Current Affairs of 25 June 2018 For MPSC Exams
चालू घडामोडी (25 जून 2018)
बीएसएफने योग प्रशिक्षणाचा करार संपवला :
- आंतरराष्ट्रीय योगदिनाची सुरूवात झाल्यापासून बाबा रामदेव यांच्या पतंजलीच्या बॅनरखालीच सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) योग शिबीर व्हायचे, पण आता त्यांची जागा ईशा फाउंडेशनने घेतली आहे.
- बीएसएफने पतंजलीसोबत करार संपवून आता सदगुरू जग्गी वासूदेव यांच्या ईशा फाउंडेशनशी करार केला आहे. यावर्षी आंतरराष्ट्रीय योगदिनी जग्गी वासूदेव स्वतः सियाचीनमध्ये जवानांना योग प्रशिक्षण देत होते.
- एकाच व्यक्तीकडून किंवा संस्थेकडून प्रशिक्षण घ्यावे अशी काही अट नाहीये, असे बीएसएफकडून सांगण्यात आले. आता बाबा रामदेव यांच्या पतंजलीचा बीएसएफशी कोणताही करार नाही.
- बीएसएफचे डीजी के.के. शर्मा यांनी सांगितले की, बाबा रामदेव यांनी 2016 मध्ये 4 हजार जवानांना प्रशिक्षण दिले, पण आता लष्कर त्यांच्या सेवेचा वापर करत नाही. आता बीएसएफचा बाबा रामदेव यांच्याशी कोणताही करार नाही, आमच्याशी संपर्क करणारे रामदेव पहिले व्यक्ती होते आणि त्यांच्या प्रशिक्षणाचा चांगला फायदाही झाला. पण आता आमचा त्यांच्याशी संबंध नाहीये.
- रामदेव देत असलेल्या सेवेप्रमाणे आम्हीही सेवा देऊ, असे अनेक प्रस्ताव आले होते. पण जग्गी वासूदेव यांचे नाव ठरवण्यात आले. स्वामी विवेकानंद योग अनुसंधान यांच्याकडूनही जवानांना प्रसिक्षण दिले जात आहे असेही ते म्हणाले. याप्रकरणी पतंजलीची बाजू ऐकण्यासाठी इंडियन एक्सप्रेसने पतंजलीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याकडून कोणतही उत्तर आले नाही.
Must Read (नक्की वाचा):
गोव्यातील बंदरांवरची ठिकाणे सेल्फी प्रतिबंधक :
- पर्यटनस्थळे व समुद्रकिनाऱ्यांच्या ठिकाणी सेल्फी काढण्याच्या नादात अनेक लोक मृत्युमुखी पडतात, त्यामुळे गोव्यातील बंदरांवर सेल्फी प्रतिबंधक क्षेत्रे जाहीर करण्यात आली आहेत.
- राज्य सरकारच्या जीवरक्षक संस्थेने किनारपट्टीवरील 24 ठिकाणी सेल्फी प्रतिबंधक ठिकाणे म्हणून जाहीर केली आहेत.
संस्थेने खरेतर आधीच या ठिकाणांवर लाल बावटा लावला असून, संबंधित ठिकाणी पोहण्यास जाऊ नये, अशा पाटय़ा तेथे लावण्यात आल्या आहेत. - बागा नदी, दोना पौला जेट्टी, सिंक्वेरिम फोर्ट, अंजुना, व्हॅगेटर, मोरजिम, अश्वेम, अरंबोल, केरीम, बांबोलिम व सिरीदाव दरम्यानचा भाग या उत्तर गोव्यातील ठिकाणांचा त्यात समावेश आहे.
- गोव्यात नो सेल्फी ठिकाणे जाहीर करण्यात आली असल्याची माहिती दृष्टी मरीन या जीवरक्षक संस्थेचे मुख्य कार्यकारी रविशंकर यांनी दिली. दक्षिण गोव्यात अंगोदा, बोगमालो, बोलांट, बैना, जापनीज गार्डन, बेतुल, कानग्विनिम, पालोलेम, खोला, काबो डे रामा, पोलेम गालगीबाग, तालपोरा, राजबाग ही नो सेल्फी ठिकाणे जाहीर केली असून तेथे तशा पाटय़ा लावण्यात आल्या आहेत. त्यात ध्वज, चित्र इशारेही लावण्यात आले असून आपत्कालीन टोल फ्री नंबर दिले आहेत.
- गोव्यातील बंदरांना भेट देते वेळी काय करावे व काय करू नये याची माहितीही देण्यात आली आहे. मोसमी पावसाच्या काळात म्हणजे 1 जून ते 30 सप्टेंबर दरम्यान सागरात जाऊ नये, पोहण्यास प्रतिबंध असलेल्या ठिकाणी तसे फलक लावण्यात आले आहे.
भारतीय सैन्याचे ‘ऑपरेशन ऑल आऊट 2’ :
- जम्मू- काश्मीरमध्ये 22 जून रोजी सुरक्षा दलांनी आयसिसच्या जम्मू-काश्मीरमधील म्होरक्यासह चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. जम्मू- काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू झाल्यावरची ही पहिलीच मोठी चकमक होती. केंद्र सरकारने जम्मू- काश्मीरमधील दहशतवादाविरोधात कठोर भूमिका घेतली असून आगामी काळात लष्करी कारवाया वाढण्याची चिन्हे आहेत.
