Current Affairs of 26 April 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (26 एप्रिल 2017)

चालू घडामोडी (26 एप्रिल 2017)

आता औरंगाबादमध्ये जलसंधारण आयुक्तालय :

 • संपूर्ण राज्यासाठी औरंगाबाद येथे मृद व जलसंधारण आयुक्तालयाची स्थापना करण्यात येणार असून जलसंधारण विभागाचे नाव बदलून ते आता मृद व जलसंधारण विभाग असे करण्यात आले आहे.
 • राज्य मंत्रिमंडळाने झालेल्या बैठकीत त्यास मान्यता दिली. औरंगाबाद येथील वाल्मी संस्थेच्या परिसरात हे आयुक्तालय येत्या 1 मे पासून सुरु होणार आहे.
 • गेल्या ऑक्टोबर मध्ये औरंगाबाद येथे झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीत औरंगाबाद येथे जलसंधारण आयुक्तालय स्थापन करण्यास तत्त्वत: मान्यता देण्यात आली होती.
 • तसेच त्यानुसार मृद व जलसंधारण आयुक्तालयाच्या स्थापनेसह जलसंधारण विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणेची फेररचना करण्याची कार्यवाही करण्यात आली.
 • मृद व जलसंधारण आयुक्तालयाच्या आयुक्त पदावर भारतीय प्रशासन सेवेतील (अधिकालिक वेतनश्रेणीत) अधिकारी नेमण्यात येणार आहे.
 • जल व भू-व्यवस्थापन (वाल्मी) ही जलसंपदा विभागाच्या अखत्यारीतील प्रशिक्षण संस्था तिच्या स्वायत्ततेला बाधा न आणता मृद व जलसंधारण विभागाकडे वर्ग करुन या विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आणण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (25 एप्रिल 2017)

संतोष मंडलेचा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षपदी :

 • महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षपदी नाशिकचे संतोष मंडलेचा यांची बिनविरोध निवड झाली.
 • जून महिन्यात ते पदभार स्वीकारतील. वरिष्ठ उपाध्यक्षपदी मुंबईचे अमित कामत यांची निवड झाली आहे.
 • महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अ‍ॅग्रीकल्चरच्या अध्यक्षपदी वरिष्ठ उपाध्यक्षांचीच निवड होते.
 • मंडलेचा हे विद्यमान वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत. नाशिक रोड येथील जैन समाजाचे ते महामंत्री आहेत.
 • अध्यक्षपदाच्या माध्यमातून उद्योजक, व्यावसायिक आणि कृषी क्षेत्रासाठी कामे करण्याची मोठी संधी मिळाली आहे.

राज्य सरकार जळगावमध्ये ‘मेडिकल हब’ उभारणार :

 • जळगाव येथे शासकीय एकात्मिक वैद्यकीय शैक्षणिक संकुल (मेडिकल हब) उभारण्यासंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
 • तसेच या निर्णयामुळे उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना प्रगत वैद्यकीय शिक्षण, आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
 • जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकाप्रमाणे प्रतिहजार लोकसंख्येसाठी चार डॉक्‍टर्स असणे आवश्‍यक आहे.
 • राज्यात हे प्रमाण 0.64 इतके आहे. त्यामुळे राज्यात नवीन आरोग्य विज्ञान महाविद्यालयाची निर्मिती करून डॉक्‍टरांची संख्या वाढवणे आवश्‍यक आहे.
 • उत्तर महाराष्ट्रात प्रति लाख लोकसंख्यामागे आरोग्य विज्ञान महाविद्यालयाची प्रवेशक्षमता अवघे 0.54 एवढी आहे. त्यामुळे जळगावात ‘मेडिकल हब’ सुरू करण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आला.

जेट एअरवेजसोबत पर्यटन विभागाचा करार :

 • राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत इतेहाद आणि जेट एअरवेज या दोन विमान वाहतूक कंपन्यांबरोबर पर्यटन विभागाचा सामंजस्य करार करण्यात आला.
 • देशातील आणि परदेशातील पर्यटकांचा राज्यात ओघ वाढून पर्यटनाला चालना मिळावी आणि विमान कंपन्यांच्या नेटवर्कचा फायदा मिळावा, यासाठी हा सामंजस्य करार करण्यात आला.
 • मुख्यमंत्री म्हणाले की, यंदाचे वर्ष हे व्हिजिट महाराष्ट्र 2017 म्हणून साजरे केले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर दोन मान्यवर हवाई वाहतूक कंपन्या आणि पर्यटन विभागामध्ये होत असलेला सामंजस्य करार हा महत्त्वपूर्ण आहे. या करारामुळे देश-विदेशातील पर्यटकांना महाराष्ट्राची संस्कृती, येथील वेगळेपण, पर्यटनस्थळे पाहता येणे शक्य होणार आहे.

दिनविशेष :

 • कृष्णभक्तीचा एक वेगळा पंथ पुष्टिमार्ग स्थापन करणारे थोर पुरुष ‘वल्लभाचार्य’ यांचा जन्म 26 एप्रिल 1479 मध्ये झाला.
 • 26 एप्रिल 1924 हा रमाबाई महादेव रानडे यांचा स्मृतीदिन आहे.
 • भारतातील पहिल्या वृत्तपत्रकागदाच्या कारखान्याचे पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते 26 एप्रिल 1956 रोजी उदघाटन करण्यात आले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (27 एप्रिल 2017)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.