तयार केलेले उपग्रहउत्तम व सर्व चाचण्यांमध्ये उतरणारे असतील तर असे उपग्रह ‘इस्रो’ आपल्या अग्निबाणांनी अंतराळात सोडूनही देईल, असेही सिवान म्हणाले आहेत.
 • तसेच ‘अ‍ॅटॉमिक क्लॉक’चा विकास, छोट्या उपग्रहांसाठीची इंधनसामग्री आणि जिओ-लिओ ऑप्टिकल लिंक या संबंधी भारताने काही महिन्यांपूर्वीच इस्राएलश करार केला आहे.
 • तर परग्रहावर याने पाठविण्याच्या कार्यक्रमात सहकार्य करण्याचा करार मार्चमध्ये फ्रान्ससोबत केला गेला आहे.

दिनविशेष :

 • 26 जून 1819 मध्ये सायकलचे पेटंट देण्यात आले आहे.

  shahu maharaj
  shahu maharaj
 • सोमालिया देशाला 26 जून 1960 मध्ये युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य मिळाले.
 • 26 जून 1960 मध्ये मादागास्कर देशाला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले.
 • शिवाजी राजांची मुद्रा असलेले रुपयांचे नाणे 26 जून 1999 मध्ये चलनात आले.
 • 26 जून 1874 मध्ये राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म झाला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (27 जून 2018)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.