- सुरक्षा दलांनी जम्मू- काश्मीरमधील टॉप 21 दहशतवाद्यांची यादीच तयार केली असून आगामी काळात या दहशतवाद्यांना टार्गेट केले जाणार आहे. यामध्ये हिज्बुल मुजाहिद्दीनचे 11, लष्कर-ए-तोयबाचे सात, जैश-ए-मोहम्मदचे दोन आणि अल-कायदाची जम्मूतील संघटना अन्सार गजवत उल हिंद या संघटनेच्या एका दहशतवाद्याचा समावेश आहे. या 21 मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांना ए++ श्रेणीत ठेवण्यात आले आहे. या दहशतवाद्यांवर 12 लाखांचे इनाम आहे.
एका आंब्याची किंमत 1500 रुपये :
- पश्चिम बंगालमधील कोहितूर आंब्याला भौगोलिक ओळख मिळावी, यासाठी पश्चिम बंगाल सरकारने प्रयत्न सुरू केले असून फळांचा राजा असलेल्या आंब्याची ही प्रजाती फार महत्त्वाची असून या प्रकारचे आंबे नवाब सिराज उदौला याच्या काळात केवळ राजघराण्यातील व्यक्तींसाठी होते, आता यातील एका आंब्याची किंमत 1500 रुपये आहे. हा मौल्यवान आंबा नाजूक असून तो हाताने हळूच काढून कापडात ठेवावा लागतो.
- अठराव्या शतकात बंगालमध्ये नवाबांच्या काळात ही प्रजाती विकसित झाली. सामान्य लोक हा आंबा खरेदी करू शकत नाहीत. केवळ राजघराण्यातील लोकच या आंब्याचे पीक घेऊ शकतात. आधुनिक काळात काही मूठभर श्रीमंतांनाच हे आंबे परवडतात. मुर्शिदाबादच्या नवाबांच्या या आंब्याला भौगोलिक ओळख मिळवली जाणार आहे.
- कोहितूर ही आंब्याची प्रजाती पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्य़ात आहे. जिल्ह्य़ात त्याचे 148 प्रकार असून आता 42 शिल्लक उरले आहेत. त्यांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. आता आम्ही कोहितूर आंब्याला भौगोलिक ओळख मिळण्यासाठी अर्ज केला आहे, असे मुर्शिदाबादचे फलोद्यान उपसंचालक गौतम रॉय यांनी सांगितले. पश्चिम बंगालमधील आंबा महोत्सवात सध्या हे आंबे विक्रीस आहेत.
भारताला मिळाला आणखी एक विश्वनाथ आनंद :
- इटालीमधल्या ऑर्टीसेई येथे मास्टर लुका मोरोनीला नमवत आर प्रागनानंदा हा अवघा 12 वर्षांचा भारतीय मुलगा बुद्धीबळातला ग्रँड मास्टर झाला आहे. लहान वयात हा किताब मिळवणारा तो दुसरा खेळाडू ठरला आहे. हा किताब मिळवणारा सगळ्यात लहान खेळाडू हा किताब हुकल्याबद्दल तुला खंत वाटते का असे विचारले असता, असे अजिबात वाटत नाही असे उत्तर प्रागनानंद किंवा प्रागू याने दिले आहे.
- मे 2016 मध्ये प्रागू दहाव्या वर्षी सर्वात तरूण आंतरराष्ट्रीय खेळाडू ठरला होता. आत्तापर्यंतचा सगळ्यात लहान ग्रँड मास्टर सर्जेई कर्जाकिन असून (12 वर्षे 3 महिने) त्याचा विक्रम प्रागू मोडेल असा अंदाज व्यक्त होत होता. मात्र प्रागूने हा किताब मिळवला तेव्हा आज तो 12 वर्षे 10 महिन्यांचा आहे. त्यामुळे तो ग्रँड मास्टर होणारा दुसऱ्या क्रमांकाचा तरूण खेळाडू ठरला आहे.
- जागतिक विजेता मॅग्नस कार्लसन ग्रड मास्टर झाला त्यावेळी त्याचे वय होते 13 वर्षे 4 महिने. तर विश्वनाथ आनंदने हा सन्मान 18व्या वर्षी पटकावला. सगळ्यात तरूण भारतीय ग्रँड मास्टर आत्तापर्यंत परीमार्जन नेगी होता, ज्याने हा किताब 13 वर्षे 4 महिन्याचा असताना पटकावला होता.
दिनविशेष :
- 25 जून हा दिवस ‘जागतिक कोड त्वचारोग दिन‘ म्हणून पाळला जातो.
- कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांनी संस्थानातील वतनदारी पद्धत रद्द करण्याचा कायदा 25 जून 1918 मध्ये जारी केला.
- 25 जून 1947 रोजी द डायरी ऑफ अॅनी फ्रँक प्रकाशित झाली.
- पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 25 जून 1975 मध्ये देशात अंतर्गत आणीबाणी जाहीर केली होती.
- सन 1983 मध्ये भारताने प्रथम क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धा जिंकली.