Current Affairs (चालू घडामोडी) of 25 January 2015 For MPSC Exams
अ.क्र |
ठळक घडामोडी |
1. | अरुण साधू यांना जनस्थान पुरस्कार |
2. | इंटरनेट, मोबाइलवरून मतदान करता येणार |
3. | बाबा रामदेव आणि श्री श्री रविशंकर यांनी पद्म नाकारला |
4. | डॉ. आंबेडकरांचे घर सरकार घेणार |
5. | श्रीमंतांसाठी सिलिंडर महागणार |
6. | सौदीचे राजे अब्दुल्ला यांचे निधन |
7. | दिनविशेष |
अरुण साधू यांना जनस्थान पुरस्कार :
- साहित्य क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल कुसुमाग्रज प्रतिष्ठानाच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा जनस्थान पुरस्कार यंदा जेष्ठ साहित्यिक अरुण साधू यांना जाहीर झाला.
- एक लाख रुपये, सन्मानचिन्ह व सन्मान असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
- 27 फेब्रुवारीला होणार्या सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
- जनस्थान पुरस्काराचे हे 13वे वर्ष आहे.
- गेल्या वेळेस भालचंद्र नेमाडे यांना हा पुरस्कार देण्यात आला.
इंटरनेट, मोबाइलवरून मतदान करता येणार :
- निवडणूक आयोग इंटरनेट आणि मोबाइलवरून मतदान करण्याची सोय उपलब्ध करून देण्याचा विचार करीत असल्याची माहिती आयुक्त हरीशंकर ब्रह्या यांनी दिली आहे.
- सुप्रीम कोर्टाने या महिन्याच्या सुरवातीला एका निर्णयामध्ये ई-बॅलेट पद्धतीने मतदान करण्याची परवानगी दिली आहे.
बाबा रामदेव आणि श्री श्री रविशंकर यांनी पद्म नाकारला :
- योगगुरू बाबा रामदेव आणि ‘आर्ट ऑफ लिव्हिंग‘ साठी मार्गदर्शन करणारे श्री श्री रविशंकर यांनी पद्म नाकारला.
- पुरस्कार नको अशा आशयाचे पत्र केंद्रिय गृहखात्याला पाठविले आहे.
- ‘मी सन्यासी आहे.’ सन्यासी व्यक्तीने मान स्वीकारणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
डॉ. आंबेडकरांचे घर सरकार घेणार :
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनमधील वास्तव्य असलेले घर होते ते घर महाराष्ट्र सरकार विकत घेणार आहे.
- शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी या संबंधी सर्व गाठीभेटी केल्या आहेत.
- डॉ. आंबेडकर यांचे 1921-22 असे दोन वर्ष लंडन येथील ज्या घरात वास्तव्य होते ते घर घरमालकाने विकायला काढले आहे.
श्रीमंतांसाठी सिलिंडर महागणार :
- श्रीमंत नागरिकांसाठी गॅस सिलिंडर महागणार आहे.
- केंद्र सरकारने याबाबद नवीन नियम तयार केला असून त्याची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.
- दहा लाख रुपयांहुन अधिक वार्षिक उत्पन्न असणार्यांना आता गॅस सिलिंडरवरील अनुदान देण्यात येवू नये, असा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाने पंतप्रधान कार्यालयात पाठवला आहे.
सौदीचे राजे अब्दुल्ला यांचे निधन :
- सौदी अरेबियाचे राजे अब्दुल्ला (वय 90) यांचे निधन झाले.
- सौदीचे राजे अब्दुल्ला यांनी पुराणमतवादी मुस्लिम राजवटीत महत्वाच्या सुधारणा घडवून आणल्या.
- त्यांनी अमेरिकेने केलेल्या दहशतवादविरोधातील युद्धादरम्यान अल कायदा मोहिमेत अब्दुल्ला यांनी सहभाग घेतला होता.
दिनविशेष :
- 1926 – प. बंगालमधील क्रांतीच्या आरोपावरून सुभाषचंद्र बोस यांना अटक.
- 1983 – विनोबा भावे यांना भारतरत्न जाहीर.
- 1991 – मोरारजी देसाईना भारतरत्न जाहीर.
- 2001 – स्वरसाम्राज्ञी लता मंगेशकर, शहनाईवादक उस्ताद बिस्मिल्लाह खॉ यांना भारतरत्न जाहीर.
- 2005 – मांढरादेवी ज्ञत्रेत चेंगाराचेगरीत अनेक ठार.
- 2004 – लेखिका अमृता प्रीतम, ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांना पद्मविभूषण किताब जाहीर, तर दिग्दर्शक, लेखक गुजराल, न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, पत्रकार एम.व्ही.कामत यांना पद्मभूषण किताब जाहीर.