Current Affairs (चालू घडामोडी) of 25 December 2014 For MPSC Exams

 

अ.क्र
ठळक घडामोडी
1. IIM ची स्थापना नागपूरमध्ये
2. अटलबिहारी वाजपेयी व पंडित मालवीय यांना भारतरत्न
3. आरक्षणाचे नवे विधेयक
4. राज्यात येणार अन्न साक्षरता व अन्न सुरक्षा योजना

 

 

IIM ची स्थापना नागपूरमध्ये :

 • इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट म्हणजेच आयआयएमची स्थापना नागपुरमध्येच केली जाईल.
 • घोषणा राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली आहे.
 • 200 एकरच्या जागेवर याची स्थापना करण्यात येणार आहे.

अटलबिहारी वाजपेयी व पंडित मालवीय यांना भारतरत्न :

 • भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि महासभेचे नेते व बनारस हिंदू युनिव्हार्सिटीचे संस्थापक पंडित मदन मोहन मालवीय (मरणोत्तर) यांना यंदाचा भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.
 • वाजपेयी व मालवीय या दोघांचाही 25 डिसेंबर रोजी वाढदिवस असतो.
 • वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या सरकारतर्फे ‘गुड गव्हर्नर डे‘ साजरा करण्यात येणार आहे.
 • 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी वाजपेयी यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
 • आत्तापर्यंत देशातील 43 व्यक्तींना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
 • गेल्या वर्षी सचिन तेंडुलकरशास्त्रज्ञ सी.एन.आर.राव यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

आरक्षणाचे नवे विधेयक :

 • मराठा समाजाला शिक्षणात आणि राज्यातील नोकर्‍यांमध्ये 16% आरक्षण देणारे विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले आहे.
 • यात सरकारने मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक आरक्षणावर कोणतीही भूमिका घेतली नाही.

राज्यात येणार अन्न साक्षरता व अन्न सुरक्षा योजना :

 • राज्यातील जनतेला अन्नाविषयी साक्षर करून सुरक्षित अन्न उपलब्ध करून देण्यात ‘अन्न साक्षरता‘ व ‘अन्न सुरक्षा‘ योजना राबवण्यात येणार आहेत.
 • अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी म्हटले आहे.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.